Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tecno Camon 20 Premier 5G स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च; 'या' तारखेपासून मोबाईल खरेदी करता येणार, किंमत जाणून घ्या

Tecno Camon 20 Premier 5G Launched in India

Image Source : www.giznext.com

Tecno Camon 20 Premier 5G Launched in India: 'टेक्नो' कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे. Camon सीरिज अंतर्गत कंपनीने 5G फोन ग्राहकांसाठी प्रस्तुत केला आहे. या फोनमध्ये अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

सध्या भारतीय बाजारपेठेत अनेक नवीन स्मार्टफोन कंपन्या सक्रिय झाल्या आहेत. सर्वोत्तम फीचर्स आणि परवडणाऱ्या किंमतीत स्मार्टफोन उपलब्ध होत असल्याने ग्राहकांची देखील या स्मार्टफोनला पसंती पाहायला मिळत आहे. टेक्नो कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केला आहे. टेक्नोने Comon सीरिज अंतर्गत आपला 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या नवीन स्मार्टफोनचे नाव 'Tecno Camon 20 Premier 5G' असे आहे. या फोनमध्ये कंपनीने अनेक नवनवीन फीचर्स दिले आहेत. कंपनीने या फोनमध्ये 8GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज दिले आहे. टेक्नोच्या या नवीन स्मार्टफोनबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

फीचर्स जाणून घ्या

‘Tecno Camon 20 Premier 5G’ स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.67 इंचाचा AMOLED Full HD+ डिस्प्ले दिला आहे.हा 5G फोन मीडियाटेक डायमेंसिटी 8050 चिपसेटसह android 13 वर अपडेट करून दिला जाणार आहे.

या फोनमध्ये कंपनीने ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा मुख्य कॅमेरा 50MP चा असून 108MP ची अल्ट्रा वाईड लेन्स आणि 2MP चा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंग करिता 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Tecno Camon 20 Premier 5G स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 512GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज उपलब्ध करून देत आहे.या फोनची बॅटरी 5000mAh क्षमतेची असून याला 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे.

कंपनीने यात ड्यूअल स्पीकर्स (Dual Speaker), ड्यूअल सिम (Dual Sim),  वाय फाय 6, ब्ल्यूटुथ 5.2, जीपीएस (GPS), एनएफसी (NFC), टाईप सी पोर्ट (Type C Port) आणि 5G सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

'या' तारखेपासून खरेदी करता येणार

‘Tecno Camon 20 Premier 5G’ हा स्मार्टफोन ग्राहकांना 15 जुलै 2023 पासून खरेदी करता येणार आहे. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट Amazon वरील अपकमिंग प्राईम डे सेलमध्ये (Prime Day Sale 2023) या फोनची विक्री होणार आहे. याशिवाय कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून देखील हा फोन खरेदी करता येणार आहे.

किंमत जाणून घ्या

‘Tecno Camon 20 Premier 5G’ स्मार्टफोन ग्राहकांना ब्लॅक (Black) आणि ब्ल्यू (Blue) रंगात उपलब्ध करून दिला जाणार आहे. या फोनची 8GB रॅम आणि 512GB  स्टोरेजच्या व्हेरियंटसाठी 29,999 रुपये मोजावे लागणार आहेत.

Source: navbharattimes.indiatimes.com