Travel Insurance Plan Benefits: परदेशात असतांना अगदी लहान लहान समस्यांचा सामना करणे कठीण जाते. तर कठीण परिस्थितीचा सामना करताना तुम्ही परदेशात (International Trip) स्वत:ला असाहाय्य समजू शकता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी काळजीपूर्वक नियोजन करणे आवश्यक आहे. जेणे करुन आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तुम्हाला तात्काळ मदतीसोबतच गरजेच्या गोष्टींची सोय तिथे व्हायला हवी. तेव्हा ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी घेतांना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
Table of contents [Show]
प्रवास रद्द झाल्यास
शेवटच्या क्षणी होणारा त्रास टाळण्यासाठी प्रवासी आधीच त्यांचे विमान तिकीट, हॉटेल इत्यादी बुक करतात. परंतु तुम्हाला अचानक उध्दभवणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीमुळे किंवा खराब हवामानामुळे किंवा राजकीय अशांततेमुळे तुमची सहल रद्द करावी लागल्यास प्रवास विमा कव्हर देऊ शकतो. काही विमा योजना अशा प्रकरणांमध्ये विविध बुकिंग मध्ये अडकलेला तुमचा पैसा परत करण्यास मदत करेल.
वैद्यकीय आपत्कालीन
प्रवास विमा प्रवासादरम्यान उद्भवू शकणाऱ्या वैद्यकीय आणीबाणीच्या खर्चापासून संरक्षण करतो. विम्यामध्ये रुग्णालयाची बिले, रुग्णवाहिका शुल्क इत्यादी खर्च समाविष्ट आहेत. याव्यतिरिक्त, प्रवासी विमा लाभार्थी मृत्यू किंवा अपंगत्वाच्या प्रकरणांमध्ये वैद्यकीय खर्चाची तरतूद करतो.
प्रवासाला होणारा विलंब
तुमच्या प्रवासादरम्यान तुम्हाला विलंब झाल्यास प्रवास विमा उपयोगी पडेल. उदाहरणार्थ, जर तुमच्या फ्लाइटला उशीर झाला असेल किंवा खराब हवामानामुळे अनपेक्षित व्यत्यय आला असेल, तर तुम्ही विलंबामुळे झालेल्या खर्चासाठी दावा करू शकता.
समान हरवल्यास
विशेषत: परदेशात प्रवास करताना सामान हरवण्याची किंवा अदलाबदल होण्याची शक्यता जास्त असते. ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी तुमचे चेक-इन केलेले सामान आणि त्यातील सामग्री त्यामध्ये निर्दिष्ट केलेल्या मर्यादेत बदलण्याच्या खर्चाची परतफेड करेल.
व्हिसा शुल्क परतावा
काही विमाकर्ते आज व्हिसा अर्ज नाकारल्यास व्हिसा शुल्क परतावासाठी पर्यायी अॅड-ऑन लाभ देतात.
साहसी क्रीडा कव्हरेज
एखादी व्यक्ती साहसी खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशात जाते. या काळात अनेक विमा कंपन्या प्रवाशाला आजार, दुखापत किंवा मृत्यू झाल्यास संरक्षण देतात.
उच्च जोखमीच्या ठिकाणी प्रवास करा
जर तुम्ही नैसर्गिक आपत्ती, राजकीय उलथापालथ किंवा आरोग्य समस्यांनी ग्रासलेल्या क्षेत्राला भेट देत असाल, तर स्टँडअलोन ट्रॅव्हल इन्शुरन्स सर्वसमावेशक संरक्षण प्रदान करू शकतो, जे त्या जोखमींना अनुरूप आहे. यामध्ये तुमची ट्रिप रद्द करण्यापासून ते तुम्ही विम्यामध्ये केलेल्या इतर प्री-पेमेंटपर्यंत देखील कव्हर केले जाते.