Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UPI Payment Offline Mode: खराब नेटवर्कमुळे UPI पेमेंट रखडले? मग ऑफलाईन असे करा पेमेंट, वाचा सविस्तर

UPI Payment offline mode

सध्या सर्व व्यवहार ऑनलाईन होत असल्याने UPI पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पण, UPI पेमेंट म्हटल्यावर नेट आवश्यक असते. त्यामुळे एखाद्यावेळी नेटवर्कची समस्या झाल्यास अडचण येऊ शकते. यावर प्रभावी मार्ग म्हणून तुम्ही ऑफलाईन पेमेंटही करु शकता. ते कसे करायचे, कोणत्या सेवांचा लाभ मिळतो, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

UPI Payment Offline Mode: फक्त UPI द्वारेच नव्हे तर कार्ड आणि इतर विविध ऑनलाईन पद्धतींद्वारेही पेमेंटची सुविधा उपलब्ध होऊ शकते. मात्र, कोणताच पर्याय उपलब्ध नसल्यास, ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुम्हाला विशिष्ट कोड वापरणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही हा कोड डायल कराल तेव्हा कॉल लागणार नाही. मात्र, स्क्रीनवर तुम्हाला मेसेज दिसेल. यासाठी तुम्हाला *99# हा कोड डायल करावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला सात सेवा उपलब्ध होणार आहेत.

या सेवांचा घेता येणार लाभ

  • फंड ट्रान्सफर 
    या पर्यायाचा वापर करुन तुम्ही दुसऱ्या बॅंक खात्यात पैसे ट्रान्सफर करु शकणार आहात.
  • बॅलन्स चौकशी
    तुम्हाला व्यवहारात काही तफावत वाटल्यास, तुम्ही या पर्यायाचा वापर करुन लगेच तुमच्या खात्यातील बॅलन्स चेक करु शकता.
  • मिनी स्टेटमेंट
    तसेच, या पर्यायाद्वारे तुम्ही नुकतेच केलेले व्यवहारही पाहू शकता.
  • बिल पेमेंट
    तुम्ही तुमची युटिलिटी बिले, क्रेडिट कार्ड बिले आणि इतर इनव्हॉईस या पर्यायाद्वारे भरू शकता.
  • प्रीपेड रिचार्ज
    या पर्यायाचा वापर करुन तुम्ही मोबाईल फोन, डीटीएच आणि डेटा कार्ड रिचार्ज करु शकता
  • लोन स्टेट्स
    या पर्यायासह तुम्ही तुमच्या लोन अप्लिकेशनचे स्टेट्सही चेक करु शकता.
  • अन्य सेवा
    रिकरिंग पेमेंट सेट करणे किंवा तुमचे कार्ड ब्लॉक करणे यासारख्या अतिरिक्त बँकिंग सेवांचा लाभ ही तुम्हाला घेता येणार आहे.

असे करा ऑफलाईन पमेंट UPI द्वारे

या सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला *99# कोड फोनवर डायल करावा लागणार आहे. आणि ज्या सूचना असतील त्याचे पालन करावे लागणार आहे. याशिवाय तुम्हाला बँक खाते क्रमांक, एमपीआयएन आणि इतर आवश्यक डिटेल्स टाकण्यास सांगितले जाऊ शकते. तुम्हाला ज्या पर्यायाचा लाभ घ्यायचा आहे. त्याचा संबंधित क्रमांक तुम्हाला टाकावा लागेल आणि तो पाठवावा लागेल. चला तर ऑफलाईन स्टेप-बाय-स्टेप कसे पैसे पाठवायचे पाहूया.

  • तुमच्या फोनवर *99# डायल करा.
  • "फंड ट्रान्सफर" पर्याय निवडा.
  • "UPI" निवडा.
  • प्राप्तकर्त्याचा UPI आयडी टाका.
  • तुम्ही पाठवणार असेलेली रक्कम टाका. 
  • पैसे पाठवण्याचे कारण टाका.
  • तुमचा UPI पिन टाका.
  • तुमचे पैसे यशस्वीरित्या ट्रान्सफर होतील.

पैसे ट्रान्सफर करताना तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जसे की, प्राप्तकर्त्याचा UPI आयडी आणि रक्कम व्यवस्थित टाकली असल्याची खात्री करावी लागणार आहे. तसेच, तुमचा पिन वैध असायला हवा. महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या खात्यात पुरेसे पैसे असणे आवश्यक आहे. 

पेमेंटची मर्यादा ठरलेली आहे

एकदा या पद्धतीची तुम्हाला सवय झाल्यास, तुम्हाला पेमेंट करायला नेटची गरजही लागणार नाही. याशिवाय या सेवेद्वारे तुम्ही फक्त 5000 रुपयांपर्यंतचा व्यवहार करु शकणार आहात. तसेच, प्रत्येक व्यवहारासाठी तुम्हाला  0.50 पैसे चार्ज द्यावा लागणार आहे. हे चार्ज तुम्हाला परवडण्याजोगा आहे. कारण, तुम्हाला विना नेट व्यवहार करायला मिळणार आहे.