Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sahara Refund Portal : सहारा इंडियाचे रिफंड पोर्टल सुरू होणार; गुंतवणूकदारांना दिलासा

SAHARA REFUND PORTAL

Image Source : www.orissadiary.com

सहारा इंडियाच्या तब्बल 24000 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात देशभरातील अनेक गुंतवणूकदारांचे पैसे अडकले आहेत. आता या पीडित गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह मंगळवारी सहारा रिफंड पोर्टल (Sahara Refund Portal) लाँच करणार आहेत. 18 जुलैला सकाळी 11 वाजता अटल ऊर्जा भवन येथे या पोर्टलचे लोकार्पण केले जाणार आहे.


सहारा इंडियाच्या तब्बल 24000 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात देशभरातील अनेक गुंतवणूकदारांचे पैसे अडकले आहेत. आता या पीडित गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह मंगळवारी सहारा रिफंड पोर्टल (Sahara Refund Portal) लाँच करणार आहेत. 18 जुलैला सकाळी 11 वाजता अटल ऊर्जा भवन येथे या पोर्टलचे लोकार्पण केले जाणार आहे.

गुंतवणूकदारांच्या माहितीसाठी पोर्टल

सहारा रिफंड पोर्टलद्वारे सहारा इंडिया परिवारमध्ये ज्या गुंतवणूकदारांनी पैसा गुंतवला होता, आणि त्यांच्या गुंतवणुकीच्या योजनेचा कालावधी पूर्ण झाला आहे, त्यांना पैसे परत केले जाणार आहेत. संबंधित गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे कसे परत मिळवता येतील याची माहिती आणि पैसे मिळवण्याच्या प्रक्रियेबाबतची संपूर्ण माहिती या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

लाखो गुंतवणूकदारांसाठी दिलासा

सहारा इंडियामध्ये बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील सर्वाधिक गुंतवणूकदार आहेत. यासह देशातल्या अनेक राज्यातील नागरिकांचे या सहारा योजनेमध्ये पैसे अडकले आहेत. त्यावेळी ज्या योजनेंतर्गत लोकांना गुंतवणूक केली होती, मात्र तो गुंतवणुकीचा कालावधी पूर्ण होऊनही पैसे परत न मिळाल्याने अनेक गुंतवणूकदार हतबल झाले होते. आता  सरकारकडूनच सहारा रिफंड पोर्टल सुरू होत असल्याने या गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.

सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी

गुंतवणूकदारांनी सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले होते, त्यानंतर आता या वेबसाइटद्वारे पैसे परत करण्याचे बोलले जात आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने सहारा इंडिया बँकेतील ग्राहकांच्या ठेवींवर निर्णय देताना सहारा इंडियाच्या सर्व गुंतवणूकदारांना सीआरसीद्वारे (CRCS) पैसे दिले जातील, असा निर्णय दिला होता. तसेच सहारा सेबी रिफंड खात्यावर 5000 कोटी हस्तातरीत करण्याचे निर्देश दिले होते.  आता सरकारच्या या पावलामुळे गुंतवणूकदारांमध्ये पैसे परत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. सहारा-सेबी फंडात 24,000 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. सहारा-सेबी फंडाची स्थापना 2012 मध्ये झाली.

सहारा-सेबी वाद

सहाराचा हा वाद 2009 चा आहे. जेव्हा सहाराच्या दोन कंपन्या सहारा हाउसिंग कॉर्पोरेशन लिमिटेड आणि सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशनने त्यांचा आयपीओ आणला होता. त्यावेळी सहाराने चुकीच्या पद्धतीने 24 हजार कोटींची रक्कम जमा केल्याचे सेबीच्या निदर्शनास आले. तपासात सेबीला गुंतवणुकीमध्ये अनियमितता आढळून आली. यानंतर सेबीने सहाराला गुंतवणूकदारांचे पैसे व्याजासह परत करण्यास सांगितले होते. आता ते पैसे परत देण्यासंदर्भात केंद्र सरकारकडून पोर्टल सुरू करण्यात येत असल्याने गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.