• 24 Sep, 2023 02:44

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सरकारी गुंतवणुकींबाबत हे काम पूर्ण करा, नाहीतर तुमची गुंतवणूक धोक्यात येऊ शकते!

Aadhar Link with Govt Saving Scheme

Image Source : www.rightofemployees.com

पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, पोस्ट ऑफिस स्कीम आणि इतर अल्प बचत गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना सरकारने 30 सप्टेंबरपर्यंतची डेडलाईन दिली आहे. त्यानंतर या गुंतवणूकदारांचे खाते गोठावले जाणार.

पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, पोस्ट ऑफिस स्कीम आणि इतर अल्प बचत गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी या महिन्याच्या अखेरपर्यंत आधारकार्ड सबमिट केले नाही तर त्यांची गुंतवणूक धोक्यात येऊ शकते.

सरकारी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी सप्टेंबरअखेरपर्यंत आधारकार्ड-पॅनकार्ड लिंक करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले होते. तरी अद्याप अनेक जणांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. तर सरकारने आता सप्टेंबरपर्यंत पब्लिक प्रोव्हिडंट फंड, सुकन्या समृद्धी योजना, पोस्ट ऑफिसच्या योजना आणि इतर अल्प बचत गुंतवणूक योजनेत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी आपले आधारकार्ड या योजनांशी लिंक करण्याचे आवाहन केले. सप्टेंबरपर्यंत जे गुंतवणूकदार ही प्रक्रिया पूर्ण करणार नाही. त्या गुंतवणूकदारांची खाते सरकारकडून गोठवले जाणार आहे.

पॅनकार्ड आणि आधारकार्ड ही दोन कागदपत्रे गुंतवणुकीसाठी खूप महत्त्वाची आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करायची असेल तर पॅनकार्ड आणि आधारकार्ड आवश्यक आहे. तरी अजून बऱ्याच गुंतवणूकदारांनी या योजनांसोबत आधारकार्ड लिंक केलेले नाही.

30 सप्टेंबर अखेरची संधी

केंद्रीय वित्त विभागाने काढलेल्या सूचनेनुसार अल्प बचत खात्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी 30 सप्टेंबरपर्यंत आधारकार्ड सबमिट करायचे आहे. यामध्ये प्रामुख्याने पीपीएफ (PPF), सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana), नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (National Saving Certificate), सिनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम (Senior Citizen Saving Scheme) आणि इतर अल्प बचत योजनांचा समावेश आहे. जे गुंतवणूकदार आधारकार्ड सबमिट करणार नाहीत. त्यांचे खाते 1 ऑक्टोबरपासून गोठवले जाणार आहे. या खात्यातून गुंतवणूकदारांना कोणतेच व्यवहार करता येणार नाही.