Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Fairwork India Rating 2022: फेअरवर्क रँकिंगमध्ये अर्बन कंपनी अव्वल!

Fairwork India Rating 2022

Labour standards measuring platform report 2022: नुकताच भारतातील डिजिटल प्लॅटफॉर्मवरील कामगारांच्या कामाच्या परिस्थिती एका विस्तृत अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यात डिजिटल स्टार्टअप कंपन्यांमधील कामगारांच्या स्थितीचा आढावा घेऊन प्रत्येक कंपनीला रँकिंग दिले आहे, तर पाहूया कोणत्या कंपनीला किती गुण मिळाले आहेत.

Urban Company topped in fair work ranking: फेअर वर्क रेटिंगच्या यादीत अर्बन कंपनीने अव्वल स्थान पटकावले आहे. लेबर स्टँडर्ड्स मेजरिंग प्लॅटफॉर्म, फेअरवर्क नुसार, कंपनीने व्यवस्थापन, कामाच्या ठिकाणची परिस्थिती, वेतन, कर्मचारी करार आणि इतर काही बाबींच्या निकषावर गुण मिळवले आहेत.

हा अहवाल भारतातील डिजिटल प्लॅटफॉर्मवरील कामगारांच्या कामाच्या परिस्थितीवर आहे. यंदा एकाही प्लॅटफॉर्मला  दहापैकी दहा गुण मिळालेले नसून, सातपेक्षा जास्त गुणही मिळालेले नाहीत. या यादीतील इतर स्टार्टअॅपमध्ये बिगबास्केट, फ्लिपकार्ट, स्विगी, झोमाटो, झेप्टो आणि पोर्टर यांचा समावेश आहे.

कोणत्या कंपनीला किती गुण मिळाले? Which company scored how many points?

या अहवालात वाजवी वेतन, अटी, करार, व्यवस्थापन आणि प्रतिनिधित्व मोजले गेले आहे. यात पाच प्लॅटफॉर्मना 10 पैकी शून्य गुण मिळाले आहेत. हा अहवाल भारतातील डिजिटल लेबर प्लॅटफॉर्मवरील कामगारांच्या कामाच्या स्थितीवर आहे. यंदा एकाही प्लॅटफॉर्मला सातपेक्षा जास्त गुण मिळाले नाहीत. इतर प्लॅटफॉर्ममध्ये बिग बास्केट, फ्लिपकार्ट, पोर्टर, स्विगी, अर्बन कंपनी, झेप्टो आणि झोमॅटो यांचा समावेश होता.
यात अर्बन कंपनीने दहापैकी सात गुण मिळवले आहेत आणि ही कंपनी सर्वात चांगले काम करत असल्याचे अहवालात म्हटले आहे. याच्या मागोमाग बिग बास्केटने दहापैकी सहा गुण मिळवले आहेत. तर, फ्लिपकार्ट, झोमाटो आणि स्विगीने दहापैकी पाच गूण मिळवले आहेत. तर झेप्टोने दोन आणि पोर्टरने एक गुण मिळवले आहेत. इतर कंपन्यांनी शून्य गुण मिळवले असून त्यांच्या नावांविषयी प्रसिद्धी पत्रकात कोणताच उल्लेख करण्यात आलेला नाही.

कामगारांविषयी अहवालात काय नमूद केले आहे? What does the report mention about workers?

गिग कामगार हे कायद्याच्या दृष्टीने स्वतंत्र कामगार आहेत, असे फेअरवर्क टीमचे प्रमुख प्रोफेसर बालाजी पार्थसारथी यांनी सांगितले. गिग कामगार म्हणजे पारंपरिक नोकरीऐवजी इतर फ्रिलान्सिंग पद्धतीची किंवा साईड अर्निंगसाठी केली जाणारी कामे किंवा हसल होय. यामुळे गिग कामगारांना संघटित कामगारांप्रमाणे कामगार हक्क मिळत नाहीत. त्यांची कामाची परिस्थिती सुधारण्यासाठी, त्यांना किमान प्रति तास किमान वेतन मिळेल याची खात्री करावी लागेल. त्यांच्या मागण्या सामूहिक कृतीतून ऐकून घ्याव्यात, असे या अहवालात नमूद केले आहे. 
अजूनही कंपन्या किमान वेतन धोरण सार्वजनिकपणे अंमलात आणण्यात आणि लागू करण्यात अयशस्वी ठरत आहेत. तरी, बिग बास्केट, फ्लिपकार्ट, अर्बन कंपनीने प्रति तास किमान वेतन देण्याची काही धोरणे लागू केली आहेत.