Choosing Right Health Insurance For Seniors : तुमच्या कुटुंबात वृध्द आई-वडील किंवा इतर कुणी व्यक्ती असेल, तर तुमच्या कुटुंबासाठी योग्य आरोग्य विमा फार महत्वाचा ठरतो. तुम्ही तुमचे वार्षिक आर्थिक नियोजन करतांना तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठांसाठी आरोग्य विमा त्यात नक्की अॅड करा. मुख्यत: घरातील ज्येष्ठांसाठी आरोग्य विमा निवडतांना, दावा करण्याची गरज भासल्यास कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजी घ्या.
Table of contents [Show]
योग्य आरोग्य विमा निवडणे महत्वाचे
काही विमा कंपनी वृद्धांसाठी विशेष आरोग्य विमा योजना देतात. या योजनांमध्ये सर्व प्रकारचे आजार कव्हर केल्या जातात. मोठ्या रक्कमेच्या मर्यादेपर्यंत लाभ दिल्या जातात. वृध्दांच्या विशेष समस्यांच्या खर्चाचा समावेश त्यात असतो. वृध्द काळात आरोग्याशी संबंधित समस्या अनपेक्षितपणे वाढू लागतात. त्यामुळे अशा समस्यांना तोंड देतांना आपल्या कुटुंबाचे आर्थिक नियोजन ढासाळते. तेव्हा रुग्णालयाचे बिल भरतांना तुमच्यासह तुमच्या संपूर्ण कुटुंबाची दमछाक होऊ नये. याकरीता वृद्धांसाठी विशेष आरोग्य विमा योजना निवडणे आणि तो योग्य निवडणे या दोन्ही गोष्टी महत्वाच्या ठरतात.
विशेषत: वृध्द पालकांसाठी आरोग्य विमा निवडतांना त्या विमा पॉलिसीमध्ये मधुमेह, ह्दयाच्या समस्या आणि उच्च रक्तदाब या गोष्टींशी संबंधित आजारपण आणि रुटीन चेकअप यांचा समावेश आहे का? ते एकदा निट तपासून पहा.
अधिक नेटवर्क हॉस्पिटल्सचा पर्याय तपासा
वयोवृद्ध लोक वारंवार आजारी पडत असतात. याच कारणामुळे त्यांना अनेकवेळा रुग्णालयात दाखल करावे लागते. तुम्ही नेहमी अश्याप्रकारची ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करावी, ज्यात अनेक रुग्णालयांमध्ये कॅशलेस हॉस्पिटलायझेशनचे फायदे समाविष्ट आहेत. तुमची पॉलिसी जितकी अधिक नेटवर्क हॉस्पिटल्स कव्हर करेल तितके लाभ तुम्हाला मिळेल.
झिरो को-पेमेंटची निवड करा
ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा योजनांमध्ये को-पेमेंट विभागाचा समावेश होतो. ज्यासाठी तुम्हाला दाव्याच्या रकमेपूर्वी काही रक्कम भरावी लागते. त्यासाठीच तुम्ही या प्रकारची पॉलिसी घेणे टाळावे. कारण एखाद्या वेळी रक्कम मोठी असल्यास आणि त्यावेळी तुमच्या वैयक्तिक काही आर्थिक अडचणी असल्यास तुमच्यावर प्रेशर येऊ शकते. तेव्हा तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी अशी आरोग्य विमा पॉलिसी निवडावी ज्यामध्ये नो-क्लेम बोनसचा लाभ असेल. अशा पॉलिसीमध्ये जर मागील वर्षात कोणताही दावा दाखल केला गेला नसेल, तर हा लाभ तुमचा प्रीमियम न वाढवता तुमच्या पॉलिसीच्या विम्याची रक्कम ठराविक टक्क्यांनी वाढवते.
डोमिसिलरी ट्रीटमेंट कव्हर निवडा
काही वेळा आजारी वृद्ध व्यक्तीला दवाखान्यात न जाता घरीच वैद्यकीय उपचाराचा लाभ घ्यावा लागतो. म्हणून, तुम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी अशी आरोग्य योजना निवडावी ज्यामध्ये घरगुती रुग्णालयात भरतीचा खर्च समाविष्ट असेल.
तसेच,ज्येष्ठ नागरिकांना अनेकदा दंत सल्ला किंवा निदानासाठी रुग्णालयात जावे लागते. म्हणून, तुम्ही अशी योजना निवडावी ज्यात OPD खर्च देखील समाविष्ट असेल.
आजीवन नूतनीकरण पर्याय निवडा
आरोग्य विमा तुमच्या वयानुसार महाग होत जातो. त्यामुळे तुम्ही आजीवन नूतनीकरणासह आरोग्य विमा पॉलिसी निवडावी, जेणेकरून तुम्हाला तुमच्या पालकांसाठी त्यांच्या वृद्धापकाळात दुसरी पॉलिसी शोधावी लागणार नाही. तुम्ही अशी आरोग्य विमा पॉलिसी निवडा, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय चाचणीची सुविधा उपलब्ध असेल.