Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Nifty Target 18000 end of Dec 2023: निफ्टी डिसेंबर 2023 अखेर 18000 पर्यंत खाली येणार, 'UBS'चा नवा अंदाज

Nifty 50 target Dec 2022

Nifty Target 18000 end of Dec 2023: राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 2023 मध्ये 18000 अंकांपर्यंत खाली येईल, असा नवा अंदाज जगातिक पातळीवरील स्विस ब्रोकरेज कंपनी UBS सिक्युरिटीजने व्यक्त केला आहे.

शेअर मार्केटमधील अस्थिरतेने गुंतवणूकदारांची झोप उडवली आहे. आजच्या सत्रात शेअर मार्केटमध्ये प्रचंड उलथापालथ दिसून आली होती. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 600 अंकांनी आणि निफ्टी 200 अंकांनी कोसळला होता. मात्र दिवसअखेर तो सावरला. त्यामुळे बाजारात नेमकं काय होतेय याबाबत मोठ मोठ्या ब्रोकर्सकडून अंदाज वर्तवले जात आहे. अशातच UBS सिक्युरिटजने निफ्टी निर्देशांकाबाबत अहवाल सादर केला आहे. 2023 मध्ये निफ्टी 18000 अंकांपर्यंत खाली येईल, असे UBS ने म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये प्रचंड घसरण झाली होती. त्यानंतर तो काल सोमवारी सावरला होता. निफ्टीमध्ये सोमवारच्या सत्रात 151 अंकांची वाढ झाली होती. आज मंगळवारी तो पुन्हा कोसळला. गुंतवणूकदारांच्या मनात शेअर मार्केटमधील अनिश्चितेने घर केले आहे. महागाईने घर खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. त्याचबरोबर भारतीय बाजारातून परदेशी गुंतवणूकदार पैसे काढून घेत आहेत. सेंट्रल बँकांची व्याजदर वाढ आणि बँकांकडून ठेवीदर वाढवले जात असल्याने त्याचे पडसाद शेअर मार्केटवर उमटत असल्याचे UBS ने अहवाला म्हटले आहे.

UBS ने वर्ष 2023 मध्ये निफ्टी सध्याच्या पातळीच्या तुलनेत 4% घसरेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. डिसेंबर 2023 अखेर निफ्टी निर्देशांक 18000 अंकांच्या पातळीवर राहील, असे बँकेने म्हटले आहे. जगातील प्रमुख उदयोन्मुख बाजारांमध्ये 2023 मध्ये घसरण होईल, असे UBS अहवालात म्हटले आहे.

पुढील तीन वर्षात निफ्टी EPS 10.5% इतका राहण्याची शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. कंपन्यांच्या महसुलाप्रमाणे त्यांचे मूल्यांकन हा महत्वाचा फॅक्टर पुढील वर्षभर शेअर मार्केटसाठी महत्वाचा ठरेल, असे या अहवालात म्हटले आहे. स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीच्या जोरावर भारत इतर उदयोन्मुख बाजारांच्या तुलनेत सरस ठरला आहे.

म्युच्युल फंडांनी जून 2020 पासून इक्विटीजमध्ये प्रचंड गुंतवणूक केली आहे. कोरोना काळात भारतीय शेअर मार्केटमध्ये एक कोटींहून अधिक नव गुंतवणूकदारांनी प्रवेश केला. मार्च 2022 मध्ये म्युच्युअल फंडांनी इक्विटीजमध्ये 140000 कोटींची गुंतवणूक केली होती. सप्टेंबर 2022 मध्ये फंडांनी 32000 कोटींची गुंतवणूक काढून घेतली. याच कालावधीत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 150000 कोटी आणि 40000 कोटींची गुंतवणूक केली होती.