Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tracxn Technologies IPO आजपासून ओपन; गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या सर्व माहिती!

Tracxn Technologies IPO

Tracxn Technologiesमध्ये गुंतवणूक केलेल्या काही प्रमुख गुंतवणूकदारांमध्ये टाटा ग्रुपचे रतन टाटा, फ्लिपकार्टचे सह-संस्थापक बिन्नी बंसल-सचिन बंसल आणि डेलीव्हरीचे सह-संस्थापक साहिल बरूआ यांच्यासारखे महारथी आहेत.

Tracxn Technologies IPO : ट्रॅक्सन टॅक्नटोलॉजी लिमिडेटचा आयपीओ (IPO) आजपासून (दि. 10 ऑक्टोबर) ओपन झाला आहे. ट्रॅक्सन ही इंटेलिजन्स डाटा प्रोव्हायडर कंपनी असून यामध्ये फ्लिपकार्ट कंपनीनुसुद्धा पैसे गुंतवले आहेत. गुंतवणूकदारांना 12 ऑक्टोबरपर्यंत यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे. ट्रॅक्सन टॅक्नोलॉजी आयपीओच्या इश्यूची प्राईस बॅण्ड 75-80 रुपये आहे. याची एकूण व्हॅल्यू 309 कोटी रुपये इतकी आहे.

Tracxn Technologies कंपनीचा आयपीओ हा पूर्णपणे ऑफर-फॉर-सेल (OFS)साठी उपलब्ध आहे. म्हणजेच आयपीओ अंतर्गत कंपनी नवीन शेअर्स आणणार नाही. उलट कंपनीचे प्रमोटर आणि सध्याचे शेअर होल्डिंग पार्टनर आपल्या हिश्श्याचे शेअर्स विक्रीसाठी ठेवणार आहेत. कंपनीचे प्रमोटर नेहा सिंह आणि अभिषेक गोयल 76.62 - 76.62 लाख शेअर्सची विक्री करणार आहेत. याशिवाय फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल हे त्यांच्याकडे उपलब्ध असलेले 12.63 – 12.63 लाख शेअर्सची विक्री करणार आहेत.


IPO म्हणजे काय  (Initial Public Offering)

निधी उभारण्यासाठी आयपीओ प्रक्रिया कंपन्यांना फायदेशीर असतं. शिवाय यात पारदर्शकताही अधिक असते. शेअर बाजारात नोंदणी नसलेली म्हणजेच असूचीबद्ध कंपनी जेव्हा ती प्रथमच लोकांसाठी सिक्युरिटीज किंवा शेअरच्या विक्रीद्वारे निधी उभारण्याचा निर्णय घेते तेव्हा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (Initial Public Offering  - IPO) जाहीर करते. स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाल्यानंतर, कंपनी सार्वजनिकरित्या व्यापार करणारी कंपनी बनते आणि कंपनीचे शेअर्स खुल्या बाजारात मुक्तपणे व्यवहार करता येतात.

IPO चे प्रकार

जी कंपनी लोकांना शेअर्स जारी करते तिला जारीकर्ता म्हणून संबोधले जाते. IPO चे दोन सामान्य प्रकार आहेत.

निश्चित किंमत ऑफर  (fixed price)

या प्रकारात IPO ला काही कंपन्यांनी त्यांच्या शेअर्सच्या प्रारंभिक विक्रीसाठी सेट केलेली इश्यू किंमत म्हणून संदर्भित केले जाऊ शकते.

बुक बिल्डिंग ऑफर  (book building)

बुक बिल्डिंग ऑफर मध्ये IPO सुरू करणारी कंपनी गुंतवणूकदारांना स्टॉकवर 20% किंमतपट्टा (price band) ऑफर करते. अंतिम किंमत ठरवण्यापूर्वी इच्छुक गुंतवणूकदार शेअरवर बोली लावतात.

IPO Investment Tips!

तुम्ही तुमच्या ध्येयांप्रमाणे आयपीओंमध्ये गुंतवणे गरजेचे आहे. तुम्हाला तुमच्या निर्णयक्षमतेवर आत्मविश्वास वाटत नसेल तर अधिक संशोधन करायला मागे-पुढे पाहू नका किंवा आर्थिक सल्लागारांशी संपर्क साधा. विचारपूर्वक, पद्धतशीर दृष्टीकोन हाच आयपीओंमध्ये गुंतवणूक करण्याची गुरूकिल्ली आहे.

Tracxn Technologies मध्ये पैसे गुंतवणाऱ्या प्रमुख गुंतवणूकदारांमध्ये रतन टाटा, फ्लिपकार्टचे सह-संस्थापक बिन्नी बन्सल-सचिन बन्सल आणि डेलीव्हरीचे सह-संस्थापक साहिल बरूआ यांचा समावेश आहे.

ग्रे मार्केटमध्ये ट्रॅक्सन टेक्नॉलॉजी!

ट्रॅक्सन टेक्नॉलॉजीच्या अनलिस्टेड शेअर्सला ग्रे मार्केटमध्ये काहीच प्रीमिअम मिळालेला नाही. IPO Watch आणि IPO Central या संस्थांच्या मते आतापर्यंत ट्रॅक्सन टेक्नॉलॉजीला प्रीमिअम मिळालेला नाही. Tracxn Technologies च्या शेअर्सचे वाटप 17 ऑक्टोबरला होणार आहे. ज्यांना हा आयपीओ लागलेला आहे. त्यांच्या खात्यात 19 ऑक्टोबरपर्यंत याचे शेअर्स जमा होतील आणि ज्यांना शेअर्स मिळाले नाहीत; त्यांचे पैसे 18 ऑक्टोबरला बॅंकेत जमा होतील. तर ट्रॅक्सनच्या शेअर्सचं लिस्टिंग 20 ऑक्टोबरला होईल.