Stocks in News: हिंदुस्थान अॅरॉनॉटिक्स संचालक मंडळाची 10 मार्च रोजी बैठक होणार असून या बैठकीत कंपनी 2022-23 या आर्थिक वर्षातील दुसरा लाभांश जाहीर करण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय हवाई दलासाठी 70 HIT-40 या मॉडेलची विमाने हिंदुस्थान अॅरोनॉटिक्स लिमिटेड (Hindustan Aeronautics Limited) कंपनीकडून 6800 कोटी रुपयांना खरेदी करण्यास मान्यता दिली. या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान अॅरोनॉटिक्स कंपनीच्या शेअर्समध्ये आज जोरदार खरेदी-विक्री होण्याची शक्यता आहे.
Table of contents [Show]
Rail Vikas Nigam Limited (रेल विकास निगम लिमिटेड)
रेल विकास निगम लिमिटेडने वंदे भारत या ट्रेनच्या निर्मिती आणि देखभारदुरूस्तीसाठी भागादारीतून सर्वांत कमी बोली लावली आहे.
बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv)
बजाज फिनसर्व्ह या नॉन-बॅंकिंग फायनान्स कंपनीला म्युच्युअल फंड सुरू करण्यासाठी सेबीने परवानगी दिली आहे. बजाज फिनसर्व्ह लवकरच त्यादृष्टिने बाजारात आपले म्युच्युअल फंडचे प्रोडक्ट आणेल.
डेलिव्हेरी (Delhivery)
जपानमधील एक मल्टीनॅशनल ग्रुप सॉफ्टबॅंक समुहाने डेलिव्हेरीमधील 3.8 टक्के भाग 954 कोटी रुपयांना विकला आहे.
केएनआर कन्स्ट्रक्शन (K N Constructions)
केएनआर कन्स्ट्रक्शन कंपनीला आंध्र प्रदेशमधील ग्रीनफिल्ड हायवेच्या कामासाठी 665 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. हा ग्रीनफिल्ड हायवे 6 लेनचा असणार आहे.
ऑटो कंपन्या (Auto Company)
आज शेअर मार्केटमध्ये ऑटो कंपन्यांची चलती असण्याची शक्यता आहे. कारण बुधवारी (दि. 1 मार्च) बऱ्याच कंपन्यांनी फेब्रुवारी महिन्यातील गाड्यांच्या विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. त्यामुळे या कंपन्यांमध्ये आज अप-डाऊन असू शकते.
अॅक्सिस बॅंक (Axis Bank)
अॅक्सिस बॅंकेने बुधवारी (दि. 1मार्च) सिटी बॅंकेच्या विलिनीकरणाची प्रक्रिया पू्र्ण केली असून, सिटी बॅंकेच्या ग्राहकांना 1 मार्चमासून अॅक्सिस बॅंकेच्या सिस्टिममध्ये सामावून घेण्यात आले. कॉम्पिटेशन कमिशन ऑफ इंडियाने (Competition Commission of India-CCI) मंजुरी दिल्यानंतर अॅक्सिस बॅंकेने 7 महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण केली.
एल अॅण्ड टी(L&T)
सरकारने लार्सन अॅण्ड टर्बो (L&T) कंपनीकडून 3,110 कोटी रुपयांना प्रशिक्षणासाठीची 3 जहाजे खरेदी करण्यास मान्यता दिली आहे.
भारत फोर्ज (Bharat Forge)
भारत फोर्जची पूर्ण मालकी असलेल्या बी एफ इन्फ्रास्ट्रक्चर (BF Infrastructure) या कंपनीने पीएनसी इन्फ्राटेक आणि फेरोव्हिया ट्रान्सरेल सोल्युशनसोबत फेरोव्हियामधील सुमारे 51 टक्के भाग खरेदी करण्यासाठी करार केला आहे.
शेअर मार्केटवर ही आजुबाजूला होणाऱ्या घडामोडींवर नेहमी प्रतिक्रिया देत असते. परिणामी वर दिलेल्या कंपन्यांनामधील या घडमोडींमुळे आज शेअर मार्केटमध्ये या कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी-विक्रीची शक्यता दिसून आहे.
(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. ‘महामनी’ शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)