सन फार्मा ही देशातली सर्वात मोठी फार्मास्युटिकल कंपनी आहे. सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेड सातत्यानं चांगली कामगिरी करत असल्याचं दिसतंय. नुकतंच चौथ्या तिमाहीचे आकडे समोर आले आहेत. यात कंपनीनं 29.6 टक्के निव्वळ नफा कमावलाय. सर्वात जास्त औषधं कमीत कमी किंमतीत कंपनीनं विकली आहेत. त्यामुळे चांगला पैसा कंपनीनं या दरम्यान कमावलाय. 31 मार्चला संपलेल्या तिमाहीत असाधारण वस्तू आणि करांपूर्वी कंपनीचा नफा 24.11 अब्ज रुपये म्हणजेच तब्बल 291.7 दशलक्ष डॉलरवर पोहोचला आहे.
जुनाट आजारांवरच्या औधषांसाठी स्थापन झाली कंपनी
कंपनीचा एकूण महसूल 15.7 टक्क्यांनी वाढून 109.31 अब्ज रुपये झालाय. याउलट इनपुट खर्च 13.2 टक्क्यांनी कमी झालाय. 1983मध्ये सन फार्माची स्थापना झाली. जुनाट आणि इलाज करण्यासाठी ओव्हर द काउंटर औषधं, अँटीरेट्रोव्हायरल प्रकारची औषधं ही कंपनी तयार करते. भारतात प्रतिवर्षी या कंपनीच्या औषधांची विक्री 8.7 टक्क्यांनी वाढली जी सन फार्माच्या एकूण विक्रीच्या 31 टक्के आहे. सोबत यूएस विक्री 20.9 टक्क्यांनी वाढली.
India's Sun Pharma posts near-30% rise in Q4 profit on lower input costs https://t.co/GqLHYs8xOU pic.twitter.com/auoJVfj4CH
— Reuters Asia (@ReutersAsia) May 26, 2023
जेनेरिक औषधांची लोकप्रियता
डिसेंबरमध्ये गुजरातच्या एका प्लान्टमध्ये यूएस फूड अँड ड्रग्स अॅडमिनिस्ट्रेशनच्या इम्पोर्ट अलर्टच्या सूचनेमुळे व्यवसायावर परिणाम झाला. कंपनीच्या जेनेरिक औषधांची लोकप्रियता अधिक आहे. मात्र किंमतीच्या बाबतीत तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे सुमारे सात वर्षांपूर्वी हाय मार्जिनच्या विभागात जाण्यास प्रवृत्त केल्याचं कंपनीनं म्हटलंय. कंपनीच्या विशेष औषधांची विक्री जवळपास 28 टक्क्यांनी वाढल्याचं कंपनीतर्फे सांगण्यात आलंय.
मार्चमध्ये ही कंपनी ताब्यात घेण्यात आली
सन फार्मानं यूएसची कंपनी असलेल्या कॉन्सर्ट फार्मास्युटिकल्सचं अधिग्रहण मार्चमध्येच पूर्ण केलंय. दरम्यान, आर्थिक वर्ष 2023साठी 4 रुपये प्रति शेअरचा अंतिम लाभांश प्रस्तावित केला असल्याचं कंपनीनं म्हटलंय. प्रति शेअर 7.5 रुपये अंतरिम लाभांश यापूर्वी देण्यात आला आहे. निकालानंतर सन फार्माचे शेअर्स जवळपास 2.6 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनाही त्याचा फायदा होणार आहे. आठवड्यात 4.8 टक्क्यांच्या वृद्धीसह 6 आठवड्यांचं नुकसानही भरून काढलंय.