Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IPO Investment: 'या' दोन कंपन्यांचे आयपीओ आज ओपन होणार! जाणून घ्या माहिती

IPO Investment

Image Source : www.businesstoday.in

IPO Investment: आयपीओ गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी दोन कंपन्यांचे आयपीओ सबस्क्रीप्शनसाठी ओपन होत आहेत. जर तुम्हालाही या कंपन्यांच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर गुंतवणूक कालावधी आणि प्रति शेअर्स किंमत जाणून घ्या.

सध्या अनेक कंपन्या बाजारात आपला आयपीओ आणून व्यवसायासाठी सर्वाधिक निधी जमा करत आहेत. तुम्हालाही आयपीओमध्ये (IPO) गुंतवणूक करायची असेल, तर ही तुमच्यासाठी  सुवर्णसंधी आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच सोमवारी दोन कंपन्यांचे आयपीओ बाजारात ओपन होणार आहेत. या आयपीओमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगली कमाई करू शकता.

खजांची ज्वेलर्स (Khajanchi Jewelers) आणि यासन्स कॅमेक्स केअर (Yasons Camex Care) या दोन कंपन्यांचे आयपीओ आज ओपन होणार आहेत. जर तुम्हालाही या कंपनीन्यांच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर ही गुंतवणूक कधीपर्यंत करता येईल, तसेच त्याची प्राईज बँड काय असेल, याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

यासन्स कॅमेक्स केअर आयपीओ (Yasons Camex Care IPO)

यासन्स कॅमेक्स केअर (Yasons Camex Care) ही कंपनी डाय उत्पादक म्हणून ओळखली जाते. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांसाठी आज 24 जुलैपासून आपला आयपीओ सबस्क्रीप्शनसाठी ओपन करणार आहे. या आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना बुधवार 26 जुलै पर्यंत गुंतवणूक करता येईल.

यासाठी कंपनीने 40 रुपये प्राईस बँड निश्चित केली आहे. या कंपनीचे शेअर्स एनएसई एमएसई इमर्जवर लिस्ट होतील. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 20.57 कोटी रुपयांचा निधी उभारत आहे. यामध्ये केवळ फ्रेश शेअर्स इश्यू केले जातील  हा निधी कंपनी व्यवसायाच्या भांडवलासाठी उभारणार आहे.

खजांची ज्वेलर्स आयपीओ (Khajanchi Jewelers IPO)

खजांची ज्वेलर्स (Khajanchi Jewelers) ही कंपनी आपला आयपीओ आजपासून म्हणजेच 24 जुलैपासून सबस्क्रीप्शनसाठी ओपन करत आहे. या आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना शुक्रवार पर्यंत म्हणजेच 28 जुलै 2023 पर्यंत गुंतवणूक करता येईल. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 92 कोटी रुपयांचा निधी उभारण्याची योजना आखत आहे.

यासाठी कंपनीने  इश्यूमधील शेअर्सची किंमत 140 रुपये प्रति शेअर्स अशी निश्चित केली आहे. यासाठी गुंतवणूकदारांना किमान 1000 इक्विटी शेअर्ससाठी अर्ज करावा लागणार आहे. या कंपनीचे शेअर्स बीएससीवर लिस्ट केले जाऊ शकतात. मार्क कॉर्पोरेट ॲडव्हायझर्स हे खजांची ज्वेलर्सच्या आयपीओचे लीड मॅनेजर आहेत. तर केमिओ कॉर्पोरेट सर्विस रजिस्टार आहेत.

Source: abplive.com