Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Fed rate Hike: अमेरिकन फेडरल बँकेने पुन्हा व्याजदर वाढवले; दरवाढीचा 22 वर्षातील उच्चांक

fed bank rate hike

अमेरिकेतील महागाई अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे व्याजदर वाढ करावी लागली, असे फेडरल बँकेने म्हटले आहे. दरम्यान, भविष्यात आणखी दरवाढ होऊ शकते, असे सूतोवाचही दिले आहेत. देशात फक्त 2 टक्के महागाई असावी, असे लक्ष्य बँकेने ठेवले आहे.

Fed rate Hike: अमेरिकेची सर्वोच्च बँक फेडरल रिझर्व्हने पुन्हा एकदा व्याजदर वाढवून सर्वांना धक्का दिला आहे. यावेळच्या पतधोरण बैठकीत .25 टक्क्यांनी व्याजदरवाढ केली. त्यामुळे अमेरिकेतील व्याजदर आता 5.25% ते 5.50% च्या दरम्यान असतील. 2001 नंतर पहिल्यांदाच एवढी दरवाढ झाली आहे. दरवाढीचा हा 22 वर्षातील उच्चांक आहे.

अजूनही महागाई नियंत्रणात नाही

अमेरिकेतील महागाई अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. त्यामुळे व्याजदर वाढ करावी लागली, असे बँकेने म्हटले आहे. दरम्यान, भविष्यात आणखी दरवाढ होऊ शकते, असे सूतोवाचही दिले आहेत. देशात फक्त 2 टक्के महागाई असावी, असे लक्ष्य बँकेने ठेवली आहे. मात्र, देशात यापेक्षा जास्त महागाई असल्याने दरवाढ करण्यात आली. भविष्यात अर्थव्यवस्थेतील बदलांचा आणि सांख्यिकी माहितीचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल, असेही बँकेने म्हटले आहे. 

फेडरल बँकेची आक्रमक भूमिका 

जून महिन्यापासून अमेरिकेतील किरकोळ महागाई आणि एकंदर भाववाढ आटोक्यात येत आहे. नोकऱ्या उपलब्ध होण्याचे प्रमाणही वाढत आहे. मात्र, अद्याप धोरणकर्त्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे दरवाढ दिसून येत आहे. मार्च 2022 पासून फेडरल बँकेकडून सतत दरवाढ करण्यात येत आहे. फक्त जून 2023 महिन्याचा यास अपवाद आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच फेडरल बँकेकडून दरवाढीबाबत आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. 

दरवाढीचा भारतावरील परिणाम

दरम्यान, अमेरिकेतील दरवाढीचा नकारात्मक परिणाम भारतीय भांडवली बाजारावर दिसू शकतो. प्रमुख निर्देशांक खाली आपटू शकतात. दरवाढीचा सर्वाधिक परिणाम अमेरिकेच्या भारतातील गुंतवणुकीवर होतो. जेव्हा फेडरल बँक दरवाढ करते तेव्हा परकीय गुंतवणूकदार भारतीय भांडवली बाजारातून पैसे काढून घेतात. शेअर बाजारात विक्री दिसून आल्याने बाजार कोसळतो.