Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Expensive Schools in India : जाणून घ्या, भारतातील सर्वात महाग टॉप 10 शाळा कोणत्या आहेत?

Expensive Schools in India : जाणून घ्या, भारतातील सर्वात महाग टॉप 10 शाळा कोणत्या आहेत?

Image Source : www.uniformapp.in

प्रत्येक पालकाला त्यांच्या मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे असे वाटते. परंतु शिक्षण क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे मुलांसाठी कोणत्या शाळेची निवड करायची हा मोठा प्रश्न पालकांसमोर निर्माण होतो. त्यातच दर्जेदार शिक्षणाला प्राधान्य द्यायचे ठरवले तरी अशा शिक्षण संस्थांकडून आकारण्यात येणारे शुल्क खूपच महाग आहे. आज आपण भारतामधील सर्वात महाग शाळांची माहिती जाणून घेऊ

भारतामध्ये दर्जेदार शिक्षण देणाऱ्या अनेक संस्था उपलब्ध आहेत. त्यामध्ये सरकारी अनुदानातून चालणाऱ्या शाळांपासून वर्षाला 9 ते 10 लाख रुपये फी घेणाऱ्याही संस्थांचा समावेश आहे.  प्रत्येक पालकाला त्यांच्या मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे असे वाटते. परंतु शिक्षण क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे मुलांसाठी कोणत्या शाळेची निवड करायची हा मोठा प्रश्न पालकांसमोर निर्माण होतो. त्यातच दर्जेदार शिक्षणाला प्राधान्य द्यायचे ठरवले तरी अशा शिक्षण संस्थांकडून आकारण्यात येणारे शुल्क खूपच महाग आहे. जे सर्व सामान्यांच्या आवाक्या बाहेर आहे. आज आपण भारतामधील दर्जेदार शिक्षण देणाऱ्या, परंतु सर्वात महागड्या 10 शिक्षण संस्थांची माहिती जाणून घेऊयात.

बिशप कॉटन स्कूल, शिमला Bishop Cotton School, Shimla

हिमाचल प्रदेशातील शिमला येथील बिशप कॉटन स्कूल ही एक भारतामधील दर्जेदार शिक्षण देणारी एक नावाजलेली शाळा आहे. बिशप कॉटन शाळा ही मुलांसाठीची निवासी शाळा आहे. केंब्रिज इंटरनॅशनल बोर्डाची मान्यता असलेल्या शाळेला तब्बल 165 वर्षांहून अधिक काळाच्या गौरवशाली इतिहास आहे. शिमला सारख्या निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या या शाळेची वार्षिक फी 5 लाख ते 6 लाख रुपये इतकी आहे.

लॉरेन्स स्कूल, सनावर Lawrence School, Sanawar 

हिमाचल प्रदेशातील सनावर येथे 1847 मध्ये स्थापन झालेली ही शाळा आशिया खंडातील एकमेव पहिली निवासी शाळा म्हणून ओळखली जाते. CBSE बोर्डाशी संलग्न असलेल्या या शाळेत संपूर्ण भारतभरातील विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवेश घेतात. या शाळेत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबत त्याच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास आणि त्यांच्यातील सर्जनशीलतेचा विकास करण्यासाठी विशेष लक्ष दिले जाते. या शाळेची वार्षिक फी 5 लाख ते 7 लाख रुपये आहे.

कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल, मुंबई Cathedral & John Connon School

देशाची आर्थिक राजाधानीचे शहर असलेल्या मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल हे शिक्षण क्षेत्रातील नामाकिंत स्कूल म्हणून ओळखले जाते.  मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित हेरिटेज इमारतींपैकी एक असलेल्या सुंदर दगडी इमारतीमध्ये स्थित, द कॅथेड्रल आणि जॉन कॉनन शाळेस तब्बल 162 वर्षांची दर्जेदार शिक्षणाची पंरपरा आहे. या शाळेची वार्षिक फी ही  जवळपास  5 लाख ते 7 लाख रुपये या दरम्यान आहे. ही शाळा पाच विभागांमध्ये कार्यरत  आहे.त्यामध्ये पूर्व-प्राथमिक,एलकेजी, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सुरू आहे.

most-expensive-schools-in-india-1.jpg
वेल्हॅम बॉईज स्कूल, डेहराडून Welham Boys School, Dehradun

वेल्हॅम बॉईज स्कूल हे उत्तराखंड राज्यातील डेहराडून स्थित एक निवासी शाळा आहे. ही फक्त मुलांसाठी निवासी शाळा असून CBSE बोर्डाशी संलग्न आहे. देशातील उत्कृष्ट शाळाच्या क्रमवारीनुसार 2022 मध्ये या शाळेचा पहिला क्रमांक म्हणून उल्लेख झाला आहे. हिमालयाच्या पायथ्याशी 30 एकराच्या विस्तीर्ण परिसरात हिमालयाच्या कुशीत वसलेली एक निसर्गरम्य आणि उत्कृष्ट शिक्षणासाठी नावाजलेली शाळा आहे. या शाळेत देशभरातील वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे. या शाळेची वार्षिक फी 6 लाख ते 7 लाख रुपये आकारण्यात येते.

