• 09 Feb, 2023 07:27

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

The last Nizam of Hyderabad:हैद्राबादचे शेवटचे निजाम कालवश, कधी काळी होते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Nizam

हैदराबादचे (Hyderabad) शेवटचे आणि आठवे निजाम नवाब मीर बरकत अली खान वालाशन मुकर्रम जहा बहादूर (Nizam Mir Barkat Ali Khan Siddiqi Mukarram Jah, Asaf Jah)यांचे निधन झाले आहे. गेल्या दशकापासून ते तुर्कीमध्ये राहत होते. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांना हैदराबाद येथे त्यांच्या पारंपरिक दफनभूमीत दफन केले जाणार आहे.

हैदराबाद संस्थानाचे शेवटचे निजाम नवाब मीर बरकत अली खान वालाशन मुकर्रम जहा बहादूर (Nizam Mir Barkat Ali Khan Siddiqi Mukarram Jah, Asaf Jah) यांचे तुर्कीतील इस्तंबूल येथे 14 जानेवारी रोजी निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून ते तुर्कीमध्ये राहत होते.त्यांच्या पार्थिवावर हैदराबादमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कुटुंबियांनी अगोदरच जाहीर केले आहे.

आज 17 जानेवारी रोजी त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.हैदराबादचे शेवटचे आणि आठवे निजाम नवाब मीर बरकत अली खान वालाशन मुकर्रम जहा बहादूर यांचे निधन झाले आहे. गेल्या दशकापासून ते तुर्कीमध्ये राहत होते. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांना हैदराबाद येथे त्यांच्या पारंपरिक दफनभूमीत दफन केले जाणार आहे.

हैदराबादचे आठवे निजाम नवाब मीर बरकत अली खान वालाशन मुकर्रम जहा बहादूर यांचे 14 जानेवारी रोजी रात्री 10.30 वाजता निधन झाले होते. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी तुर्कीतील इस्तंबूल येथे अखेरचा श्वास घेतला.

निजाम घराण्याच्या श्रीमंतीची चर्चा आजही प्रसिद्ध आहे.

1947 मध्ये जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला, तेव्हा हैद्राबादचे निजाम हे पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत व्यक्ती मानले जात होते. त्या काळी या संपूर्ण पृथ्वीवर हैदराबादचे शासक मीर उस्मान अली यांच्या इतका पैसा, सोने-चांदी-हिरे-रत्ने कुणाकडेही नव्हते. इसवी सन 1911 मध्ये उस्मान अली खान हे हैदराबादचे सातवे निजाम बनले. हैदराबाद भारतात विलीन होईपर्यंत उस्मान अली खान राज्य करत होते.त्याकाळी निजामांची एकूण संपत्ती 17.47 लाख कोटी म्हणजे 230 अब्ज डॉलर्स इतकी होती असे सांगितले जाते. त्यावेळी निजामांची एकूण मालमत्ता अमेरिकेच्या एकूण जीडीपीच्या 2 टक्के इतकी होती. निजामाकडे स्वतःचे चलन होते, त्याची स्वतःची टांकसाळ देखील होती.

निजामाच्या संपत्तीत टांकसाळी नाणी, 100 मिलियन पौंड सोने, 400 मिलियन पौंड दागिने होते. निजामाच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्त्रोत गोलकोंडा खाण हा होता. ही खाणजो त्यावेळी जगातील हिऱ्यांचा पुरवठा करणारा एकमेव खाण होता. निजामाकडे 'जेकब डायमंड' होता, जो त्यावेळी जगातील सात सर्वात महागड्या हिऱ्यांमध्ये गणला जात होता. 185 कॅरेटचा हा हिरा निजाम पेपरवेट म्हणून वापरत होते. त्याची किंमत 50 मिलियन पौंड इतकी होती.