US Visa Fee : अमेरिकेच्या व्हिसा अर्जाच्या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय अमेरिकेच्या गृहविभागाने घेतला आहे. पण, ही व्हिसा दरवाढ सरसकट नाही तर काहीच व्हिसासाठी सध्या लागू होणार आहे. पर्यटन तसंच शिक्षणासाठी अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या लोकांना या दरवाढीचा फटका बसणार आहे. दरवाढ नेमकी किती झालीए आणि ती कधीपासून लागू होईल ते पाहूया…
कोणत्या प्रकारच्या व्हिसामध्ये केली वाढ
या नवीन दरांनुसार बी-1आणि बी-2 म्हणजे व्यावसायिक आणि पर्यटकांसाठी ज्या व्हिसाची आवश्यकता असते त्या व्हिसामध्ये तब्बल 2 हजाराची वाढ केली आहे. जून्या दरानुसार या व्हिसासाठी 160 अमेरिकन डॉलर म्हणजे 13.096 रूपये भरावे लागत होते. मात्र, आता 185 अमेरिकन डॉलर म्हणजे 15,142 रूपये मोजावे लागणार आहेत. विद्यार्थी व्हिसा घेणाऱ्यांना सुद्धा या वाढीव दराने आता व्हिसासाठी अर्ज करावा लागणार आहे.
अमेरिकेमध्ये टेम्पोंरेरी म्हणजे तात्पुरता काळासाठी म्हणजे ठराविक काळापुरता अमेरिकेमध्ये नोकरीसाठी जातात अशा स्वरूपाच्या व्हिसा दर हे 190 अमेरिकन डॉलर वरून 205 अमेरकन डॉलर करण्यात आले आहेत. भारतीय चलनानुसार, 15,555 वरून 16,783 करण्यात आले आहेत. यामध्ये H, L, O, P, Q आणि R वर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश होतो.
व्यापारी करारातील व्यावयायिक, गुंतवणूकदार आता 205 अमेरिका डॉलर म्हणजे 16,783 ऐवजी 315 डॉलर म्हणजे 25,788 रूपये मोजावे लागणार आहेत.
नवीन फी दराची अंमलबजावणी
1 ऑक्टोबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ज्यांनी व्हिसासाठी अर्ज दाखल केले आहेत, त्यासाठी त्यांनी भरलेल्या फीच्या पावती मुदत ही एक वर्षापर्यंत म्हणजे 30 सप्टेंबर 2023 पर्यंत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांनी 1 ऑक्टोबर 2022 ला पैसे भरून अर्ज दाखल केले आहेत त्यांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुलाखतीसह सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. असे अमेरिकेच्या गृह विभागाने आपल्या परिपत्रकामध्ये स्पष्ट केलं आहे.