Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget Friendly Smartphone: 12 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उत्तम फीचर्ससह मिळतील 'हे' 5 स्मार्टफोन

Smartphones

Budget Friendly Smartphone: कमी पैशात चांगले फीचर्स असणारे स्मार्टफोन फार कमी आहेत. चांगल्या स्मार्टफोनसाठी जास्त किंमत मोजावी लागते. पण तुमचे बजेट जर 12 हजार रुपयांपर्यंत असेल तर, तुमच्यासाठी आम्ही काही स्मार्टफोनचे ऑप्शन आणले आहेत.

कुटुंबातील छोट्यांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच स्मार्टफोन हवा आहे. पण चांगल्या स्मार्टफोनची किंमत परवडणारी नाही. चांगले फीचर्स हवा असणारा स्मार्टफोन हवा असेल तर त्यासाठी पैसेदेखील चांगले मोजावे लागतात. पण आज आम्ही तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये परवडणाऱ्या स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत. तुमचा विश्वास बसणार नाही. पण अवघ्या 12 हजार रुपयांपासून चांगले स्मार्टफोनचे पर्याय उपलब्ध आहेत. तुमच्यासाठी यापैकी एखादा बेस्ट स्मार्टफोन ठरू शकतो. चला तर जाणून घेऊयात अशाच स्मार्टफोनचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊया. 

Realme C55

आयफोन 14 प्रो सारख्या Dynamic Island सह येणारा हा पहिला आणि सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. हा फोन 10,999 रुपये किमतीत खरेदी करू शकता. Dynamic Island प्रमाणेच फोनमध्ये मिनी कॅप्सूल आणि 6.72 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. डिस्प्लेसह रिफ्रेश दर 90Hz आहे आणि त्याला 680 nits पीक ब्राइटनेस मिळतो. 

realme-c55.jpg

फोनमध्ये MediaTek Helio G88 प्रोसेसर आणि 8GB पर्यंत LPDDR4X रॅम सपोर्ट करण्यात आला आहे. फोनमध्ये 128 GB पर्यंत स्टोरेज सपोर्ट करण्यात आला आहे. Realme C55 मध्ये ड्युअल रीअर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे, ज्यामध्ये 64-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरसह ड्युल कॅमेरा उपलब्ध आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

Moto G32

Moto G32 च्या 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज मॉडेलची किंमत 9,999 रुपये आहे. Moto G32 मध्ये 6.5-इंचाचा फूल एचडी प्लस डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेट आहे. स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर आणि स्पोर्ट्स स्टिरीओ स्पीकरसह डॉल्बी एटमॉस फोनमध्ये देखील सपोर्ट करण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर आणि ड्युअल मायक्रोफोन देखील उपलब्ध आहेत. 

moto-g32.jpg

फोनमध्ये सिक्युरिटीसाठी फेस अनलॉक आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. फोनमधील फ्रंट कॅमेरा 50 मेगापिक्सेल, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आणि 30W TurboPower फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट आहे.

Samsung Galaxy M13 5G

Samsung Galaxy M13 ची किंमत 11,999 रुपये आहे. या किंमतीत, 4 GB रॅमसह 64 GB स्टोरेज उपलब्ध आहे. फोनमध्ये 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले आणि 90Hz रिफ्रेश रेट आहे. फोन MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आणि 4GB RAM सह 64GB स्टोरेज पॅक करतो. फोनमध्ये Android 12 सह One UI 4 उपलब्ध आहे. फोन ड्युअल कॅमेरा सेटअप सह येतो. 

samsung-galaxy-m13-5g.jpg

फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा फ्रंट लेन्स आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. फोनमध्ये 6000mAh बॅटरी आणि 15W चार्जिंग आहे.

Poco M4 5G

Poco M4 5G ची किंमत 12,999 रुपये आहे. परंतु ऑफरसह ती 12,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी केली जाऊ शकते. फोनमध्ये 6.58-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश दर 90 हर्ट्झ आहे. Poco M4 5G मध्ये 6 GB पर्यंत RAM आणि 128 GB पर्यंत स्टोरेजसह MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आहे. यासह, 2 GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम देखील उपलब्ध होईल. 

poco-m4-5g.jpg

Poco M4 5G मध्ये दोन मागील कॅमेरे आहेत ज्यात फ्रंट लेन्स 50 मेगापिक्सेल आहे. दुसरी लेन्स 2 मेगापिक्सेल पोर्ट्रेट आहे. Poco M4 5G मध्ये सेल्फीसाठी 8-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. Poco M4 5G मध्ये 5000 mAh बॅटरी आणि 18 वॉट फास्ट चार्जिंग आहे. सेक्युरिटीसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

Lava Blaze 5G 

Lava Blaze 5G हा सध्या भारतातील सर्वात कमी किमतीचा 5G फोन आहे. Lava Blaze 5G मध्ये 6.5-इंचाचा HD + IPS डिस्प्ले आणि 90Hz चा रिफ्रेश दर आहे. फोनसोबत सेक्युरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर व्यतिरिक्त, फेस अनलॉक देखील आहे. Lava Blaze 5G ला MediaTek Dimensity 700 प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरीचा सपोर्ट आहे.

lava-blaze-5g.jpg

याशिवाय, Lava Blaze 5G मध्ये तीन बॅक कॅमेरे आहेत ज्यात फ्रंट लेन्स 50 मेगापिक्सेल आहे आणि दुसरी लेन्स AI आहे. फोनच्या फ्रंटला 8-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.