Craftsman Flees with gold : सव्वा कोटीच्या सोन्यांसह कारागिर पसार झाल्याची घटना पुण्यामध्ये घडलीये. प्रशांत सासमल असे आरोपीचे नाव असून त्याच्या या कृत्यामुळे सगळेच सोन्याचे व्यापारी हादरले आहेत.
नेमकं काय घडलं
पुण्यातील गुरूवार पेठेतील एका सोनाराने एक महिन्यापूर्वी सोन्याचे दागिणे घडविण्यासाठी प्रशांत सासमल या तरुणाकडे सोनं दिलं होतं. जवळपास 1.07 कोटी किंमतीचं हे सोनं होतं. याच सुमारास दुसऱ्या एका सोनाऱ्याने सुद्धा प्रशांतकडे 18 लाख किंमतीचं सोनं घडवण्यासाठी दिलं. मात्र एक महिन्यानंतर जेव्हा प्रशांतशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो कुठेच आढळून आला नाही. शिवाय त्यांच्याशी फोनवरून ही कोणताच संपर्क झाला नाही. त्यामुळे अखेर या दोन्ही सोनाऱ्यांनी खडक पोलिस स्टेशनमध्ये प्रशांत सासमल विरोधात एफआयआर दाखल केली.
कोण आहे प्रशांत सासमल
प्रशांत सासमल हा 40 वर्षाचा तरुण. पुण्यातील गणेशपेठ मध्ये तो वास्तव्यास असून सोन्याचे दागिणे घडवण्याचा त्याचा व्यवसाय आहे. गेल्या काही वर्षापासून प्रशांत पुण्यामध्ये हा व्यवसाय करत आहे. विश्वासू सोनार म्हणून त्याची ओळख होती. गुरूवार पेठ आणि रविवार पेठेतील अनेक सोनार त्यांच्याकडे सोनं घडविण्यासाठी देत असत.
त्यामुळे सव्वा कोटींच्या सोन्यासह प्रशांत सासमलच्या अचानक गायब होण्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे बाहेर सोनं घडविण्यासाठी देण्या संदर्भात सोनारामध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.