Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Online Lottery Frauds: हे आहेत भारतातील 2022 मधील सर्वात मोठे Lottery Frauds!

Online Lottery Frauds

Online Lottery Frauds: सध्या लॉटरी फ्रॉडचा प्रकार मोठ्या प्रमाणात घडतोय. ऑनलाईन लॉटरी फ्रॉड (online lottery fraud) च्या अनेक घटना घडतात. त्यातील काही घटनांचा आढावा घेत, जाणून घेऊयात कसे होतात हे लॉटरी फ्रॉड आणि अशा फसव्या फ्रॉडपासून कशी सावधानता बाळगता येईल.

जामतारा वेबसिरीज(web series) च्या माध्यमातून आपण लॉटरी फ्रॉड  (Lottery fraud) कसे होतात हे पाहिलं. पैशांच्या लोभामुळे आपण कसे या लॉटरी फ्रॉडला बळी पडतो हे या वेबसिरीजमध्ये दाखवण्यात आले आहे.  सध्या लॉटरी फ्रॉडचा प्रकार मोठ्या प्रमाणात घडतोय. भारतातही अशा ऑनलाईन लॉटरी फ्रॉड (online lottery fraud) च्या अनेक घटना घडतात. त्यातील काही घटनांचा आढावा घेत, जाणून घेऊयात कसे होतात हे लॉटरी फ्रॉड आणि अशा फसव्या फ्रॉडपासून कशी सावधानता बाळगता येईल.

भारतातील लॉटरी फ्रॉडची मोठी प्रकरणे!

“कौन बनेगा करोडपती” अर्थातच KBC शोमधून तुम्हाला 25 लाख रुपयांची लॉटरी जिंकल्याची सांगत सायबर क्राईम अंतर्गत अहमदाबाद, राजकोट आणि बंगळुरू येथे अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यात राजकोट येथील इसमाला या लॉटरी फ्रॉडमध्ये 4 लाखांचे नुकसान तर बंगळुरू येथील 30 वर्षीय तरुणाला 9 लाख रुपयांचे अर्थिक नुकसान झाले आहे. या अज्ञात व्यक्तींविरूद्ध लॉटरी रेग्युलेशन ॲक्ट (Lottery Regulation act) आणि Price Cheats and Money Circulation scheme (बॅनिंग) ॲक्टच्या आरोपाखाली तक्रार दाखल केली आहे.

तुम्हाला कधी लॉटरी लागले का? 

तुम्हाला कधी लॉटरी लागली आहे! असा फोन आलाय का? किंवा असा फोन कधी आलाच तर थांबा थोडा विचार करा. की कधी तुम्ही लॉटरी काढली होती का? मग तुम्हाला लॉटरी लागलीच कशी? या सगळ्यामागे आहे हे ‘लॉटरी फ्रॉड’. भोळ्याभाबड्या लोकांना लॉटरी लागली असल्याचं सांगत लाखो रुपये कोणत्या ना कोणत्या माध्यमातून उकळण्यात येतात. आपण फसलो आहोत हे कळेपर्यंत आपले अर्थिक नुकसान झालेले असते.

'केबीसी' कॉल फ्रॉड (KBC Call Fraud)

अचानक तुम्हाला व्हाट्सअँप वर मेसेज येतो किंवा एक फोन कॉल येतो त्यात तुम्हाला ठराविक रकमेची लॉटरी लागली आहे असे सांगितले जाते. अभिनंदन केलं जातं. तुम्हाला जर लागलेली लॉटरी पाहिजे असेल तर दिलेल्या क्रमांकावर कॉल करण्यास सांगितले जाते. पुढच्या प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला अमूक चार्जेस लागतील सांगितले जाते. 

फेक चेक, बक्षिसे आणि प्रसिद्ध व्यक्तीच्या फोटोंचा वापर!

सदर लॉटरी खरी असल्याचं भासवण्यासाठी प्रसिद्ध व्यक्तीच्या फोटोज चा वापर केला जातो. जसं की, राजकीय नेता, एखादा उद्योगपती आणि एका शोच्या होस्ट चा वापर यासाठी केला जातो. या सोबतच तुमच्या व्हाट्सअँपवर मोठ्या रकमेच्या चेकचा फोटो पाठवला जातो. या सोबत बक्षिसरुपात मिळणाऱ्या इतर गोष्टींचा फोटोही पाठवला जातो जेणेकरून संबंधित व्यक्तीला संभ्रम निर्माण होऊन लॉटरी लागल्याची खात्री पटेल.

वेगवेगळ्या माध्यमातून पैसे उकळले जाणे!

एकदा का तुम्ही या लॉटरी ला भुललात की, तुम्ही या फ्रॉडच्या जाळ्यात अडकत जाता. कोणत्या ना कोणत्या कारणासाठी तुमच्याकडून पैसे उकळविण्याचा प्रकार सुरु होतो जसं की, नोंदणी फी, प्रोसेसिंग फी इत्यादी. ही रक्कम टप्याटप्प्याने मागितली जाते. त्यामुळे संबंधित व्यक्तीला आपण फ्रॉडला बळी पडलो आहोत याची जाणीवहोत नाही. आणि जो पर्यंत आपल्याला फसलो आहोत हे कळते तेव्हा फार उशीर झालेला असतो. 

लॉटरी फ्रॉडपासून वाचण्यासाठी घेण्याची खबरदारी

1. तुम्हाला जर असा फ्रॉड कॉल आला तर थोडं थांबा विचार करा. तुम्ही कधी अश्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे का? किंवा कोणतं तिकीट काढलं आहे का? 
2. कोणत्याच आमिषांना बळी पडू नका. 
3. मेसेज मध्ये दिलेल्या कोणत्याही फोनवर कॉल करू नका. आणि कोणत्याच लिंक वर क्लिक करू नका. 
4. तुमचे बँक डिटेल्स, क्रेडिट कार्ड डिटेल्स ,पर्सनल माहिती शेअर करू नका. 
5. जर असा मेसेज आला तर संबंधित शोची ऑफिशिअल वेबसाईट चेक करा. कारण तेही अश्या फ्रॉडपासून सावध राहा आणि आम्ही अशा कोणत्याच लॉटरी काढलेल्या नाहीत किंवा आम्ही सो मध्ये सहभाग नोंदवण्यासाठी पैसे घेत नसल्याचं व आमचा यांच्याशी संबंध नसल्याची माहिती प्रसिद्ध करत असतात. 
6. असा कॉल आला तर थेट सायबर क्राईमवर तुम्ही या संबंधी तक्रार नोंदवू शकता.