Credit Card Payment: क्रेडिट कार्डचं पेमेंट एक दिवसही उशीर केल्यास सिबिल स्कोर खाली येऊ शकतो का? तर हो नक्कीच. त्यामुळे क्रेडिट कार्ड किंवा इतर कोणतेही कार्ड पेमेंट EMI पेमेंट करण्यास जर तुम्ही 1 दिवस जरी दुर्लक्ष करत असाल तर तुमचा क्रेडिट स्कोअर खाली येऊन तुम्ही अडचणीत याल. एका दिवसाच्या चुकीमुळे खाली गेलेला स्कोअर पुन्हा वर आणण्यासाठी खूप महिने लागू शकतात.
कार्ड पेमेंटची तारीख चुकू नये असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या टिप्स फॉलो करा.
ऑटो पेमेंट सेट करा
क्रेडिट कार्डचे पेमेंट करताना तारीख मिस होऊ नये यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे ऑटो पेमेंट सेट करा. म्हणजे तुम्हाला शेवटची तारीख लक्षात ठेवण्याची चिंता नाही. तुम्ही जी तारीख सेट केली आहे त्या तारखेला ऑटोमॅटिक पेमेंट होईल. कमीत कमी रक्कम (मिनिमल बॅलन्स) किंवा सर्व रक्कम भरण्याचा पर्याय तुमच्याकडे असतो. मात्र, फुल पेमेंट करण्याचा पर्याय जास्त योग्य ठरतो.
शेवटच्या तारखेची नोंद करा
जर तुम्ही ऑटो पेमेंट सेट केले नसेल तर शेवटच्या तारखेच्या आधी काही दिवस पेमेंट रिमाइंटर सेट करा. हा रिमाइंटर तुम्ही स्मार्ट फोनमध्ये सेट करू शकता. किंवा तुमच्या घरातील कॅलेंडरवर देखील मार्क करून ठेवू शकता. बऱ्याच वेळा कामाच्या घाईगरबडीत पेमेंटची तारीख विसरून जाते.
पेमेंट अॅपमध्ये नोटिफिकेशन सेट करा
तुम्हाला कॅलेंडर किंवा मोबाइलमध्ये रिमाइंडर सेट करण्याची गरज नाही. (Credit Card Payment tips) तुम्ही बँकेच्या अॅपमधील रिमाइंडर सुविधाही वापरू शकता. तारीख संपण्याचा दोन चार दिवस आधीचा रिमाइंडर तुम्ही अॅपमध्ये सेट करू शकता. मेसेज आणि मेलद्वारे तुम्हाला अलर्ट येईल.
क्रेडिट कार्ड बिल जेव्हा तयार होते त्या दिवसाचा देखील तुम्ही रिमाइंडर लावू शकता. त्यानंतर सुमारे पंधरा दिवस बिल पेमेंट करण्यासाठी मिळतात. मात्र, ज्या दिवशी क्रेडिट कार्ड बिल जनरेट होते त्यादिवशी तुम्ही पेमेंट करून निश्चिंत होऊ शकता.
पेमेंट अॅपचा वापर
क्रेडिट कार्डचे पेमेंट करण्यासाठी गुगल, पे, फोन पे, क्रेड अशा अॅपचा वापरही करू शकता. यामध्येही तुम्ही पेमेंट तारीख सेट करू शकता. याचा फायदा म्हणजे रेग्युलर बँक अॅपपेक्षा या अॅप्सवरून पेमेंट केल्यास जास्त रिवॉर्ड पॉइंट आणि कॅशबॅक मिळू शकतो. या ऑफर तुम्ही ऑनलाइन शॉपिंग, हॉटेल, ट्रॅव्हल आणि इतर अनेक गोष्टींसाठी वापरू शकता.
एकाच वेळी सर्व पेमेंट करा
तुमच्याकडे एका पेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असतील तर तारखा आणि रिमाइंडर डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे एका महिन्यामध्ये विविध कार्डवरून केलेल्या व्यवहारांचे पेमेंट एकाच दिवशी करा. त्यामुळे संपूर्ण महिना पेमेंट केले की नाही याची धाकधूक मनामध्ये राहणार नाही.