Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Xiaomi 12 Pro खरेदी करण्याची हीच आहे बेस्ट वेळ, 5000 रुपयांनी किंमत झालीये कमी!

Xiaomi 12 Pro

Xiaomi 12 Pro स्मार्टफोनची किंमत कंपनीने कमी केली आहे. कंपनीने Xiaomi 13 Pro लाँच केल्यानंतर Xiaomi 12 Pro स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे.तुम्ही देखील आता स्मार्ट फोन घेण्याच्या विचारात असाल आणि Xiaomi चे चाहते असाल तर ही संधी दवडू नका.

सणासुदीचे दिवस सुरु झाले आणि स्मार्ट फोन कंपन्यांनी एकापेक्षा एक ऑफर्स द्यायला सुरुवात केली आहे. ॲपलने iPhone 15 सेरीजचे मोबाईल लाँच केल्यानंतर iPhone 13 आणि 14 च्या किंमती 10 हजारांनी कमी केल्या आहेत. त्याचसोब इतरही प्रतिस्पर्धी कंपन्यांनी त्यांच्या स्मार्ट फोनच्या किंमती कमी केल्या आहेत.

अशातच आता Xiaomi 12 Pro स्मार्टफोनची किंमत देखील कंपनीने कमी केली आहे. कंपनीने Xiaomi 13 Pro लाँच केल्यानंतर Xiaomi 12 Pro स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे.तुम्ही देखील आता स्मार्ट फोन घेण्याच्या विचारात असाल आणि Xiaomi चे चाहते असाल तर ही संधी दवडू नका.

5000 रुपयांनी किंमत कमी

Xiaomi 12 Pro स्मार्टफोनची किंमत कंपनीने 5000 रुपयांनी कमी केली आहे.Xiaomi च्या अधिकृत वेबसाईटनुसार 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत सध्या  44,999 रुपये इतकी आहे. मात्र सध्याच्या ऑफर्समध्ये ग्राहकांना या स्मार्ट फोन खरेदीवर 5000 रुपयांची सूट मिळणार असून, हाच स्मार्ट फोन आता 39,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

याशिवाय Xiaomi 12 Pro स्मार्ट फोनच्या  12GB RAM + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 48,999 रुपये इतकी असून, ऑफरनंतर हाच स्मार्ट फोन ग्राहकांना 41,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. म्हणजेच या  वेरिएंटवर ग्राहकांना 7000 रुपयांची सवलत दिली जाणार आहे.

काय मग, आहे की नाही बेस्ट डील?  माल शिल्लक असेपर्यंत ही ऑफर सुरु असेल असे जाणकारांचे म्हणणे आहे. कंपनीला Xiaomi 13 Pro ची मार्केटिंग करायची असल्याने जुना माल सवलतीच्या दरात विकण्याचा कंपनीने निर्णय घेतला आहे.

हे आहेत स्पेसिफिकेशन्स

Xiaomi 12 Pro स्मार्ट फोन 6.73 इंच WQHD+ AMOLED डिस्प्लेसह युजर्सला वापरता येणार आहे. याशिवाय स्नॅप ड्रॅगन 8 जनरल 1 प्रोसेसर सह 8 GB आणि12GB रॅमसह 256GB स्टोरेजचा देखील अनुभव युजर्सला घेता येणार आहे.

एवढेच नाही तर व्हिडियो शुटींग आणि फोटो काढण्याचा तुम्हांला शौक असेल तर हा मोबाईल तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. या स्मार्ट फोनमध्ये युजर्सला रेअर 50MP कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा अनुभवता येणार आहे. याशिवाय स्मार्ट फोनमध्ये 4600mAh बॅटरी देखील दिली जाणार असून 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील उपलब्ध करून दिला जाणार आहे.