TVS मोटर कंपनीने गुरुवारी भारतातील पहिली इलेक्ट्रिक टू-व्हीलर रेसिंग चॅम्पियनशिप सुरू करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेवर बोलताना TVS मोटर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू म्हणाले, आम्ही भारतातील पहिली रेसिंग फॅक्टरी टीम सुरू केली तेव्हापासून TVS मोटर रेसिंगमध्ये चॅम्पियन बनत आहे. भारतातील पहिल्या EV दुचाकी रेसिंगची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. टीव्हीएस रेसिंग ई-ओएमसी केवळ रेसिंग क्षेत्रात नवीन बेंचमार्क सेट करणार नाही, तर जगाला "हाय-ऑक्टेन" आणि "रोमांचक रेसिंग अनुभव" देण्याची इलेक्ट्रिक वाहनांची क्षमता देखील प्रदर्शित करेल.
यानंतर टीव्हीएस मोटर्सच्या बिझनेस-प्रिमियमचे प्रमुख विमल सुंबली म्हणाले, "आम्ही या क्षेत्रातील लिडर आहोत, मग ते 1994 मध्ये भारतात TVS OMC या स्पर्धेत महिलांना संधी देणे असो किंवा एशिया "वन मेक बी इट" मध्ये एंट्री करणे असो. TVS Racing e-OMC सह, आम्ही रेसिंगचे भविष्य पुन्हा परिभाषित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत आहोत."
या चॅम्पियनशिप सोबतच टीव्हीएस मोटर आपली नवीन इलेट्रिक बाईक "Apache RTE" 29 सप्टेंबर रोजी लाँच करणार आहे. ही इलेक्ट्रिक बाईक केवळ चॅम्पियनशिप साठीच तयार केलेली आहे.
चॅम्पियनशिपची प्रमुख वैशिष्ट्ये
- TVS रेसिंग e-OMC भारतातील "राष्ट्रीय मोटरसायकल रोड रेसिंग चॅम्पियनशिप" (INMRC) च्या चौथ्या फेरीत पदार्पण करेल.
- चॅम्पियनशिपच्या पहिल्या फेरीत 8 रायडर्स सहभागी असतील.
- सर्व 8 रायडर्स TVS Apache RTE बाईक चालवतील.
TVS Apache RTR बाईकचे प्रमुख फिचर्स
- लिक्वीड कूलिंग सिस्टिम सोबत या सेगमेंटचे सर्वात जास्त पॉवर-टू-वेट इंजिन
- कार्बन फायबर बॅटरी केस सोबत हाय पॉवर बॅटरी पॅक
- ब्रेम्बो ब्रेक सिस्टम - 320 मिमी फ्रंट डिस्कब्रेक
- सुरक्षिततेसाठी रेस स्पेशल अल्गोरिदम
- कस्टम बिल्ट आणि प्रगत बॅटरी व्यवस्थापन प्रणाली
- सिंगल रिडक्शन मोटर मागील चाकाला रोलर चेनद्वारे जोडलेले आहे.
- पिरेली सुपर कोर्सा टायर
- टिकाऊ कलर व ग्राफिक्स