FD गुंतवणुकीचा बेस्ट आणि सेफ पर्याय असला तरी जिथे व्याजदर जास्त मिळणार आहे, अशाच ठिकाणी गुंतवणूक केल्यास फायदा होऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी बॅंकेची हिस्ट्री चेक करणे आपल्याच हातात आहे. सध्या बऱ्याच स्माॅल फायनान्स बॅंका FD वर खूप चांगला व्याजदर देत आहेत. त्यापैकी एक इक्विटास स्माॅल फायनान्स बॅंक आहे. जी ज्येष्ठ नागरिकांना 444 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 9 टक्के व्याज देत आहे तर सामान्य नागरिकांना याच मुदतीसाठी 8.5 टक्के व्याज देत आहे. वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार हे व्याजदर 21 ऑगस्टपासून लागू आहेत. विशेष म्हणजे 2 कोटींपेक्षा कमी असलेल्या रकमेवरच हे व्याजदर देण्यात येणार आहेत.
सामान्यांना मिळत आहे 8.5 टक्के व्याज
बॅंक 7 दिवस ते 29 दिवस मुदतीच्या FD वर 3.5 टक्के व्याज देत आहे. तेच 91 दिवस ते 180 दिवसाच्या मुदतीच्या FD वर 5.25 टक्के व्याज दिले जात आहे. 181 दिवस ते 364 दिवस मुदतीच्या FD वर बॅंक 6.25 टक्के व्याज देत आहे. तर 1 वर्ष मुदतीच्या FD वर 8.2 टक्के व्याज मिळत आहे़. तसेच, बॅंक 1 वर्ष आणि आणि 1 दिवस मुदतीच्या FD वर 8 टक्के व्याज देत आहे. याचबरोबर 367 दिवस ते 443 दिवस मुदतीच्या FD वर 8.2 टक्के व्याज देत आहे. 444 दिवस मुदतीच्या FD वर 8.5 टक्के व्याज दिले जात आहे. तर 18 महिने आणि 1 दिवस ते 2 वर्ष मुदतीच्या FD वर बॅंक 7.75 टक्के व्याज देत आहे.
ज्येष्ठांना मिळत आहे 9 टक्के व्याज
इक्विटास स्माॅल फायनान्स बॅंक सामान्य ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या व्याजापेक्षा 0.50 टक्के जास्त व्याज ज्येष्ठ नागरिकांना देत आहे. यामुळे 444 दिवस मुदतीच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 9 टक्के व्याजदर दिले जात आहे. तसेच, मुदतीच्या आधी ज्येष्ठ नागरिकांनी FD तून पैसे काढल्यास, त्यांना पेनल्टी लागणार नाही. याचबरोबर ग्राहकांना नाॅमिनेशची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
इक्विटास स्माॅल फायनान्स बॅंक
इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेची (आधीची इक्विटास मायक्रोफायनान्स लिमिटेड) स्थापना 2016 मध्ये स्माॅल फायनान्स बॅंक म्हणून करण्यात आली. या बँकेचे मुख्यालय चेन्नई येथे असून ती इक्विटास होल्डिंग्ज लिमिटेड कंपनीची उपकंपनी आहे. बॅंकेच्या स्माॅल फायनान्स बॅंकांमध्ये सर्वाधिक शाखा आहेत. तसेच, बॅंकेमध्ये 20000 पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.