• 28 Nov, 2022 17:54

Kitchen Appliances Tips: किचन अप्लायन्सेस विकत घेताना वापरा 'या' टिप्स

Kitchen Appliances Tips

Kitchen Appliances Tips: किचनमध्ये काम करताना विविध उपकरणांचा वापर केल्यास काम करणे सोपे जाते. म्हणूनच, किचनमधील उपकरणे खरेदी करतांना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात याची माहिती जाणून घ्या या लेखातून.

Kitchen Appliances Tips: किचनमध्ये काम करताना विविध उपकरणांचा वापर केल्यास काम करणे सोपे जाते. स्वयंपाकघरातील उपकरणे हा गृहिणींच्या तसेच तिथे काम करणाऱ्या प्रत्येकाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा भाग मानला जातो. कमी वेळेत जास्त काम करण्यास उपकरणांमुळे मदत होते. म्हणूनच, किचनमधील उपकरणे खरेदी करतांना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात याची माहिती आपण आजच्या लेखात घेणार आहोत.

वस्तूची शैली (Item style)

विविध भांडी, वस्तूंची ठेवण, स्वच्छता या गोष्टी किचनची शोभा वाढवत असतात. त्यामुळे किचनमधील  फ्रिज, मायक्रोवेव्ह, मिक्सर किंवा अन्य कोणतेही उपकरण आकर्षक शैलीचे, रंगाचे किंवा डिझाईनचे असेल तर त्या वस्तूचा वापर करण्याची इच्छा वाढते शिवाय किचनमध्ये त्या वस्तूला विशेष स्थान मिळते. म्हणून स्टाईल अर्थात वस्तूची शैली, मांडणी बघूनच खरेदी करावी.

जागा आणि आकारमान (Space and size)

किचन जर छोटे असेल तर छोट्या उपकरणांची खरेदी करावी. किचन जर मोठे असेल तर मोठी उपकरणे सोयीस्कर ठरू शकतात. किचनच्या जागेनुसार उपकरणांचा आकार ठरवणे गरजेचे आहे.

कुटुंब प्राधान्य आणि आवश्यकता (Family preferences and needs)

कुटुंबाची संख्या जितकी कमी तितका उपकरणांचा वापर कमी. कुटुंबातील सदस्य जास्त असतील तर उपकरणे जास्त प्रमाणात वापरले जाण्याची शक्यता असते. म्हणून उपकरणांची खरंच आवश्यकता आहे का? असेल तर किती प्रमाणात वापर होणार आहे? हे लक्षात घेऊनच खरेदी केली पाहिजे.

वीज बचत (Electricity saving)

पॉवर सेविंग हा गरजेचा विषय असून त्यानुसारच  वस्तूंची खरेदी करून वापर केला पाहिजे. बऱ्याच उपकरणांवर एनर्जी स्टार पॉईंट्स दिलेले असतात. विजेचे बिल आटोक्यात आणण्यासाठी याची मदत होऊ शकते.

वस्तूची किंमत (Price of the item)

 स्वतःच्या गरजा ओळखून तसेच आर्थिक गोष्टींची सोय करून किचन उपकरणांची खरेदी केली पाहिजे.  बजेटनुसार योग्य दर्जा, शैली निवडून उपकरणे खरेदी केली तर योग्य दरात चांगली वस्तू मिळू शकते.

जीवनशैली (Lifestyle)

तुम्ही रोज बाहेर जेवण करत असाल तर विनाकारण मोठ्या आणि महाग उपकरणांवर खर्च करणे चुकीचे ठरेल. म्हणूनच, जेवण बनवण्याची आवड आणि वेळेची गणितं सांभाळून महागड्या उपकरणांवर खर्च केला तर सोयीचे ठरू शकते.