5 G Launch : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (दि. 1 ऑक्टोबर) दिल्लीत 5G सेवेचं उद्घाटन झालं. 5G ही 4G सेवेची पुढील आवृत्ती असणार असून ती मोबाईल ग्राहकांना थेट क्लाऊडशी कनेक्ट करणार आहे. तसेच 5Gचा स्पीड हा 4G पेक्षा तब्बल 10 पट अधिक असणार आहे. यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी आणि रिलायन्स जिओचे संचालक आकाश अंबानी उपस्थित होते. आकाश अंबानी यांनी स्वत: मोदींना 5G सेवेची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे दाखवली.
5G म्हणजे काय?
5G ही मोबाईल नेटवर्कची पाचवी आवृत्ती आहे. नेटवर्क स्पीड, अखंडित एचडी सर्फिंग, बेस्ट सर्व्हिस ही 5G ची वैशिष्ट्य असणार आहेत. अर्थात मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेटच्या दुनियेत 4G च्या एक पाऊल पुढे नेणारी ही आवृत्ती असणार आहे. केंद्र सरकारने या 5G ला परवानगी दिली असून लवकरच ही सेवा कंपन्यांद्वारे सुरू होण्याची शक्यता आहे.
5Gने ग्राहकांचा फायदा काय?
5Gच्या मदतीने मोबाईल ग्राहकांना अधिक वेगवान स्पीडचा आनंद घेता येणार आहे. काही सेकंदात जीबीमधील व्हिडिओ डाऊनलोड करता येतील. एकूणच इंटरनेचा जिथेजिथे वापर केला जाणार आहे. तिथल्या सेवांवर 5Gचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. उद्योग क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या रोबोटिक्स टेक्नॉलॉजीमध्ये आणखी जलद गतीने काम होईल आणि याद्वारे केले जाणारे काम अचूक होण्यास मदत होईल. इतर क्षेत्रांसह शेतकऱ्यांसाठी 5Gचा खूप चांगला वापर होणार आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने शेतीमध्ये ड्रोनचा वापर करण्यावर भर दिला आहे. यासाठी सरकारकडून विविधप्रकारे अनुदान ही दिले जाणार आहे. याचा शेतकऱ्यांना पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे.
मोबाईल फोन बदलावा लागणार का?
फोन बदलावा लागणार का, हे आता थेट सांगता येणार नाही. पण तरीही बऱ्याच कंपन्यांनी 5G कॉम्पिटेबल असणाऱ्या मोबाईल फोनची निर्मिती केली आहे. तंत्रज्ञानात दिवसादिवसाला बदल होत असतात. त्यामुळे ग्राहकांनी लगेच मोबाईल फोन बदलण्याची गरज नाही. दरम्यान 4G जेव्हा आलं होतं, तेव्हा मोबाईल फोन बदलावे लागले होते.
5Gचा आरोग्यावर परिणाम होणार का?
5G नेटवर्क सेवेचा आरोग्यावर अधिक परिणाम होणार का? या प्रश्नाबाबतही अनेकांमध्ये संभ्रम आहे. मुळात मोबाईल नेटवर्कमधून बाहेर पडणाऱ्या ध्वनी लहरींमुळे पक्षी, प्राणी आणि माणसांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याच्या पिटिशन कोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत. दरम्यान, जागतिक पातळीवरील संघटनांमध्येही याबाबत एकमत झालेलं नाही.
सरकारने टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या 5G ट्रायल्स घेण्यासाठी परवानगी दिली असून 800 मेगाहर्टज, 900 मेगाहर्टज, 1800 मेगाहर्टज आणि 2500 मेगाहर्टज् या बॅण्डसला परवानगी दिली आहे. 5G स्पेक्ट्रमचा लिलाव (5g spectrum auction) 20 वर्षांसाठी केला जाणार आहे. लिलावामध्ये सर्वाधिक बोली लावणाऱ्या कंपनीला 5G सेवा (5g auction approved) वापण्याची संधी दिली जाणार आहे.