Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Top Gainer-Losers Today: शेअर मार्केटमधील आज 'हे' शेअर वधारले तर या शेअरमध्ये घसरण

Top Gainer Losers Today

बाजाराची सुरुवात सकारात्मक होऊन, दुपारी 1 नंतर पुन्हा बाजारात घसरण सुरू झाली. सेन्सेक्स 163 अंकांनी घसरून 59,451 अंकांवर आला तर निफ्टी निर्देशांक 58 अंकांनी घसरून 17,461 अंकांवर आला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी निर्देशांकातील एशियन पेंट्स कंपनीचा शेअर 1.21% नी वधारुन 2,738.70 वर गेला. तर Divis Labs या फार्मा कंपनीच्या शेअरने 1.20% वाढ नोंदवली.

सलग चार दिवसांपासून शेअर बाजारात घसरण होत होती, या घसरणीला आज (शुक्रवार) दिनांक 24 फेब्रुवारी रोजी ब्रेक लागला. सकाळी 09:18 वाजता बाजार गडगडल्यावर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ( BSE) निर्देशांक सेन्सेक्स 245.25 अंकांच्या म्हणजेच 0.41 टक्क्यांनी वर गेला होता. तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी (NSE Nifty) 67.30 अंकांच्या म्हणजेच 0.38 टक्क्यांची वाढ दिसून आली होती.

बाजाराची सुरुवात सकारात्मक होऊन, दुपारी 1 नंतर पुन्हा बाजारात घसरण सुरू झाली. सेन्सेक्स 163 अंकांनी घसरुन 59,451 अंकांवर आला तर निफ्टी निर्देशांक 58 अंकांनी घसरुन 17,461 अंकांवर आला.

कोणत्या कंपन्यांचे शेअर्स वधारले (Top Gainers)

राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी निर्देशांकातील एशियन पेंट्स कंपनीचा शेअर 1.21% नी वधारुन 2,738.70 वर गेला. तर Divis Labs या फार्मा कंपनीच्या शेअरने 1.20% वाढ नोंदवली. कोल इंडिया, अॅक्सिस बँक आणि बजाज फायनान्स या कंपन्याच्या शेअर्समध्ये अनुक्रमे 0.84%,1.03% आणि 0.88% वाढ झाली. ONGC कंपनीच्या शेअर्सची किंमतही आज वधारली. OLECTRA GREENTECH LTD कंपनीचा शेअर्स 19.66% वधारला. GAIL, वरपूल, Dixon Technology, Aarti Ind या कंपन्यांचेही शेअर्स वधारले.

कोणत्या कंपन्यांचे शेअर्स घसरले (Top Losers)

अदानी एंटरप्राइजेस, हिंदाल्को, JSW स्टील, टाटा स्टील आणि आयटीसी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. अदानी एंटरप्राइजेसचा शेअर 6.61%. खाली आला. काल अदानी समूहातील दहाही कंपन्यांचे शेअर्सचे भाव कोसळले होते. अदानी समूहाच्या 10 सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स 80% पेक्षा जास्त घसरले आहेत आणि त्यांचे एकूण मार्केट कॅप $ 146 अब्ज किंवा सुमारे 60% कमी आहे.

52 आठवड्यातील उच्चांक गाठलेले शेअर्स (52 week Highest)

एनएसई निफ्टी निर्देशांकावर 20 कंपन्यांचे शेअर्स 52 आठवड्याच्या उच्चांकावर पोहचले. यामध्ये अनुप इंजिनिअरिंग, Cyient, GNA Axles, फिनोलेक्स केबल्स, न्युक्लिअस सॉफ्टवेअर, जिंदाल, महिंद्रा ऑटोमोटिव्ह, NINtec Systems, महालक्षमी रबटेक, गोयल अल्युमिनियम, अरोन इंडस्ट्रीज या काही कंपन्यांचा समावेश आहे.

52 आठवड्यातील निच्चांक गाठलेले शेअर्स (52 week lowest)

तर बायोकॉन, लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्री, अदानी ग्रीन पावर, मोतीलाल ओसवाल, अदानी टोटल गॅस, IPCA Laboratories, Godrej Properties सह 119 कंपन्यांचे शेअर्स 52 आठवड्यांच्या निचांकी स्तरावर पोहचले. निफ्टी मेटल निर्देशांक 2.81% तर मीडिया निफ्टी 0.5% खाली आला.

सार्वजनिक क्षेत्रातील बँक क्षेत्रातील शेअर्सची खरेदी वाढली. एचडीएफसी बँकेने डॉलर बाँडची विक्री केली, या विक्रीतून तब्बल 75 कोटी रुपये जमवले. अमेरिकेसह, आशियाई शेअर बाजारांमध्ये कमी अधिक प्रमाणात तेजी दिसून आली होती, तसेच सिंगापूर एक्सचेंजवर निफ्टी फ्युचर्स 50 अंकांच्या किंवा 0.28 टक्क्यांच्या वाढीसह 17 हजार 641 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता. हेच सकारात्मक चित्र शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात दिसून येत आहे.

(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)