Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Upcoming IPO: पेंटागॉन रबर कंपनीचा आयपीओ सोमवारी ओपन होणार; जाणून घ्या सविस्तर माहिती

Upcoming IPO Pentagon Rubber Limited

Upcoming IPO: पेंटागॉन रबर कंपनी (Pentagon Rubber Company) सोमवारी बाजारात आपला आयपीओ ओपन करणार आहे. या अंतर्गत कंपनीकडून 23.10 लाख इक्विटी शेअर्सची विक्री केली जाणार आहे. या निमित्ताने कंपनीच्या आयपीओबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कन्व्हेयर बेल्ट निर्माता पेंटागॉन रबर (Conveyor belt manufacturer Pentagon Rubber) ही कंपनी सोमवारी 26 जून 2023 रोजी बाजारात आपला आयपीओ ओपन करणार आहे. ज्या अंतर्गत नवीन शेअर्स इश्यू केले जातील. ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही लाखोंची कमाई करू शकता. पेंटागॉन रबर कंपनी ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत शेअर्सची विक्री करणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. या कंपनीच्या शेअर्सची किंमत किती आणि एकूण किती शेअर्स कंपनी विक्रीसाठी काढणार आहे, जाणून घेऊयात.

पेंटागॉन रबर लिमिटेड कंपनीबद्दल जाणून घ्या

पेंटागॉन रबर लिमिटेड (Pentagon Rubber Limited) कंपनीचा प्लॅन्ट पंजाबमधील चंदीगडपासून 25 किमी दूर डेरा बस्सी (Dera Bassi) याठिकाणी स्थित आहे. कन्व्हेयर बेल्टिंग प्रेसमध्ये ही देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. ही कंपनी रबर कन्व्हेयर बेल्ट्स, ट्रान्समिशन बेल्ट्स, रबर शीट्स आणि लिफ्ट बेल्ट्स बनवण्याचे काम करते. कंपनी एकाच वेळी 21 मीटरच्या बेल्ट्सचे उत्पादन करते. 300 चौरस किमीपेक्षा जास्त कन्व्हेयर रबर बेल्ट तयार करण्याची कंपनीची वार्षिक क्षमता आहे.

एकूण 'इतके' शेअर्स जारी केले जातील

पेंटागॉन रबर कंपनी (Pentagon Rubber Limited) एकूण 16.17 कोटी रुपयांचा आयपीओ 26 जूनला ओपन करणार आहे. गुंतवणूकदार 26 जून ते 30 जून दरम्यान यामध्ये गुंतवणूक करू शकतात. या इश्यू अंतर्गत, 10 रुपये फेस व्हॅल्यू असणारे 23.10 लाख नवीन इक्विटी शेअर जारी केले जातील. या इश्यूमध्ये गुंतवणूकदार 65-70 रुपयांचा प्राइस बँडसह 2000 शेअर्सच्या लॉटमध्ये गुंतवणूक करू शकतील.

आयपीओच्या यशानंतर शेअर्सचे वाटप 5 जुलै 2023 रोजी करण्यात येईल. इश्यूची रजिस्ट्रार लिंक Intime India आहे. कंपनीचे शेअर्स 10 जुलै रोजी NSE SME वर सूचीबद्ध करण्यात येतील. नवीन शेअर्सद्वारे उभारण्यात आलेला पैसा कंपनी भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि व्यावसायिक कामासाठी वापरणार आहे.

कंपनीच्या आर्थिक नफ्याबद्दल जाणून घ्या 

पेंटागॉन रबर लिमिटेडच्या आर्थिक नफ्याबद्दल बोलायचे झाले तर, आर्थिक वर्ष 2020 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा 93.81 कोटी रुपये इतका होता, जो पुढील आर्थिक वर्षात 1.10 कोटी रुपयांपर्यंत वाढला, त्यानंतर आर्थिक वर्ष 2022 मध्ये तो 3.09 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा 2.16 कोटी रुपयांवर आला आहे. आर्थिक वर्ष 2023 वगळता कंपनीचा नफा सातत्याने वाढला आहे.

Source: hindi.moneycontrol.com