Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Toyota Price Hike: इनोव्हा आणि फॉर्च्युनर महागली, टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने वाहनांच्या किमती वाढवल्या

Toyota

Toyota Price Hike: सध्या भारतीय बाजारात टोयोटा किर्लोस्कर मोटर्सची 8 कार मॉडेल्स आहेत. यात सर्वात लोकप्रिय असलेल्या एसयूव्ही श्रेणीतील टोयोटा इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड या कारसाठी तब्बल 12 महिन्यांची वेटिंग आहे.

वाहन उत्पादनातील आघाडीची कंपनी टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने मोटारींच्या किंमतीत 1% वाढ केली आहे. 5 जुलै 2023 पासून वाहनांच्या किंमती वाढल्याचे कंपनीने म्हटले आहे. यात लोकप्रिय इनोव्हा क्रिस्टा आणि फॉर्च्युनर या गाड्यांचा समावेश आहे. वाहनांचे सुटे भाग महाग झाले आहेत. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने हा भार ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय कंपनीने घेतला.

ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याला आणि त्यांना सर्वोत्तम प्रोडक्ट देण्यासाठी कंपनी कटिबद्ध आहे. वाढत्या उत्पादन खर्चाचे नियोजन करताना ग्राहकांवर कमीत कमी भार टाकण्याच्या दृष्टीने 1% दरवाढ करण्यात आल्याचे टोयोटा किर्लोस्कर मोटरने निवेदनात म्हटले आहे.

सध्या भारतीय बाजारात टोयोटा किर्लोस्कर मोटर्सची 8 कार मॉडेल्स आहेत. यात सर्वात लोकप्रिय असलेल्या एसयूव्ही श्रेणीतील टोयोटा इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड या कारसाठी तब्बल 12 महिन्यांची वेटिंग आहे.

त्याशिवाय टोयोटा अर्बन क्रूझर या मोटारीसाठी ग्राहकांना 12 महिन्यांहून अधिक काळ प्रतिक्षा करावी लागत आहे. टोयोटा इनोव्हा हायक्रॉस पेट्रोलसाठी 4 महिने, टोयोटा फॉर्च्युनरसाठी 3 महिन्यांचा वेटिंग पिरिएड आहे. टोयोटा ग्लान्झा एमटीसाठी 1 ते 2 महिने, टोयोटा कॅम्रीसाठी 3 महिने आणि टोयोटा वेलफायरसाठी 6 महिन्यांचा प्रतिक्षा कालावधी आहे.

जून महिन्या टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने 18327 मोटारींची विक्री केली होती. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 10.7% वाढ झाली. जून 2022 मध्ये कंपनीने एकूण 16500 मोटारींची विक्री केली होती.

जून महिन्यात कंपनीने भारतातून 1371 मोटारी निर्यात केल्या आहेत. निर्यातीत यंदा 32.9% वाढ झाली. जूनमध्ये एकूण वाहन विक्रीचा विचार केला तर मे 2023 च्या तुलनेत जूनमध्ये वाहन विक्रीत 19% वाढ झाली आहे. यातून टोयोटाच्या कार्सला बाजारात प्रचंड मागणी असल्याचे दिसून येते, असे मत टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष अतुल सूद यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की कंपनीच्या नवीन मॉडेल्सला जसे की अर्बन क्रूझर आणि इनोव्हा हायक्रॉस या कार्सला ग्राहकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे.

इनोव्हा आणि फॉर्च्युनर 40 ते 50 हजारांनी महागल्या

  • टोयोटाची इनोव्हा ही सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही कार आहे. मुंबई शोरुमनुसार इनोव्हा क्रिस्टाची किंमत 23.55 लाखांपासून 31.31 लाख इतकी आहे. यात इन्शुरन्स, आरटीओ नोंदणी आणि इतर शुल्काचा समावेश आहे. कंपनीच्या दरवाढीनंतर इनोव्हा क्रिस्टाची किंमत 35000 ते 40000 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.  
  • टोयोटा फॉर्च्युनर ही एसयूव्ही श्रेणीतील सर्वात लोकप्रिय कार आहे. फॉर्च्युनरची मुंबईत एक्स शोरुम किंमत 39.56 लाखांपासून 61.56 लाख इतकी आहे. यात आरटीओ चार्जेस, इन्शुरन्स यांचा समावेश आहे. कंपनीने 1% दरवाढ केल्याने फॉर्च्युनरच्या किंमतीत किमान 50000 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.