Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Joyalukkas IPO: जॉयलुक्कास ज्वेलर्सचे आयपीओ मार्केटमधून पुन्हा एकदा घूमजाव!

Joyalukkas IPO

Joyalukkas IPO: जॉयलुक्कास ज्वेलर्स कंपनीने यापूर्वीही 2011 मध्ये 650 कोटी रुपयांचा आयपीओ (Initial Public Offer-IPO) आणण्यासाठी सादर केलेली कागदपत्रे पुन्हा घेतली होती. सध्याची मार्केटची स्थिती चांगली नाही. तसेच कंपनीच्या ऑफिसेसमधील बदल आणि एकूणच कंपनीच्या भविष्यातील योजनांचा आढावा घेऊन आयपीओ आणण्याच्या योजनेमध्ये बदल केला आहे.

केरळधील ज्वेलर्स कंपनी जॉयलुक्कास इंडिया लिमिटेड (Joyalukkas India Ltd) कंपनीने 2023 मध्ये 2,300 कोटी रुपयांचा आयपीओ (Initial Public Offer-IPO) आणण्याची योजना पुन्हा गुंडाळली आहे. कंपनीने यापूर्वीही अशाचप्रकारे आयपीओ मार्केटमधून घूमजाव केले होते. सेबीकडे आयपीओसाठी आवश्यक कागदपत्रे जमा करूनही कंपनीने आपल्या प्लॅनमध्ये बदल केला आहे. सध्याच्या मार्केटचा विचार करता कंपनीने जाणीवपूर्वक हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.

जॉयलुक्कास ज्वेलर्स कंपनीने यापूर्वी 2011 मध्ये 650 कोटी रुपयांचा आयपीओ (Initial Public Offer-IPO) आणण्यासाठी सादर केलेली कागदपत्रे पुन्हा घेतली होती. कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अलुक्कास वर्गीस जॉय (Alukkas Varghese Joy, MD, Joyalukkas Jewellers) यांनी सध्याची मार्केट अवस्था चांगली नसल्याचे मत प्रदर्शित करून, तसेच ऑफिसेसमधील बदल आणि एकूणच्या कंपनीच्या चांगल्या भवितव्यासाठी आयपीओ आणण्याच्या योजनेमध्ये बदल केला आहे.

अलुक्कास यांनी कंपनीच्या आयपीओबाबत अधिक सांगताना नमूद केले की, 2024 मध्ये कंपनी आयपीओ आणू शकते. सध्या छोट्या-मोठ्या कारणांमुळे कंपनीने आयपीओ आणण्याची योजना पुढे ढकलली आहे. सध्या शेअर मार्केटची स्थितीसुद्धा अनुकूल नाही. या वर्षाचा विचार करता कंपनीने मागील वर्षी चांगली कामगिरी केली होती. त्यावेळी आमच्या कंपनीचे आकडेसुद्ध चांगले होते. तसेच भारतात आम्ही काही ऑफिसेस ट्रान्सफर करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहोत. त्यामुळे तुर्तास कंपनीचा आयपीओ पुढे ढकलला आहे.

मागील वर्षभरात बीएसईच्या सेन्सेक्समध्ये 4.33 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्केटच्या दृष्टिने ही एक चांगली गोष्ट आहे. त्या आधारावर कंपनी आयपीओसाठी पुन्हा एकदा निवेदन देऊ शकते. पण सध्या आयपीओची साईज, कंपनीचे भविष्यातील प्लॅन याबाबत कंपनी नियोजन करत आहे. त्यामुळे 2024 मध्ये आयपीओ आणण्याचा कंपनी विचार करू शकते.

सोन्याच्या किमतीतील चढ-उतार

सोन्याच्या किमतीत होत असलेले चढ-उतार यास कारणीभूत नसल्याचेही लुक्कास यांनी सांगितले. सोन्याची किंमत गेल्या महिन्यात 57,930 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. पण त्यानंतर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात वाढ केल्यानंतर सोन्याच्या किमतीत पुन्हा खाली आल्या. त्यामुळे सोन्याचे चढणारे आणि उतरणाऱ्या दरांचा आयपीओ आणण्याशी काही संबंध नाही, हे लुक्कास यांनी स्पष्ट केले. 2022 मध्ये सर्व गोल्ड कंपन्यांनी चांगला बिझनेस केला. सोन्याच्या किमती चढ्या असतानाही त्याला मागणी होती. एकूणच देशात सोन्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे.

जॉयलुक्कास इंडिया 

जॉयलुक्कास इंडिया ही रिटेल ज्वेलर्स आणि ई-कॉमर्स चैनमधील सर्वांत मोठी कंपनी मानली जाते. कंपनीचे देशभरात सुमारे 68 शहरांमध्ये दुकाने आहेत. केरळस्थित असलेल्या या कंपनीचे प्रमोटर अलुक्कास वर्गीस जॉय हे आहेत. सध्या ज्वेलरी मार्केटमध्ये टाटा ग्रुपच्या तनिष्क आणि कल्याण ज्वेलर्सच्या बरोबरीने जॉयलुक्कास मार्केटमध्ये उतरली आहे.