Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Explainer: सोप्प्या शब्दात समजून घ्या, लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप म्हणजे काय?

Understanding market cap categories

Market Capitalization: शेअर मार्केटच्या बातम्या वाचताना किंवा ऐकताना अनेकदा लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप हे शब्द कानी पडले असतील. ही कंपनी मिड कॅपमधून लार्ज कॅपमध्ये गेली, ही कंपनी स्मॉल कॅपमध्ये गेली पण या कॅप नक्की काय आहेत ते आपण या लेखातून समजून घेऊयात.

Understanding market cap categories: शेअर बाजारातील कंपन्यांचे वर्गीकरण हे भांडवलाच्या आधारे केले जाते. ज्याला मार्केट कॅप म्हणजे कॅपिटलायझेशन आणि यालाच मराठीत भांडवलीकरण म्हणतात. कोणत्याही कंपनीच्या शेअर्सची संख्या त्यांच्या बाजारमूल्यासह गुणाकार करून त्या कंपनीचे भांडवल काढले जाते. अशाप्रकारे, कंपन्यांचे भांडवलीकरण त्यांचे मूल्य शेअर बाजाराद्वारे निर्धारित केले जाते.  भांडवलीकरणाच्या आधारावर, या कंपन्यांना तीन श्रेणींमध्ये विभागले जाते. लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप असे या श्रेण्यांना म्हणतात. शेअर मार्केटमध् गुंतवणूक करण्यासाठी लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप विषयी माहिती असणे आवश्यक आहे.

मार्केट कॅपिटलायझेशन आणि त्याच्या श्रेण्या समजून घेऊया (Market Capitalization and Categories)-

लार्ज कॅप (Large Cap): साधारणपणे, ज्या कंपनीचे बाजार भांडवल 10 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना लार्ज कॅप म्हणतात. लार्ज कॅप असल्यामुळे या कंपन्यांची बाजारात मजबूत पकड असते. मिड कॅप आणि स्मॉल कॅपच्या तुलनेत बाजारातील चढ-उतारांचा त्यांच्यावर कमी परिणाम होतो. मार्केट करेक्शनवर यामध्ये फारशी अस्थिरता नाही, त्याची वाढ संतुलित आहे. बहुतेक तज्ज्ञ त्यात गुंतवणूक करणे सुरक्षित मानतात. परंतु भारतातील बहुतेक लार्ज कॅप कंपन्या जागतिक रँकिंगमध्ये मिड कॅप किंवा स्मॉल कॅप कंपन्या बनतात, कारण जगभरात केवळ त्या कंपन्यांना लार्ज कॅपचा दर्जा मिळतो ज्यांचे मार्केट कॅप 10 अब्ज युएस डॉलरपेक्षा जास्त आहे.

मिड कॅप (Mid Cap): ज्या कंपनीचे बाजार मूल्य 2 हजार कोटी ते 10 हजार कोटी रुपये आहे, ती कंपनी मिड-कॅप श्रेणीमध्ये येते. मिड कॅप कंपन्यांमध्ये मोठ्या आकाराच्या कंपन्या बनण्याची क्षमता असते. त्याचबरोबर गुंतवणुकीतून अधिक परतावा मिळण्याची संधी आहे. जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे ठरवले असेल, तर तुम्ही कंपनीची श्रेणी एकदा जरूर पहा. तुम्हाला नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही.

स्मॉल कॅप (Small Cap): ज्या कंपन्यांचे बाजार भांडवल 2 हजार कोटी रुपयांपेक्षा कमी आहे ते स्मॉल कॅप श्रेणीत येतात. या कंपन्यांमध्ये भविष्यात मिड-कॅप बनण्याची क्षमता आहे. स्मॉल-कॅप कंपन्या उच्च जोखीम आणि उच्च परतावा स्टॉक गुंतवणूक आहेत. त्यांची वाढ खूप वेगवान आहे, परंतु जर गोष्टी व्यवस्थित झाल्या नाहीत तर त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.