तुम्हालाही आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर आज 23 जून 2023 रोजी बाजारात तीन कंपन्यांचे आयपीओ ओपन होणार आहेत. ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही लाखोंची कमाई करू शकता. विशेष बाब म्हणजे या तिन्ही कंपन्या एसएमई (Small and Medium Enterprises) मार्गाने त्यांचे शेअर्स घेऊन येत आहेत. आयपीओच्या माध्यमातून ते एकूण 134 कोटी रुपये उभारणार आहेत. तिन्ही कंपन्यांचे आयपीओ आज 23 जून 2023 रोजी ओपन होणार असून 27 जून रोजी बंद होतील. या तीन कंपन्यांमध्ये ग्रीनशेफ अप्लायन्सेस (GreenChef Appliances), एसेन स्पेशालिटी फिल्म्स (Essen Specialty Films) आणि मॅगसन रिटेल अँड डिस्ट्रिब्युशन (Magson Retail and Distribution) यांचा समावेश आहे.
ग्रीनशेफ अप्लायन्सेस आयपीओ (GreenChef Appliances IPO)
किचन अप्लायन्सेस निर्माती कंपनी ग्रीनशेफ अप्लायन्सेसने (GreenChef Appliances) दिलेल्या माहितीनुसार आज 23 जून रोजी कंपनी आपला आयपीओ ओपन करणार आहे. या आयपीओसाठी 82 ते 87 रुपये प्रति शेअर प्राईस ब्रँड निश्चित करण्यात आली आहे. या आयपीओमधून (IPO) कंपनीला 53.62 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.
या इश्यूमधून मिळणारे पैसे कंपनी नवीन प्लॅन्ट (New Plant) उभारण्यासाठी आणि मशीन खरेदीसाठी (Machine Buying) वापरणार आहे. ज्यामुळे कंपनीचे उत्पादन वाढण्यास मदत होईल. त्याशिवाय खेळते भांडवल ठेवण्यासाठी आणि कामकाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उर्वरित रक्कम वापरणार आहे. यासंदर्भात माहिती देताना कंपनीने सांगितले की,कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) इमर्जवर सूचीबद्द केले आहेत.
आयपीओमध्ये कंपनी 61.63 लाखांहून अधिक नवीन शेअर्स विक्रीसाठी जारी करणार आहे. कंपनीच्या एका लॉटमध्ये 1600 शेअर्स असणार आहेत. किरकोळ गुंतवणूकदार कमीत कमी एका लॉटसाठी आणि जास्तीत जास्त दोन लॉटसाठी बोली लावू शकतात. एका लॉटसाठी गुंतवणूकदारांना 1,39,200 रुपये गुंतवावे लागणार आहेत. तसेच हाय नेटवर्थ असणारे व्यक्ती जास्तीत जास्त 2 लॉटसाठी जवळपास 2,78,400 रुपयांची गुंतवणूक करणार आहेत.
एसेन स्पेशालिटी फिल्म्स आयपीओ (Essen Specialty Films IPO)
एसेन स्पेशालिटी फिल्म्स ही सर्वात मोठी कंपनी आहे. ही कंपनी स्पेशालाईज्ड प्लास्टिक उत्पादने निर्यात करण्याच्या व्यवसायात कार्यरत आहे. ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून एकूण 66.33 कोटी रुपये उभारणार आहे. कंपनी तिच्या आयपीओ अंतर्गत एकूण 61.99 लाख इक्विटी शेअर्स जारी करणार आहे. त्यापैकी 46.99 लाख शेअर्स फ्रेश इश्यू केले जातील, तर उर्वरित 15 लाख शेअर्स कंपनीच्या प्रमोशन आणि विक्रीसाठी ठेवण्यात येतील.
कंपनीने आपल्या आयपीओसाठी प्रति शेअर 101 ते 107 रुपये ब्रँड प्राईस निश्चित केली आहे. या कंपनीची आयपीओ लॉट साईज 1,200 इक्विटी शेअर्सची आहे. किरकोळ गुंतवणूकदार किमान एका लॉटसाठी 1200 शेअर्स आणि जास्तीत जास्त दोन लॉटसाठी बोली लावू शकतात. एका लॉटसाठी बोली लावताना त्यांना 1,28,400 रुपये (1,200 शेअर्स X 107 रुपये प्रति शेअर) गुंतवावे लागतील. तसेच हाय नेटवर्थ असलेल्या व्यक्ती जास्तीत जास्त 2 लॉटसाठी बोली लावू शकतात.
2 लॉटसाठी जास्तीत जास्त गुंतवणूक रक्कम 2,56,800 रुपये गुंतवावे लागतील.आयपीओ मधून मिळालेल्या रकमेतून कंपनी कर्ज फेडण्यासाठी आणि भांडवल उभारण्यासाठी वापरणार आहे. त्याशिवाय इतर व्यावसायिक कामांसाठी देखील या रकमेचा वापर करणार आहे.
मॅगसन रिटेल आयपीओ (Magson Retail IPO)
तिसरा आयपीओ हा 'Magson Retail and Distribution' कंपनीचा आहे. ही एक फ्रोझन फूड्स पुरवठा करणारी कंपनी आहे, जी तिच्या आयपीओमधून सुमारे 13.74 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. हा एक फिक्स प्राईस असणारा इश्यू आहे. यामध्ये 21.14 लाख रुपयांचे शेअर्स फ्रेश इश्यू करण्यात आले आहेत.
कंपनीच्या एका लॉटमध्ये 2,000 शेअर्स असणार आहेत. किरकोळ गुंतवणूकदार किमान आणि कमाल लॉटसाठी बोली लावू शकतात. किमान गुंतवणूकदाराला आयपीओमध्ये सुमारे 1.3 लाख रुपये गुंतवावे लागतील. तर हाय नेटवर्थ असणाऱ्या व्यक्तीला जास्तीत जास्त 2 लॉट गुंतवणूक करता येईल. ज्यासाठी सुमारे 2.6 लाख रुपये गुंतवावे लागू शकतात.
IPO मधून मिळालेली रकमेचा वापर फ्रँचायझी मॉडेल अंतर्गत संस्था आणि स्टोअर्स ओपन करण्यासाठी तसेच मुख्य सप्लायरसोबत करार करण्यासाठी आणि भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येईल. मॅगसन ही खाद्यपदार्थांना फ्रोझन फूड्समध्ये कन्व्हर्ट करून विक्री करते. पश्चिम भारतात कंपनीचे 26 रिटेल आउटलेट्स आहेत. त्यापैकी 16 कंपनीद्वारे, सात फ्रँचायझी मालकांद्वारे आणि तीन संयुक्त उद्योगांद्वारे चालवण्यात येत आहेत.
Source: hindi.moneycontrol.com