Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tax on Agriculture Land: शेत जमिनीची विक्री करून मिळालेल्या पैशांवर किती टॅक्स आकारला जातो?

Tax on agriculture land

Tax on Agriculture Land: शेत जमिनीची विक्री करून मिळालेले पैसे इतरत्र गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. कारण गेल्या काही वर्षात शेत जमिनीच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पण शेत जमीन विकून मिळालेल्या पैशांवर टॅक्स आकारला जातो का? तो किती आकारला जातो? याबाबतची माहिती आपण समजून घेणार आहोत.

Tax on Agriculture Land: अनेकदा ग्रामीण भागात किंवा शहराला लागून असलेले शेतकरी आपल्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी वडिलोपार्जित जमिनी विकत आहेत. जमिनीच्या गुणवत्तेनुसार या जमिनीचा भाव ठरतो. शेत जमिनीच्या विक्रीतून शेतकऱ्यांना लाखो रुपये मिळत आहेत. पण इन्कम टॅक्स विभाग अशाप्रकारे मिळालेल्या पैशांवर टॅक्स आकारतो का? टॅक्स आकारला जात असेल तर तो लागू नये म्हणून कोणते पर्याय उपलब्ध आहेत. अशा प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.

शेतजमिनीच्या विक्रीवर टॅक्स आकारला जात नाही

शेत जमिनीच्या विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नावर कुठलाही इन्कम टॅक्स आकारला जात नाही. इन्कम टॅक्स कायदा 1961 अंतर्गत तशी तरतूद आहे. त्यानुसार भांडवली मालमत्तेची विक्री केल्यास त्यावर टॅक्स आकारला जात नाही. नियमानुसार ज्या गावातील शेत जमिनीची विक्री करायची आहे. त्या गावातील एकूण लोकसंख्या 10 हजारांपेक्षा कमी असल्यास त्या जमीनीच्या विक्रीवर टॅक्स आकारला जात नाही. तसेच शहराच्या हद्दीपासून ही शेतजमीन 2 ते 8 किलोमीटरच्या आत असल्यास त्याच्या विक्रीतून झालेल्या भांडवली नफ्यावर (Capital Gain) टॅक्स आकारला जातो. 

शेतजमिनीची विक्री केल्यानंतरच्या उत्पन्नावर कुठल्या प्रकरणांमध्ये टॅक्स आकारला जातो, हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. कारण शेतजमिनीची गणना भांडवली मालमत्ता म्हणून झाल्यास व ही जमीन 24 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी एका मालकाच्या ताब्यात असल्यास त्यातून मिळालेल्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर टॅक्स भरावा लागेल.

या नियमांनुसार मिळू शकते टॅक्समध्ये सवलत

  • इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 54B नुसार शेतजमीन विकून मिळवलेल्या पैशांवर दीर्घकाळासाठी भांडवली नफा कर भरावा लागत असल्यास, दुसऱ्या जमिनीची खरेदी करून कर सवलत मिळवू शकतो. नियमांनुसार 2 वर्षांच्या आत ही जमीन खरेदी न केल्यास कलम 139 नुसार कॅपिटल गेन अकाऊंट स्कीममध्ये हे पैसे गुंतवून कर सवलतही मिळू शकते. 
  • 6 महिन्यांच्या आत शेतजमिनीची विक्री करून मिळणारा भांडवली नफा बॉन्डमध्ये गुंतवला, तर इन्कम टॅक्स विभागाच्या कलम 54EC नुसार LTCG नुसार सूट मिळू शकते.
  • जर तुम्ही शेतजमिनीच्या विक्रीतून मिळणारा भांडवली नफा 6 महिन्यांच्या आत बॉण्डमध्ये गुंतवला तरी टॅक्समध्ये सूट मिळू शकते. अशाप्रकारे, एका आर्थिक वर्षात 50 लाख रुपयांवर LTCG मिळू शकतो.


इन्कम टॅक्स विभागाच्या कलम 54F नुसार शेतजमिनीच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांतून बांधकाम केले असेल, तर LTCG मध्ये सूट मिळते. तसेच बांधकामात गुंतवणूक केल्यास त्या रकमेवर कर सवलत मिळते. फक्त या सुविधेचा लाभ घेताना सदर व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त घरे नसली पाहिजेत.

Source- www.hindi.news18.com