आर्थिक व्यवहार करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचे बँकेमध्ये खाते असते. हे खाते वेगवेगळ्या स्वरूपाचे असू शकते. ज्यामध्ये बचत खाते (Saving Account), चालू खाते (Current Account), पगार खाते (Salary Account) इत्यादींचा समावेश करण्यात येतो. पैशांची गुंतवणूक आणि आर्थिक व्यवहार करण्यासाठी आपल्या सगळ्यांकडेच बँकेत बचत खाते असते. मात्र त्यावर मिळणारा व्याजदर हा फारच कमी असतो. त्यामुळे सर्वसामान्य लोक ठराविक रक्कम बचत खात्यावर ठेवून उर्वरित रकमेची एफडी करतात. एफडीवर बचत खात्यापेक्षा जास्त व्याजदर मिळतो. एफडी ही ठराविक कालावधीसाठी केली जाते. मात्र आज आम्ही तुम्हाला देशातील कोणत्या खाजगी बँका बचत खात्यावर सर्वाधिक व्याजदर देतात, त्याबद्दल माहिती देणार आहोत.
बँका रोजच्या क्लोजिंग बॅलन्सच्या आधारे व्याजदर निश्चित करतात. प्रत्येक बँकेचा बचत खात्यावरील व्याजदर हा वेगवेगळ्या असतो. खाजगी क्षेत्रातील युनिटी स्मॉल फायनान्स बँक (Unity Small Finance Bank) आणि सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक (Suryoday Small Finance Bank) या दोन बँका बचत खात्यावर सर्वाधिक व्याजदर देतात. ज्याच्या माध्यमातून खातेधारकाच्या बचतीवर 7 टक्के व्याजदर दिला जातो. त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक (Suryoday Small Finance Bank)
खाजगी क्षेत्रातील सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक (Suryoday Small Finance Bank) आपल्या ग्राहकांना बचत खात्यावर सर्वाधिक व्याजदर ऑफर करते. ही बँक 5 लाख ते 2 कोटी रुपये बचत खात्यावर शिल्लक असणाऱ्या खातेधारकाला 7% सर्वाधिक व्याजदर देते. तर 1 लाख ते 5 लाखाच्या दरम्यान शिल्लक बचतीवर 6.75% व्याजदर देते. 1 लाख रुपयांपेक्षा कमी बचत ठेवीवर ग्राहकांना 3.75% व्याजदर देण्यात येत आहे. हे नवीन व्याजदर 1 मार्च 2023 पासून लागू करण्यात आले आहेत.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक (Unity Small Finance Bank)
युनिटी स्मॉल फायनान्स बँक (Unity Small Finance Bank) ही देशातील खाजगी क्षेत्रातील नामांकित बँक आहे. ही बँक देखील आपल्या ग्राहकांना बचत खात्यावर सर्वाधिक व्याजदर ऑफर करते. युनिटी बँकेच्या ग्राहकांना 1 लाख रुपयांच्या बचत ठेवीवर बँक 7% व्याजदर देत आहे. तर 1 लाख रुपयांपेक्षा कमी बचत ठेवीवर 6% व्याजदर देत आहे. हे नवीन व्याजदर 1 मार्च 2023 पासून लागू करण्यात आले आहेत.