Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केट मधील विविध शुल्क समजून घ्या

शेअर मार्केट मधील विविध शुल्क समजून घ्या

ट्रेडिंग सुरू करण्यापूर्वी ब्रोकरेज म्हणजेच दलाली आणि अन्य शुल्कांविषयीची सर्व माहिती जाणून घ्या

शेअर बाजारात गुंतवणूक करताना किंवा ट्रेडिंग करताना बहुतेक जण ब्रोकर्सचा पर्याय निवडतात. हल्ली मोबाईल ऍपचे युग आल्यामुळे प्रत्यक्ष गुंतवणूकदार-ट्रेडर आणि ब्रोकर यांना समोरासमोर येण्याची गरजही राहिलेली नाही. ऑनलाईन केवायसी (Online KYC) आणि पेमेंट भरून झाले, व्हेरीफिकेशन, ऑथेंटिकेशनसारख्या प्रक्रिया पार पडल्या की आपला ट्रेडिंगचा मार्ग मोकळा होतो. असे असले तरी ट्रेडिंग सुरू करण्यापूर्वी आपण ब्रोकरेज म्हणजेच दलाली आणि अन्य शुल्क याविषयीची सर्व माहिती जाणून घेणे आवश्यक ठरते.

ब्रोकरेजचा विचार केल्यास हल्ली चार ठळक प्रकारात विभागणी झालेली दिसते.

  1. इंट्राडे  (Intraday)
  2. ऑप्शन  (Option)
  3. डिलिव्हरी  (Delivery)
  4. फ्युचर्स (Futures)

आपण यातील कोणता पर्याय निवडता त्यानुसार ब्रोकरेज आणि शुल्क ठरते. तसेच प्रत्येक कंपनीनुसार ब्रोकरेजची रक्कम बदलते. काही कंपन्या इंट्राडेसाठी ब्रोकरेज आकारणी करत नाहीत, तर काही कंपन्या डिलिव्हरीवर म्हणजेच शेअर खरेदी करणे आणि दोन-चार दिवस अथवा त्यानंतर विकणे या व्यवहारासाठी ब्रोकरेज आकारत नाहीत.

ऑप्शन आणि फ्युचर्सचा विचार करता यामध्ये काही जण प्रति लॉट खरेदीसाठी आणि प्रति लॉट विक्रीसाठी अशा दोन्हींसाठी वेगवेगळी ब्रोकरेज आकारणी केली जाते. उदाहरणार्थ, झिरोधामध्ये तुमचे ट्रेडिंग अकौंट असेल तर इक्विटी इंट्राडे, फ्युचर्स आणि ऑप्शन्ससाठी प्रति ऑर्डर 20 रुपये ब्रोकरेज घेतले जाते. यामध्ये तुमचे लॉट कितीही असले तरी ते खरेदी करताना 20 रुपयेच ब्रोकरेज द्यावे लागते आणि 20 रुपये विक्रीच्या वेळी द्यावे लागतात. म्हणजेच साधारणतः ४० रुपये एका व्यवहारासाठी ब्रोकरेज द्यावे लागेल.

काही कंपन्यांकडून पर ऑर्डर 100 रुपये, 200 रुपये ब्रोकरेज आकारणीही केली जाते. याखेरीज ट्रॅन्झॅक्शन चार्जेस, सेबी चार्जेस, जीएसटी आणि स्टॅम्प चार्जेस हे चार करही आकारले जातात. यातील जीएसटीची रक्कम ही १८ टक्के इतकी असते. आपल्या डिमॅट खात्यातून शेअर विकला जातो तेव्हा त्यावर डीपी चार्जेस म्हणजे डिपॉझिटरी पार्टिसिपेट चार्जेस लागू होतात. या सर्व करांचा आणि ब्रोकरेजचा विचार करुन आपली रणनीती ठरवायला हवी. 

यासंदर्भात एक उदाहरण पाहूया. समजा तुम्ही निफ्टीचा एक कॉल १२० रुपयांना खरेदी केला आणि त्याचा भाव १४४ रुपये झाल्यावर तो विकला, तर या व्यवहारामध्ये होणार्या १२०० रुपये नफ्यातून साधारणतः २० रुपये आपल्याला ब्रोकरेज वगळता इतर शुल्कापोटी द्यावे लागतात.

अशाच प्रकारे जर तुम्ही १२० रुपये भाव असणारे ५०० शेअर्स खरेदी केले आणि ते १४४ रुपयांना विकले तर यामध्ये होणार्या १२,००० रुपये नफ्यातील सुमारे ३२ रुपये आपल्याला या करांपोटी द्यावी लागते. वरील सर्व आकडेवारी ही उदाहरणादाखल असल्याने आपल्या ब्रोकरकडून त्याविषयी नीट समजून घेऊनच व्यवहारांना सुरुवात करावी.