• 24 Sep, 2023 05:45

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Recurring Deposits : रिकरिंग डिपाॅझिटवर या बॅंका देत आहेत 8 टक्क्यांपर्यंत व्याजदर

Recurring Deposits

रिकरिंग डिपॉझिट (RD) अल्प मुदतीत चांगला रिटर्न मिळवायचा बेस्ट पर्याय आहे. तसेच, तुम्हाला तुमच्या सोयीनुसार गुंतवणूक करण्याची मुभा आहे. म्हणजेच तुम्ही महिन्याला एक ठरावीक रक्कम गुंतवू शकता. ज्यांना एकाचवेळी मोठी रक्कम टाकायला जमत नाही. त्यांच्यासाठी आरडी चांगला पर्याय आहे.

अडचणीच्या वेळी हातात पैसा असावा असे वाटत असल्यास, कोणत्याही बॅंकेच्या आरडीत गुंतवणूक करणे योग्य आहे. कारण, अल्प मुदतीच्या गरजांसाठी आरडी कधीही कामी येऊ शकते. तसेच, ज्यांना एकदाच एफडीमध्ये दीर्घ काळासाठी गुंतवणूक करणे परवडत नाही. त्यांच्यासाठी आरडीत पैसा गुंतवणे चांगला पर्याय आहे. 

फक्त, त्याआधी महिन्याला एक ठरावीक रक्कम तुम्हाला गुंतवता येईल याची पुष्टी करणे आवश्यक आहे. यासाठी आम्ही काही बॅंका घेऊन आलो आहोत, ज्या आरडीवर 8 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहेत.

व्याजदरात पाच वर्षांसाठी केली वाढ

याशिवाय, आरडीमधील गुंतवणूक करपात्र आहे हे देखील लक्षात घेणे आवश्यक आहे. गुंतवलेले पैसे आणि मिळणारे व्याज या दोन्हींवर ठरलेल्या स्लॅबनुसार कर आकारण्यात येतो. तसेच, गुंतवणुकदारांना मदत करण्यासाठी काही बँकांनी आरडीवरील व्याजदरात पाच वर्षांसाठी वाढ केली आहे. 

आर्थिक वर्ष 2023 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सलग सहा वेळा व्याजदरात वाढ केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. येथे पाच बँका आरडीवर 5 वर्षांच्या कालावधीसाठी 8 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहेत.

बंधन बॅंक

बंधन बँक प्लॅनच्या मॅच्युरिटीनुसार आरडीवर 6.50 ते 7.50 टक्के  व्याजदर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 8 टक्क्यांपर्यंत आरडीवर व्याज देण्यात येणार आहे. तसेच, गुंतवणुकदार बँकेत 100 रुपयांपासून आरडी करु शकणार आहेत. त्यामुळे मोठी रक्कम साठवण्यासाठी गुंतवणुकदार या बॅंकेत आरडी उघडू शकणार आहेत.

सिटी युनियन बँक

सिटी युनियन बँकेच्या आरडीवर 1 वर्ष ते 5 वर्षांच्या मुदतीसाठी 7.75 टक्के व्याज आहे. तसेच 5 वर्ष ते 10 वर्षाच्या डिपाॅझिटवर वार्षिक 7.50 टक्के व्याजदर देत आहे. याशिवाय, ज्येष्ठ नागरिकांसाठी 1 वर्ष ते 5 वर्षांच्या मुदतीच्या आरडीवर वार्षिक 8 टक्के व्याज देणार आहे.

डीएचएफएल बॅंक (DHFL Bank)

डीएचएफएल बॅंक सामान्य ग्राहकांना आरडीवर 7.75 टक्के व्याजदर ऑफर करत आहे. हेच ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.75 आरडीचा व्याजदर फिक्स्ड केलेला आहे. त्यामुळे या बॅंकेत खाते असल्यास, या व्याजदराचा लाभ लोकांना घेता येणार आहे.

इंडियन ओव्हरसीज बँक

इंडियन ओव्हरसीज बँक सध्या सर्वसामान्य ग्राहकांना त्यांनी निवडलेल्या मुदतीनुसार 5.75 टक्के ते 7.25 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. तेच ज्येष्ठ नागरिकांना आरडीवर 6.25 ते 7.75 टक्के व्याज मिळत आहे.

डाॅईश बॅंक (Deutsche Bank)

डाॅईश बॅंकेने सर्वसामान्य ग्राहकांसाठी 6 ते 7.50 टक्के व्याजदर फिक्स्ड केला आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना आरडीवर 6.50 ते 7.75 टक्क्यांपर्यंत व्याज दिले जात आहे.

तुम्ही जर प्रत्येक महिन्याला एक ठरावीक रक्कम वेगळी काढून ठेवण्यास सक्षम असल्यास, आरडी तुमच्यासाठी अल्प मुदतीत पैसे जमवण्याचा चांगला पर्याय आहे. जी तुमच्या कधीही कामी येऊ शकते.