एखादी वस्तू किंवा सेवा विकत घेताना त्यामध्ये काही चुका आढळून आल्यास आपण हक्काने त्याबद्दल तक्रार करू शकतो किंवा त्याबाबत माहिती मिळवू शकतो. काही दिवसांपूर्वीच एका ग्राहकाला त्याची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई जिल्हा ग्राहक आयोगाने एका परिवहन कंपनीला दंड ठोठावला आहे. काय आहे प्रकरण? ते पाहूया.
Table of contents [Show]
मालाची डिलिव्हरी न करणे कंपनीला भोवले
मुंबई जिल्हा ग्राहक आयोगाने एका परिवहन कंपनीला मालाची डिलिव्हरी न केल्याचे निदर्शनास येताच मालाची किंमत देण्याचे निर्देश दिले आहेत. परिवहन कंपनी कन्सायनीला मालाची डिलिव्हरी करण्यात अयशस्वी ठरली. 80,590 रुपयांपेक्षा जास्त किमतीची कॉपर वायर ट्रान्सपोर्ट कंपनीला कन्सायनीला डिलिव्हर करायची होती. पण जवळपास दोन महिने होऊनही मालाची डिलिव्हरी करण्यात आली नाही. त्यामुळे परिवहन कंपनीला मुंबई जिल्हा ग्राहक आयोगाने दंड म्हणून 80,590 रुपयांपेक्षा जास्त किमतीची कॉपर वायरची व्याजासह भरपाई आणि इतर दंड ठोठावला. यामध्ये तक्रारदाराला मानसिक त्रास आणि खटल्याचा खर्च म्हणून 25 हजार रुपये देण्याचे निर्देशही त्यांनी वाहतूक कंपनीला दिले आहेत.
ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार ग्राहकाला देण्यात आलेले हक्क
सुरक्षेचा हक्क, माहितीचा हक्क, निवडीचा अधिकार, आपले मत मांडण्याचा अधिकारी, तक्रार निवारणाचा अधिकार, ग्राहक शिक्षणाचा अधिकार ग्राहकांना देण्यात आले आहेत. आपली फसवणूक तर झाली नाही ना किंवा फसवणूक झाल्यास काय करावे? याबाबत अनेकदा ग्राहकाला माहितीच नसते. ग्राहकाला आपल्या हक्कांबाबत माहिती असणे गरजेचे आहे. ग्राहक हितासाठी सरकारद्वारे विविध माहितीपर उपक्रम राबवण्यात येतात. याचा उपयोग ग्राहकांनी जरुर करावा.
ग्राहकांनो लक्षात ठेवा
फसवणूक झाल्याचे किंवा फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच ग्राहकांनो सावध व्हा. त्यासाठी ग्राहक संस्था, जिल्हा ग्राहक आयोग, राज्य ग्राहक आयोग यांची मदत घ्या.
तक्रार कोण दाखल करु शकतो?
- राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्ट्र, यांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार खालील जणांना तक्रार दाखल करता येते.
- ग्राहक, ज्यांना अशा वस्तू विकल्या गेल्या आहेत किंवा वितरित केल्या आहेत किंवा विकण्याचे मान्य केले आहे किंवा विकल्या गेल्या आहेत किंवा अशी सेवा प्रदान केली किंवा देण्याचे मान्य केले आहे; किंवा जो अशा वस्तूंच्या किंवा सेवांच्या बाबतीत चुकीच्या व्यापार पद्धतीचा अवलंब झाल्याचा आरोप करतो
- कोणतीही मान्यताप्राप्त ग्राहक संघटना, ज्याला अशा वस्तूंची विक्री केली गेली आहे किंवा वितरित केल्या आहेत किंवा अशी सेवा पुरवण्यात आली आहे किंवा देण्यास सहमती दिली आहे, किंवा अशा वस्तू किंवा सेवेच्या बाबतीत चुकीच्या व्यापार पद्धतीचा आरोप आहे असा, अशा संघटनेचा सदस्य आहे की नाही;
- एक किंवा एकापेक्षा जास्त ग्राहक, जिथे एकच फायदा असणारे असंख्य ग्राहक आहेत, जिथे जिल्हा आयोगाच्या परवानगीने, सर्व इच्छुक ग्राहकांच्या वतीने किंवा त्यांच्या फायद्यासाठी; किंवा
केंद्र प्राधिकरण, केंद्र सरकार किंवा राज्य सरकार, जसे असेल तसे.
Source: https://bit.ly/3Zd1Xf3