Government scheme : साहित्य व कला या क्षेत्रात आयुष्य वेचलेल्या कलावंताना वृध्दापकाळी आर्थिक बाबींमुळे हालअपेष्टा होऊ नये, म्हणून ही योजना 7 फेब्रुवारी 2014 ला सुरु करण्यात आली. मानधन योजनेत समाविष्ट असलेल्या कलाकाराला वैद्यकीय उपचारासाठी एकरकमी आर्थिक मदत दिली जाते. त्यातून आपला उदरनिर्वाह करण्यास त्यांना मदत होते. जेव्हा एखाद्या कलाकाराला अपघाती शारीरिक अपंगत्वाच्या वेळी आर्थिक मदतीची आवश्यकता असते तर त्यासाठी ‘कलाकार मानधन योजना’ राबविण्यात आली आहे.
कोरोनाकाळात आर्थिक स्थिती ढासळल्याने सांस्कृतिक संचालनालयाच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 56 हजार कलावंतांना आर्थिक मदत जाहीर केली. वृद्ध कलावंत यांनी जिल्हास्तरावर समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद अथवा तालुका स्तवरावर गट विकास अधिकारी यांच्याकडे या योजनेंगत मानधन मिळण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
Table of contents [Show]
कलाकार मानधन योजनेसाठी पात्रता
सदर योजनेसाठी व्यक्तीने कला आणि साहित्य इत्यादी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले असावे. पारंपारिक विद्वान ज्यांनी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले असावे. अर्जदाराचे वैयक्तिक उत्पन्न पती आणि पत्नीच्या उत्पन्नासह दरमहा 40000 पेक्षा जास्त नसावे. अर्जदाराचे वय 60 वर्षांपेक्षा कमी नसावे. ज्या कलाकारांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी आहे आणि ज्यांना भविष्यात कलाकार पेन्शनचा दावा करायचा आहे, त्यांनी ताबडतोब अटल पेन्शन योजनेंतर्गत स्वतःची नोंदणी करावी. सन 2035 पासून म्हणजेच अटल पेन्शन योजनेचे लाभ सुरू झाल्याच्या तारखेपासून 20 वर्षांनंतर, कोणत्याही नवीन अर्जांचा सांस्कृतिक मंत्रालयाकडून विचार केला जाणार नाही कारण अर्ज अटल पेन्शन योजनेअंतर्गत समाविष्ट केले जातील.
मानधन किती मिळते?
कलावंतांची वर्गवारी | मानधनाची रक्कम प्रतिमाह | वार्षिक |
राष्ट्रीय कलावंत | 2,100 | 25,200 |
राज्यस्तरीय कलावंत | 1,800 | 21,600 |
स्थानिक कलावंत | 1,500 | 18,000 |
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
- उत्पन्नाचा दाखला
- वयाचा दाखला
- रेशन कार्ड झेरॉक्स
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- पासपोर्ट फोटो
- शिफारस पत्र
अर्ज कसा करावा?
वृद्ध कलावंत यांनी जिल्हास्तरावर समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद अथवा तालुका स्तवरावर गट विकास अधिकारी यांच्याकडे या योजनेंतर्गत मानधन मिळण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.