उन्हाळा सुरू झाला आहे, अशा परिस्थितीत एसी, कुलर, पंखे यांचा वापर वाढतो, त्यामुळे विजेचा वापरही वाढू लागतो. आपल्याला थंड ठेवणाऱ्या या तीन गोष्टींपैकी सर्वात जास्त वीज वापर एसीमधून होतो, ज्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होतो. पण सरकारकडून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या स्कीमच्या आधारे घरातील परिसरात सोलर पॅनेल उभारुन त्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही टेन्शनशिवाय एसी, पंखा आणि कूलर चालवून वीज बिल वाचवू शकता.
Table of contents [Show]
सरकार देते सबसिडी
एक मोठा सोलर पॅनल बसवण्यासाठी जवळपास एक ते दीड लाख रुपये खर्च येतो. पण या सोलर पॅनलवर सरकार सबसिडी देते, त्याचा फायदा घेऊन तुम्ही 75 हजार रुपयांपासून ते 1.20 लाख रुपयांपर्यंत हे सोलर पॅनल बसवू शकता. हे सोलर पॅनल्स तुमचे वीज बिल तर कमी करतातच शिवाय तुम्हाला येणारे प्रचंड वीज बिल वाचवते.
सबसिडीसाठी अर्ज करा
सरकारी योजनेंतर्गत, डिस्कॉम सोलर पॅनेल दिले जातात जे छतावर किंवा कोणत्याही खुल्या जागेवर बसवले जाऊ शकतात. सोलर पॅनलवर सबसिडी मिळवण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल, ज्यामध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करणे आवश्यक असेल.
असा करा अर्ज
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट https://solarrooftop.gov.in/ ला भेट द्या. यानंतर तुम्हाला Apply For Solar Rooftop वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर एक पेज तुमच्यासमोर उघडेल. यानंतर तुम्हाला तुमच्या राज्यानुसार सबसिडी फॉर्म भरायचा आहे. 30 दिवसांनंतर डिस्कॉम सबसिडीची रक्कम तुमच्या खात्यात वर्ग करण्यात येईल.
ही कागदपत्रं आवश्यक
- सौर पॅनेल बसवण्यासाठी तुमच्याकडे कायमस्वरूपी निवासस्थान असणे आवश्यक आहे.
- ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र असावे.
- अनुदान मिळविण्यासाठी उत्पन्नाचा दाखला व वीजबिल आदी सादर करावे लागतात.
- याशिवाय, तुम्हाला ज्या ठिकाणी सोलर पॅनल्स लावायचे आहेत, त्या ठिकाणचा फोटो द्यावा लागणार आहे.
News Source : बिजली बिल की टेंशन खत्म, अब फ्री में चलेंगे AC, कूलर और फैन, सरकार दे रही है जबरदस्त स्कीम (dnaindia.com)
Solar Power Subsidy Scheme Check How to Apply Online; बिनधास्त वापरा AC, Heater ! सरकार २५ वर्षांपर्यंत वीज देणार मोफत, असे करा Online Apply (maharashtratimes.com)