Increase in revenue of chocolate industry: चॉकलेट पॅकेज्ड इंडस्ट्रीमध्ये वर्षागणिक 16 टक्क्यांनी महसुलात वाढ होताना दिसत आहे. 2022 वर्षात 9 हजार 296 कोटी रुपयांचा महसूल गोळा झाला आहे. महसुलात वाढ झाली असली, तरी नफ्यामध्ये 2.3 टक्क्यांची घट झाली आहे, यामुळे 978 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असे माँडेलेझ इंडिया फूड्स प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या वार्षिक अहवालात नमूद केले आहे.
प्रॉफिटमध्ये घट का झाली? Why the decline in profits?
एकूण जगाच्या चॉकलेट व्यवसाय वृद्धीत भारताचा 19 टक्के वाटा आहे. 72 टक्के व्यवसाय भारतातील विविध चॉकलेट ब्रँड्स मिळून करतात. यंदा महसूल वाढला असला, तरी लॉजिसटीकमधील खर्च वाढला आहे, ज्यामुळे 2022 मध्ये प्रॉफिट कमी झाले आहे. कॅडबरी डेअरी मिल्क, फाईव्ह स्टार, पर्क, जेम्स आणि बॉर्नविटा ब्रँड्स अंतर्गत खाद्य उत्पादने विकणाऱ्या कंपनीचा एकूण खर्च 7 हजार 971 कोटी होता. हा खर्च 2021 वर्षाच्या तुलनेत 17.7 टक्क्यांनी वाढला आहे, यामुळेदेखील प्रॉफिटमध्ये घट झाली आहे.
मागील संपूर्ण वर्षात एकूण 5 हजार प्रकारचे वेगवेगळे फ्लेवर्स लाँच झाले आहेत. प्रिमियम चॉकलेट रेंजची विक्री जवळपास 35 टक्क्यांनी वाढली आहे. भारतात चॉकलेट इंडस्ट्रीचा चक्रवाढ वार्षिक वाढ दर 5.72 टक्के आहे. ज्यामुळे इंडस्ट्रीची व्हॅल्यू 48.29 अब्ज झाली आहे. यात 1.68 अब्ज रुपयांची वाढ झाली आहे. हे मार्केट येत्या वर्षात 6.39 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे, मॉंडेलेझ इंडिया फूड्स प्रायव्हेट लिमिटेडने आपल्या वार्षिक अहवालात वर्तवण्यात आला आहे.
येत्या काळत चॉकलेटचे सेवन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, तर चॉकलेट स्टार्टअपही दुप्पटीने वाढू शकतात. यासह बिस्किट व्यवसायाचे मार्केट वाढण्याची शक्यता आहे. पुढील वर्ष बेकरी व्यवसायासाठी चांगले राहील. तसेच, प्रिमियम रेंजमध्ये, कमी युनिट असलेले कमी रेंजचे प्रोडक्ट सर्वाधिक विकले जातील. ज्यामुळे उत्पादकांनी स्मॉल युनिट पॅकेजिंगवर भर दिला पाहिजे, असे मॉंडेलेझ इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डर्क व्हॅन डी पुट यांनी सांगितले.
प्रॉफिटच्या गणिताचे व्यवस्थापन करण्यासाठी भारतातील चॉकलेट कंपन्यांना पायाभूत सुविधांमध्ये नुतनीकरण करणे गरजेचे आहे. आम्ही 2023 वर्षात भारतातील पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणार आहे, जेणेकरून वाढता महसूल, कंपन्यांचे प्रॉफिटही वाढवेल, असे डर्क व्हॅन डी पुट म्हणाले.