Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

US Fed Raises Interest Rates: अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने पुन्हा एकदा व्याजदर वाढवला, बँकिंग संकटावर केले भाष्य

US Fed Raises Interest Rates

Image Source : https://twitter.com/federalreserve

US Fed Raises Interest Rates:अमेरिकेतील बँकिंग संकटा ऐवजी महागाई नियंत्रणाला प्राधान्य देत फेडरल रिझर्व्हने बुधवारी 22 मार्च 2022 व्याजदरात 0.25% केली. फेडरल रिझर्व्हचा प्रमुख व्याजदर आता 4.75% ते 5% या दरम्यान असेल. फेडरलचा व्याजदर हा वर्ष 2008 मधील जागतिक मंदीच्या वेळेतील व्याजदरा इतका झाला आहे.

अमेरिकेतील बँकिंग संकटाकडे तूर्त कानाडोळा करत महागाई नियंत्रणाला प्राधान्य देत फेडरल रिझर्व्हने बुधवारी 22 मार्च 2022 व्याजदरात 0.25% केली. फेडरल रिझर्व्हचा प्रमुख व्याजदर आता 4.75% ते 5% या दरम्यान असेल. फेडरलचा व्याजदर हा वर्ष 2008 मधील जागतिक मंदीच्या वेळेतील व्याजदरा इतका झाला आहे. दरम्यान, फेडरल रिझर्व्हच्या दरवाढीनंतर अमेरिकेतील शेअर बाजारात मोठी घसरण दिसून आली.

मागील महिनाभरात अमेरिकेतील बड्या बँका आर्थिक संकटात सापडल्या आहेत. त्यापैकी सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक या दोन बँका भांडवलाअभावी अचानक बंद कराव्या लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढीला विराम देईल आणि बँकिंग संकटावर तोडगा काढेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. मात्र हा अंदाज खोटा ठरवत फेडच्या पतधोरण समितीने व्याजदर वाढ सुरुच ठेवली आहे. दोन दिवसीय बैठकीनंतर बुधवारी फेडरलने पतधोरण जाहीर केले. ज्यात बँकेने प्रमुख व्याजदरात पाव टक्क्यांची (0.75%) वाढ केल्याचे जाहीर केले.

बँकेने महागाई दर 2% पर्यंत मर्यादित ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच वर्ष 2023 अखेर बँकेचा व्याजदर 5.1% पर्यंत वाढेल, असे संकेत देखील देण्यात आले. सिलिकॉन व्हॅली बँक, सिग्नेचर बँक या दोन अमेरिकन बँकांपाठोपाठ स्वित्झर्लंडमधील क्रेडिट स्वीस ही बँक आर्थिक संकटात सापडली होती. यामुळे मागील आठवडाभरात शेअर मार्केटमध्ये प्रचंड घसरण झाली. आर्थिक अनिश्चितता वाढल्याने गुंतवणूकादारांनी शेअर मार्केटमधून पैसा काढून घेतला आणि गोल्डमध्ये गुंतवणूक वाढवली होती. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी गोल्डचा रेट 1990 डॉलर प्रती औंस इतका गेला. भारतात कमॉडिटी बाजारात सोने 60000 रुपयांवर गेले होते.

फेडरलने केलेल्या व्याजदरवाढीची शेअर मार्केट्सला मोठी किंमत मोजावी लागली. यूएसमधील तीन प्रमुख शेअर निर्देशांकात 1% हून अधिक घसरण झाली. डाऊ जोन्स (The Dow Jones Industrial Average - DJI) हा 530.49 अंकांनी घसरला आणि तो 32030.11 बंद झाला. S&P 500 (.SPX)  65.9  अंकांनी घसरुन 3936.97 वर  स्थिरावला. नॅसडॅक (Nasdaq Composite - .IXIC) 190.15  अंकांनी घसरला आणि 11669.96 अंकांवर बंद झाला.        

अमेरिकेतील बँकिंग व्यवस्था मजबूत

फेडरल रिझर्व्हने आपल्या निवेदनात अमेरिकेतील बँकिंग संकटांवर भाष्य केले आहे. अमेरिकेतील बँकिंग व्यवस्था मजबूत आहे मात्र नुकताच यात काही घटना घडल्या त्यावर फेडरलचे लक्ष असल्याचे बँकेने म्हटले आहे. ग्राहक, व्यावसायिक यांच्यासाठी कठोर पतधोरण वाटत असले तरी महागाई नियंत्रण आणि रोजगार निर्मिती व अर्थचक्र सुरुच राहण्यासाठी आवश्यक आहे,असे बँकेने म्हटले आहे.अमेरिकेतील बँकिंगवर गुंतवणूकदारांचा विश्वास कायम असल्याचा दावा फेडरल रिझर्व्हने केला आहे.बँकिंग संकटावर तोडगा काढण्याची  क्षमता असल्याचा भरवसा फेडरल रिझर्व्हने जगभरातील गुंतवणूकदारांना दिला आहे.  

फेड रिझर्व्हच्या दरवाढीचे जगभर पडसाद

वाढत्या महागाईने केवळ अमेरिकेलाच नाही तर संपूर्ण जगाला बेजार केले आहे. महागाई नियंत्रणासाठी व्याजदर वाढवण्याला जगभरातील सेंट्रल बँकांनी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. भारतातदेखील फेडरल रिझर्व्हच्या कठोर पतधोरणाचे पडसाद उमटले. रिझर्व्ह बँकेने मागील वर्षभरात सहावेळा रेपो दरात वाढ केली आहे. व्याजदरात वाढ केल्याने बँकांना कर्जदरात वाढ करावी लागेल.सर्वच प्रकारची कर्जे महागल्याने ग्राहकांच्या क्रयशक्तीवर परिणाम होईल.