Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सर्वाधिक पगार देणाऱ्या 2022 मधील नोकऱ्या!

the-highest-paid-jobs-in-2022

विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या शिक्षणानंतर सर्वप्रथम आपल्या आवडीच्या क्षेत्राचा विचार करून त्यातील सर्वाधिक मागणी असलेल्या नोकरीच्या कोर्सची निवड करावी.

Highest Paid Jobs: अपेक्षित शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाला चांगल्या पगाराची नोकरी मिळावी अशी अपेक्षा असते. पण सर्वांचीच अपेक्षा पूर्ण होते असे नाही. यामध्ये बहुतेक विद्यार्थ्यांचा करिअर निवडण्यामधील गोंधळ कारणीभूत असू शकतो. यासाठी विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या शिक्षणानंतर सर्वप्रथम आपल्या आवडीच्या क्षेत्राचा विचार करून त्यातील सर्वाधिक मागणी असलेल्या नोकरीच्या कोर्सची निवड करावी. 2022 या वर्षात सर्वाधिक पगार (High Salary) मिळवून देणाऱ्या नोकऱ्यांबद्दल जाणून घेऊया.

डेटा सायंटिस्ट (Data Scientist)

सध्या डेटा सायंटिस्टच्या (Data Scientist) नोकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे आणि यासाठी भरपूर पगार ही दिला जातो. पण डेटा सायंटिस्टची नोकरी वाटते तितकी सोपी नाही. यासाठी गणित, सांख्यिकीय संकल्पना आणि कॉम्युटर प्रोग्रामिंगसह अनेक कौशल्यांवर कमांड असणं आवश्यक आहे. एकूणच गणित आणि कॉम्युटर कोडिंगचं ज्ञान नाही त्याला या क्षेत्रात करिअर करणं अशक्य आहे. डेटा सायंटिस्ट कंपनीचे सॉफ्टवेअर-हार्डवेअर,  आर्किटेक्चर, तसेच कर्मचाऱ्यांचा डेटा हाताळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सिस्टमची रचना तयार करतात.

डिजिटल मार्केटिंग (Digital Marketing)

आज संपूर्ण जग ऑनलाईन आणि इंटरनेटवर अवलंबून आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील डिजिटायझेशन सोबतच जगभरातील बाजार व्यवस्थेचे डिजिटलायझेशन झाले आहे. त्यामुळे आजच्या काळात डिजिटल मार्केटिंग खूपच महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे या क्षेत्रात करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर करण्यासाठी कोणत्याही विशेष पात्रतेची गरज नाही. बारावी किंवा कोणत्याही शाखेतून पदवीधर असलेला विद्यार्थी या कोर्ससाठी पात्र ठरू शकतो.

आज सर्व ग्राहक डिजिटल मीडियावर आहेत. त्यामुळे प्रत्येक कंपनीने आपल्या उत्पादनाच्या मार्केटिंगसाठी डिजिटल मार्केटिंगचा अवलंब सुरू केला आहे. आगामी काळात डिजिटल मार्केटिंग एक्सपर्टची मागणी आणखी वाढणार आहे. यामध्ये डिजिटल मार्केटिंग मॅनेजर, सोशल मीडिया मार्केटिंग स्पेशलिस्ट, कंटेंट मॅनेजर, सर्च इंजिन मार्केटर, वेब डिझायनर, एसइओ एक्झिक्युटिव्ह, कन्व्हर्जन रेट ऑप्टिमायझर, कंटेंट रायटर म्हणून काम करू शकता.

आयटी सुरक्षा व्यवस्थापक (IT Security Manager)

मोठमोठ्या ऑफिसेसमधील, बॅंकांमधील डेटा आणि सिस्टिम सुरक्षित ठेवण्यासाठी आयटी सिक्युरिटी मॅनेजर नितांत गरज असते. इंटरनेटवरील माहिती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी याच्यावर असते. हे मोठे जोखमीचे काम असल्याने मोठमोठ्या कंपन्या आयटी सिक्युरिटी मॅनेजर पदासाठी लाखो रूपयांचा पगार देतात. या पदासाठी सिस्टम आणि नेटवर्क सुरक्षा (System & Network Security), कोणत्याही तांत्रिक समस्येचे निवाकरण करण्याची क्षमता आणि अद्ययावत टेक्निकल नॉलेज असणं आवश्यक आहे.

मोबाईल अ‍ॅप डेव्हलपर (Mobile App Developer)

तुम्ही तुमच्या फोन किंवा टॅबलेटवरील अॅप्स पाहिले तर तुमच्या लगेच लक्षात येईल की, मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलपरना एवढी मागणी का आहे. सध्या सर्वच क्षेत्रातील कंपन्या अ‍ॅपद्वारे लोकांना सेवा देत आहेत आणि ग्राहकांकडूनही याला मागणी असल्याने मोबाईल अ‍ॅप डेव्हलपर यांना बाजारात मागणी असून त्यांना चांगले पैसे ही दिले जात आहेत. या क्षेत्रात येण्यासाठी iOS आणि Android सारख्या प्लॅटफॉर्मवर अॅप्स कसे तयार करायची, याची माहित असणे आवश्यक आहे. तसेच वेब डेव्हलपमेंट लँग्वेज, मोबाईल फ्रेमवर्क आणि कोडिंगचे ज्ञान असणे आवश्यक आहे.