• 27 Sep, 2023 01:11

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Apple iPhones च्या या सेरीजच्या स्मार्टफोन्सच्या किमती झाल्या कमी, जाणून घ्या मॉडेल आणि प्राईस

Apple iPhones

एकीकडे काही दिवसांपूर्वी iPhone 15 बाजारात आणल्यानंतर ॲपलने काही खास स्मार्टफोनच्या किंमती कमी केल्या आहेत. चला तर जाणून घेऊयात कोणत्या सेरीजचे ॲपलच स्मार्टफोन स्वस्त झाले आहेत ते…

तुम्ही जर आयफोनचे चाहते असाल तर तुम्ही ही बातमी जरूर वाचली पाहिजे. याचे कारण म्हणजे ॲपल कंपनीने त्यांच्या काही स्मार्टफोनच्या किमती कमी केल्या आहेत. एकीकडे काही दिवसांपूर्वी आयफोन 15 (iPhone 15) बाजारात आणल्यानंतर ॲपलने काही खास स्मार्टफोनच्या  किंमती कमी केल्या आहेत. चला तर जाणून घेऊयात कोणत्या सेरीजचे ॲपलच स्मार्टफोन स्वस्त झाले आहेत ते…

iPhone 14 Pro वर खास ऑफर

ॲपल कंपनीने त्यांच्या खास iPhone 14 Pro या मोबाईलवर ग्राहकांना चांगली ऑफर देऊ केली आहे. खरे तर कंपनीने हा स्मार्टफोन बनवणे बंद केले आहे. मार्केटमध्ये हा मोबाईल सध्या उपलब्ध नाहीये, मात्र अमेझॉनवर ग्राहकांना तो खरेदी करण्याची संधी दिली जाते आहे. 129,900 रुपये किमतीचा हा मोबाईल ग्राहकांना आता 119,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. म्हणजेच ग्राहकांना हा मोबाईल अमेझॉनवर 9,901 रुपयांची बचत करत खरेदी करता येईल. याशिवाय अमेझॉनवर नमूद केल्यानुसार , HDFC बँकेचे क्रेडीट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरणारे ग्राहक अतिरिक्त  3,000 रुपयांची सवलत मिळवू शकणार आहेत.

iPhone 14 वर 10 हजारांची सूट!

होय, अगदी खरी बातमी आहे ही. आयफोनच्या iPhone 14 या स्मार्टफोनवर कंपनी तब्बल 10 हजारांची सूट देत आहे. या फोनची किंमत आधी कंपनीने 79,900 रुपये ठरवली होती. आता मात्र ग्राहकांना त्यांच्या आवडीचा हा मोबाईल फोन केवळ 69,900 रुपयांना खरेदी करता येणार आहे. अमेझॉनवर ग्राहकांना आ मोबाईल खरेदी करता येणार आहे. याशिवाय जर तुम्ही  ICICI क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हांला नो कॉस्ट EMI चा लाभ देखील घेता येणार आहे.

iPhone 14 Plus वर 10,000 ऑफ! 

होय, iPhone 14 प्रमाणेच ग्राहकांना iPhone 14 Plus च्या खरेदीवर 10 हजारांची सवलत दिली जाणार आहे. हा मोबाईल फोन आधी  89,900 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध होता, आता मात्र सवलतीच्या दरात ग्राहकांना हा मोबाईल अमेझॉनवर 79,900 रुपयांना खरेदी करता येणार आहे. याशिवाय जे ग्राहक अमेझॉनवरून हा स्मार्टफोन खरेदी करतील त्यांना अतिरिक्त 2910 रुपयांची सवलत दिली जाते आहे. म्हणजेच जर तुम्ही हा मोबाईल अमेझॉनवरून खरेदी केला तर तुम्हाला 76,990 रुपयांना घरी घेऊन जाता येणार आहे. काय मग, वाट कसली बघताय? ऑफर आणि माल संपायच्या आत लवकर खरेदीला लागा.

iPhone 13 वर 5099 रुपयांची सूट!

होय, आयफोन खरेदीसाठीची सवलत तुम्हाला iPhone 13 वर देखील दिली जाते आहे. जो मोबाईल आधी 64,999 रुपयांना विक्रीसाठी होता, तोच iPhone 13 स्मार्टफोन तुम्ही आता 59,900 रुपयांना खरेदी करू शकणार आहात. याशिवाय जे ग्राहक अमेझॉनवरून हा स्मार्टफोन खरेदी करतील त्यांना अतिरिक्त 3901 रुपयांची सवलत दिली जाणार आहे. म्हणजेच अमेझॉनवरण खरेदी करणारे ग्राहक हा मोबाईल 55,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.