सिंधिया स्कूल, ग्वाल्हेर  Scindia School, Gwalior

मध्यप्रदेशातील ऐतिहासिक शहर ग्वाल्हेरमध्ये असलेली सिंधिया स्कूल ही एक प्रसिद्ध शाळा आहे. CBSE बोर्डाशी संलग्न असलेल्या या शाळेस"द सरदार स्कूल" म्हणूनही ओळखले जाते. सिंधिया शाळा ही मुलांसाठीची खासगी निवासी शाळा आहे. या शाळेची स्थापना 1897 मध्ये करण्यात आली. विशेष म्हणजे ग्वाल्हेर शहरातील ऐतिहासिक ग्वाल्हेर किल्ल्यावर ही मोठी भव्य दिव्य आणि दिमाखदार शाळा आहे. या शाळेची वार्षिक फी 6 लाख ते 7 लाख रुपये इतकी आहे.


मेयो कॉलेज, अजमेर Mayo College, Ajmer 

राजस्थानमधील अजमेर येथील ऑल-बॉईज मेयो कॉलेजची स्थापना भारतीय संस्कृतीत रुजलेल्या भारतीय उच्चभ्रूंना आधुनिक शिक्षण देण्यासाठी करण्यात आली होती. मेयो कॉलेजमधील अभ्यासक्रमात तंत्रज्ञान, क्रीडा, ललित कला, संगीत आणि नाट्य यांचा समावेश आहे. मेयो कॉलेज हे फक्त मुलांसाठी असलेली खासगी निवासी शाळा आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील दृष्टीकोण विकसीत व्हावा यासाठी   दरवर्षी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, जर्मनी, फ्रान्स, यूएसए आणि यूके सारख्या देशांतील कार्यक्रम आणि प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. या शाळेची वार्षिक फी 6 लाख ते 8 लाख रुपये इतकी आहे.

गुड शेफर्ड इंटरनॅशनल स्कूल, ऊटी  Good Shepherd International School, Ooty  

तामिळनाडूतील निलगिरी  पर्वत रांगामध्ये उटी या थंड हवेच्या ठिकाणी वसलेली गुड शेफर्ड इंटरनॅशनल शाळा ही निवासी शाळा आहे. 1977 मध्ये स्थापन झालेल्या या शाळेस उत्कृष्ट शिक्षणासाठी नावाजलेली शाळा म्हणून ओळख मिळाली आहे. ही शाळा त्यांच्या शैक्षणिक पद्धतींसाठी प्रसिद्ध आहे.या शाळेची वार्षिक फी 6 लाख ते 8 लाख रुपये आकारली जाते.


इकोले मोंडिएल वर्ल्ड स्कूल, मुंबई - Ecole Mondiale World School, Mumbai

इकोले मोंडियाल वर्ल्ड स्कूल ही मुंबई स्थित शाळा आहे.  2004 मध्ये या शाळेची स्थापना झाली आहे.  इंग्रजी माध्यमात ही शाळा IGCSE बोर्डाशी संलग्न आहे.  3 ते 19 वयोगटातील मुलांसाठी आंतरराष्ट्रीय स्तराच्या उत्कृष्ट शिक्षणासाठी या शाळेचा नावलौकीक आहे.  चे या शाळेची वार्षिक फी 7 लाख ते 9लाख रुपये आकारली जाते.

वुडस्टॉक स्कूल, मसूरी  Woodstock School, Mussoorie 

वुडस्टॉक शाळा ही मसुरी येथे स्थित एक सुप्रसिद्ध निवासी शाळा आहे. ही भारतातील सर्वात महागड्या शाळांपैकी एक आहे. वुडस्टॉक ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील (IB) उत्कृष्ट शाळा आहे. या शाळेत जगभरातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी प्राधान्य देतात. या शाळेची वार्षिक फी  9 लाख ते 10 लाख रुपये इतकी आहे.

दून स्कूल, डेहराडून The Doon School, Dehradun

डून शाळा ही डेहराडून, उत्तराखंड, भारतातील निवडक मुलांची खाजगी बोर्डिंग शाळा आहे, ज्याची स्थापना १९३५ मध्ये झाली ही संपूर्ण देशातील सर्वोत्तम आणि सर्वात महाग संस्था आहे. या शाळेस अनेक संशोधन संस्थांकडून सर्वोत्कृष्ट शाळांच्या यादीमध्ये स्थान देण्यात आले आहे. ही संस्था सर्वोच्च दर्जाचे शिक्षण देते. यासाठी शाळेकडून वर्षाला 9 लाख ते 10 लाख रुपये फी आकरण्यात येते.

या सर्व शाळा इतर शाळांच्या तुलनेत देश आणि जागतिक पातळीवर नावाजलेल्या आहेत. या शाळाकंडून आकारण्यात आलेली फी सर्व सामान्यांच्या बजेटच्या बाहेर आहे. उच्च शिक्षण देणे ही काळाजी गरज झाली. याचा अर्थ असा होत नाही की सरकारी अनुदानित शाळेत चांगले शिक्षण मिळणार नाही. मात्र, स्थानिक शाळेला काही मर्यादा येतात. त्यामुळेच अशा आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन ठेवून शिक्षण देणाऱ्या शाळांची फी देखील तेवढीच भरमसाठ आहे.