सणासुदीत शाॅपिग करायची प्लॅनिंग बरेच जण आधीपासूनच करतात. त्यामुळे त्या गोष्टींसाठी पैसा आधीच लावून ठेवला जातो. मात्र, तरीदेखील सर्वच जणांच्या बाबतीत ही गोष्ट घडणे शक्य नसते. त्यामुळे तुम्ही जर क्रेडिट कार्डचा वापर करुन खरेदी करायचा प्लॅन बनवत असाल तर तुमच्याजवळ बजेट, ऑफर्स यांची यादी असणे आवश्यक आहे. चला तर मग त्याविषयी पाहूया.
बजेटची बनवा यादी
आपल्याला पाहिजे त्या वस्तू विकत घेणे क्रेडिट कार्डवरुन शक्य असल्यास कोणाला ते नको आहे. पण, त्यासाठी योग्य बजेट सेट केल्यास, क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केलेल्या वस्तूचे पैसे परत करायला सोप जाऊ शकते. त्यामुळे सणासुदीत खरेदी करायचा विचार करत असाल तर आधी खरेदीचा पूर्ण बजेट लिहून काढा.
त्यामुळे वस्तूनुसार खर्च करता येतो. तसेच, आगाऊचा खर्च होण्याची रिस्क कमी राहते. याशिवाय, तुमच्यावर आधीच काही लोन असेल किंवा अन्य आर्थिक जबाबदाऱ्या असतील तर त्याचा ही विचार तुम्हाला करावा लागणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे सगळी शाॅपिंग तुमच्या मासिक कमाईला ध्यानात घेऊन करणे, योग्य ठरु शकतं.
निवडा योग्य क्रेडिट कार्ड
मार्केटमध्ये ज्या क्रेडिट कार्डवर रिवार्ड, कॅशबॅक किंवा जास्त सवलत असणारे क्रेडिट कार्ड निवडा. कारण, मार्केटमध्ये सणासुदीच्या हिशोबाने काही कंपन्या कार्ड डिझाईन करतात. ते जर तुम्ही घेतले तर तुम्हाला त्यावर अधिक कॅशबॅक आणि झिरो-व्याजदर EMI सारखे पर्याय मिळू शकतात. याशिवाय, तुमचा एकूण खर्च नियंत्रित करण्यासाठी वार्षिक चार्जेस कमी किंवा कमी व्याजदर असलेले कार्डच घेण्याचा विचार करा. कारण, यामुळे तुमची मोठी बचत होऊ शकते.
क्रेडिट लिमिट चेक करणे आवश्यक
क्रेडिट कार्डचा वापर करण्याआधी तुमच्या कार्डाची लिमिट किती आहे, याविषयी माहिती करुन घ्या. तुम्ही लिमिट ओलांडल्यास तुम्हाला जास्त दंड द्यावा लागू शकतो. तसेच, याचा तुमच्या क्रेडिट कार्डवर देखील परिणाम होऊ शकतो. यासाठी तुम्ही तुमच्या कार्ड जारीकर्त्याला कार्डची लिमिट तात्पुरती वाढवून देण्याची विनंती करु शकता. ही गोष्ट तेव्हाच करा, जेव्हा तुम्ही ती योग्यरित्या मॅनेज करु शकाल.
या काही गोष्टी क्रेडिट कार्डवरुन शाॅपिंग करताना तुम्ही लक्षात ठेवल्यास, तुमची बरीच बचत होऊ शकते. कारण, प्रत्येक ठिकाणी ऑफर्स सुरू असतात, त्यामुळे त्यावर तुम्ही लक्ष ठेवल्यास तुमचा फायदा होऊ शकतो.