Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Travel Gadgets: प्रवास सुखकर आणि सुरक्षित होण्यासाठी 'हे' पाच गॅजेट्स ठेवा सोबत; जाणून घ्या किंमत

Travel Gadgets

Travel Gadgets: तुम्हाला देखील पावसाळ्यात बाहेर फिरायला जायला आवडते का? जर आवडत असेल, तर तुमच्याकडे काही गॅजेट्स असणे गरजेचे आहे. या गॅजेट्समुळे तुमचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होईल. कोणते आहेत ते गॅजेट्स जाणून घेऊयात.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला किंवा ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन करतात. जर तुम्हीही वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला किंवा ट्रेकिंगला जाण्याचा विचार करत असाल, तर काही गॅजेट्स (Gadgets) तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. या गॅजेट्समुळे तुमचा प्रवास सुखकर होण्यासाठी मदत होईल. हे गॅजेट्स तुम्ही ऑनलाईन (Online) किंवा ऑफलाईन (Offline) परवडणाऱ्या किंमतीत खरेदी करू शकता. सततच्या प्रवासासाठी हे गॅजेट्स अतिशय उपयुक्त आहेत. कोणते आहेत ते गॅजेट्स जाणून घेऊयात.

फास्ट चार्जिंग पॉवर बँक (Fast charging power bank)

कोणत्याही प्रवासासाठी बाहेर जाताना  मोबाईल पूर्णतः चार्ज केला आहे की नाही, हे तपासणे अतिशय गरजेचे आहे. आपण कितीही फोन चार्ज केला तरीही प्रवासादरम्यान त्याचे चार्जिंग संपतेच. अशा वेळी आपल्याला फास्ट चार्जिंग पॉवर बँकची गरज असते. ही पॉवर बँक केवळ 500 ते 1000 रुपयांच्या दरम्यान खरेदी करता येते. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही ती खरेदी करू शकता.

मल्टी पोर्ट यूएसबी केबल (Multi port USB cable)

तुमचा मोबाईल चार्ज करण्यासाठी किंवा कारमध्ये गाणी लावण्यासाठी किंवा डेटा ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या यूएसबी केबलची गरज लागू शकते. वेगवेगळ्या प्रकारच्या यूएसबी केबल बॅगमध्ये घेऊन जाणे थोडे अवघड आणि गोंधळणारे असू शकते. त्यामुळे मल्टी पोर्ट यूएसबी केबल अशा वेळी उपयोगी पडते. या केबलमुळे तुमचे सामान तर कमी होईलच सोबत एकाच गॅजेटमुळे तुमची कामे देखील होतील. हे गॅजेट तुम्हाला 250 ते 500 रुपयांमध्ये लोकल मार्केटमध्ये खरेदी करता येईल.

ब्युटूथ स्पीकर (Bluetooth speaker)

बाहेर फिरायला जाताना किंवा ट्रेकला जाताना ब्ल्यूटुथ स्पीकर हा हवाच. सध्या लोकल मार्केट मध्ये किंवा ऑनलाईन स्वस्तात ब्लूटूथ स्पीकर खरेदी करता येतात. हे स्पीकर तुम्ही तुमच्या मोबाईलशी कनेक्ट देखील करू शकता. हा स्पीकर 250 ते 3000 रुपयांमध्ये खरेदी करता येतो.

ट्रॅव्हल ट्रेकिंग बॅग (Travel Trekking Bag)

बाहेर फिरायला जाताना आपल्याकडे कपडे, गॅजेट्स, इतर वस्तूही असतात. साहजिकच हे सर्व सामान ठेवण्यासाठी किमान आपल्याला दोन ते तीन बॅगांची गरज पडते. परंतु तुमच्याकडे ट्रॅव्हल बॅग असेल, तर एकाच बॅगेत या सर्व गोष्टी ठेवता येतात. याच बॅगमध्ये चार्जिंगची सुविधा देखील दिली जाते. वॉटरप्रूफ बॅगा देखील पावसाळ्यासाठी उपयोगी पडतात. ही बॅग तुम्ही स्वस्तात मस्त 400 रुपयांपासून लोकल मार्केटमधून खरेदी करू शकता. तर ब्रँडेड बॅग्स या 6000 ते 7000 रुपायांपर्यंत खरेदी करता येतात.

स्पोर्ट्स शूज (Sports shoes)

पावसाळ्यात बाहेर फिरायला जाताना पायात स्पोर्ट्स शूज असणे गरजेचे आहे. ट्रेकिंग करताना तर शूज घालणे आवश्यक आहे. या शूजमुळे पायांना मजबूत पकड तर मिळतेच सोबत काटे कुटे, काचा, पशूंपासून दंश यासारख्या गोष्टीपासून संरक्षण मिळते. स्पोर्ट्स शूज तुम्ही 500 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता.