सध्या भारतीय बाजारपेठेत अनेक ऑटो कंपन्या सक्रिय आहेत. ज्यामध्ये होंडा (Honda), मारुती सुझुकी (Maruti Suzuki), ह्युंदाई (Hyundai), किआ (Kia), रेनॉल्ट (Renault) आणि टाटा मोटर्स (Tata Motors) यांचा समावेश आहे. भारतातील बहुसंख्य लोकांकडे टाटा मोटर्सच्या कार आहेत. आधुनिक फीचर्स, सर्वोत्तम किंमत आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून लोक नेहमीच टाटा मोटर्सच्या गाड्यांना प्राधान्य देतात.
जर तुम्हालाही कार खरेदी करायची असेल, तर सध्या टाटा मोटर्स आपल्या कारवर 50,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे. हा डिस्काउंट टाटा टियागो (Tata Tiago), टाटा हॅरियर (Tata Tiago), टाटा सफारी (Tata Safari), टाटा टिगोर (Tata Tigor) आणि टाटा अल्ट्रोजवर (Tata Altroz) मिळणार आहे. कोणत्या कारवर किती डिस्काउंट मिळतोय, जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
टाटा टियागो (Tata Tiago)
टाटा मोटर्सच्या टाटा टियागो (Tata Tiago) या कारवर 45 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देण्यात येत आहे. हा डिस्काउंट कारच्या सीएनजी (CNG) आणि पेट्रोल व्हर्जनवर देण्यात येणार आहे. या कारच्या खरेदीवर 20,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट व कारच्या पेट्रोल व्हर्जनवर 5,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देण्यात येणार आहे. तसेच सीएनजी व्हर्जनवर 10,000 रुपयांचा एक्सट्रा डिस्काउंट देखील मिळणार आहे.
टाटा टिगोर (Tata Tigor)
टाटा मोटर्स मधील सेडान सेगमेंटमधील टाटा टिगोर या कारवर देखील 50 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देण्यात येत आहे. या कारच्या पेट्रोल आणि सीएनजी (CNG) व्हेरियंटवर कंपनीकडून डिस्काउंट देण्यात येत आहे. या कारच्या खरेदीवर 35,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट आणि 5,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट देण्यात येत आहे.
टाटा हॅरियर/सफारी (Tata Harrier/Safari)
टाटा मोटर्सकडून टाटा हॅरियर आणि टाटा सफारी या दोन्ही गाड्यांवरती डिस्काउंट देण्यात येत आहे. या दोन्ही गाड्यांच्या एसयूव्ही व्हर्जनवर 35,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. नुकत्याच लॉन्च झालेल्या रेड डार्क एडिशनचा या ऑफरमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. या दोन्ही कारवर समान डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे.
टाटा अल्ट्रोझ (Tata Altroz)
टाटा मोटरची सर्वात नामांकित कार म्हणून टाटा अल्ट्रोझला ओळखले जाते. या कारचे सध्या बाजारपेठेत पेट्रोल-डिझेल आणि सीएनजी असे दोन व्हेरिएंट उपलब्ध आहेत.यातील सीएनजी (CNG) व्हेरिएंट नुकतेच लॉन्च करण्यात आलेला आहे. मात्र कंपनीकडून पेट्रोल आणि डिझेल व्हेरियंटवर 28,000 रुपयांपर्यंतची डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे.
Source: zeebiz.com