बॉलिवूडमधील कलाकार आणि त्यांच्या दैनंदिन आयुष्याबाबत सर्वसामान्य लोकांना खूपच कुतूहल असते. त्यामुळेच तर त्यांच्याशी निगडित कोणतीही छोटी मोठी गोष्ट लोकांना जाणून घ्यायला आवडते. सध्या जुलै महिना सुरू असल्याने एकच विषय चर्चेत आहे, तो म्हणजे आयटीआर फायलिंग. इनकम टॅक्स भरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 31 जुलैपूर्वी आयटीआर फाईल करणे गरजेचे आहे.
बॉलिवूड मधील कलाकार एका चित्रपटासाठी लाखो - कोटी रुपये मानधन स्वीकारतात हे तर आपल्याला माहीतच आहे. पण याच उत्पन्नावर ते टॅक्स देखील भरतात. आज आपण बॉलिवूड मधील सर्वात जास्त इनकम टॅक्स भरणाऱ्या कलाकारांबद्दल जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
अक्षय कुमार (Akshay Kumar)
बॉलीवूडमध्ये सर्वात जास्त इनकम टॅक्स भरणाऱ्या कलाकारांमध्ये पहिले नाव अक्षय कुमारचे येते. अक्षयची एकूण संपत्ती 2000 कोटी रुपये इतकी आहे. फॉर्ब्स ग्लोबल यादीनुसार सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. त्याची वार्षिक कमाई 486 कोटी रुपये असून आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार 2022 मध्ये त्याने 29.5 कोटी रुपयांचा टॅक्स भरला होता. सर्वात जास्त टॅक्स भरणारा कलाकार म्हणून आयकर विभागाने त्याचे नाव घोषित केले होते.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)
सर्वात जास्त टॅक्स भरणाऱ्या कलाकारांमध्ये बिग बींचा देखील समावेश करण्यात आला आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती 3396 कोटी रुपये आहे. बिग बींची वार्षिक कमाई 150 कोटींहून अधिक आहे. याशिवाय ब्रँड एंडोर्समेंट मधून देखील बिग बींना पैसे मिळतात. 2018- 19 मध्ये बिग बींनी 70 कोटी रुपयांचा सर्वाधिक टॅक्स भरला होता.
सलमान खान (Salman Khan)
बॉलिवूडचा भाईजान म्हणून सलमान खानला ओळखले जाते. सलमान खान देखील सर्वात जास्त टॅक्स भरणाऱ्या कलाकारांमध्ये गणला जातो. सलमानची एकूण संपत्ती 2960 कोटी रुपये इतकी आहे. तर तो वर्षाला 480 कोटींहून अधिक कमाई करतो. सलमान खानने 2017 साली 44 कोटी रुपयांचा सर्वाधिक टॅक्स भरला होता.
हृतिक रोशन (Hrithik Roshan)
ग्रीक गॉड म्हणून ओळखला जाणारा बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन देखील सर्वात जास्त टॅक्स भरणाऱ्या कलाकारांमध्ये समाविष्ट आहे. हृतिकची एकूण संपत्ती 3101 कोटी रुपये इतकी आहे. तर त्याची वार्षिक कमाई 260 कोटीहून अधिक आहे. हृतिक चित्रपट, जाहिराती आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून सर्वाधिक पैसे कमावतो. तो वार्षिक 25.5 कोटी रुपयांचा टॅक्स भरतो.
शाहरुख खान (Shah Rukh Khan)
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान देखील सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या कलाकारांमध्ये समाविष्ट आहे. बॉलिवूडमधील नामांकित कलाकारांपैकी एक म्हणून शाहरुखची ओळख आहे. त्याची एकूण संपत्ती 6010 कोटी रुपये इतकी आहे. तर तो वर्षाला 520 कोटीहून अधिक कमाई करतो. शाहरुख ब्रँड एंडोर्समेंट आणि चित्रपटामधून कमाई करतो. 2022 मध्ये त्याने 22 कोटी रुपयांचा टॅक्स भरला आहे.
Source: abplive.com