Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank Lunch Time: बँकेत लंच टाईमचं कारण सांगून अडवणूक होतेय? वाचा RBI चे नियम काय सांगतात!

Bank Lunch Time

बँक कर्मचारी अनेकदा ‘लंच टाईम’ हे कारण देत ग्राहकांना वेठीस धरतात अशी तक्रार नैनिताल येथील माहितीचा अधिकार (Right to Information) कार्यकर्ते प्रमोद गोल्डी यांनी आरबीआयला केली होती. तसेच एका RTI द्वारे बँकांचा लंच टाईम नेमका कोणता आहे आणि खातेदारांना असे ताटकळत ठेवणे योग्य आहे का अशी विचारणा केली होती.

बँकेचा लंच टाईम आणि बँक कर्मचारी यांच्याबद्दलचे असंख्य हास्यविनोद आपण सोशल मिडीयावर वाचत असतो आणि खासगीत देखील बोलत असतो. आपल्यापैकी कुणाला न कुणाला बँकेचा असा अनुभव आलाच असेल. 

काही कामानिमित्त तुम्ही बँकेत जाता. बँकेत गेल्यावर तुम्हांला प्रचंड गर्दी दिसते. लोक ताटकळत रांगेत उभे आहेत असं चित्र दिसतं. तुम्ही तिथल्या लोकांना जेव्हा विचारणा करता तेव्हा कळत की कर्मचाऱ्यांचा लंच टाईम झालाय आणि त्यांनी काऊंटर बंद केले आहेत. आता तुमच्याकडे काहीच पर्याय शिल्लक नसतो. बँक कर्मचाऱ्यांशी कोण वाद घालत बसणार म्हणून तुम्ही देखील रांगेत ताटकळत उभे राहतात. तासाभराने बँक कर्मचारी येतात आणि मग कामाला सुरुवात करतात. यात तुमचा महत्वाचा वेळ वाया गेलेला असतो.खरे तर बँक कर्मचाऱ्यांना अशाप्रकारे ग्राहकांना ताटकळत ठेवता येत नाही. याबाबत रिजर्व बँक ऑफ इंडियाचे काही नियम आहेत. ग्राहकांना हे नियम माहिती नसल्यामुळे त्यांचा अमुल्य असा वेळ वाया जातो. चला तर जाणून घेऊयात बँकांच्या ‘लंच टाईम’ बाबत RBI ची काय नियमावली आहे. ग्राहकांना आपले अधिकार माहितीच हवेत.

बँकेचे खातेदार हे बँकेचे ग्राहक असतात. ग्राहक जेव्हा बँकेत खाते खोलतात तेव्हा रीतसर शुल्क भारतात, बँकेला वेळोवेळी सर्विस चार्ज देत असतात, त्यामुळे आपण आपलेच पैसे बँकेतून काढण्यासाठी किंवा भरण्यासाठी जात असू तेव्हा आपल्यासोबत दुर्व्यवहार होता कामा नये. याबाबत खरे तर सर्वांनीच सजग असायला हवे. याचा अर्थ असाही नाही की खातेदार बँक कर्मचाऱ्यांसोबत अरेरावी करेल.

काय आहे बँकांचा लंच टाईम

बँक कर्मचारी अनेकदा ‘लंच टाईम’ हे कारण देत ग्राहकांना वेठीस धरतात अशी तक्रार नैनिताल येथील माहितीचा अधिकार (Right to Information) कार्यकर्ते प्रमोद गोल्डी यांनी 2017 मध्ये आरबीआयला केली होती. तसेच एका  RTI द्वारे बँकांचा लंच टाईम नेमका कोणता आहे आणि खातेदारांना असे ताटकळत ठेवणे योग्य आहे का अशी विचारणा केली होती. 

यावर उत्तर देताना आरबीआयने स्पष्ट केले होते की, बँकांचा ठराविक असा लंच टाईम नाही. परंतु दुपारी 1 ते 3 या वेळेदरम्यान ते जेवणासाठी सुटी घेऊ शकतात. पुढे आरबीआयने हे देखील स्पष्ट केले की, एकाच वेळी सगळे कर्मचारी जेवणासाठी जाऊ शकत नाही. कुठल्याही परिस्थिती बँकेचे व्यवहार ठप्प होणार नाहीत याची काळजी घेऊनच कर्मचारी जेवणासाठी जाऊ शकतात असे देखील रिजर्व बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे. 

कितीही रुपयांचा भरणा करता येणार 

खातेदाराला वाटेल तितक्या कमी रकमेचा भरणा ते करू शकतात असे देखील आरबीआयने म्हटले आहे. त्यासाठी आवश्यक ते सगळे नियम पाळलेच पाहिजेत असे देखील म्हटले आहे. काही बँका 1111 रुपये, 2222 रुपये किंवा अत्यल्प असे 100 रुपये भरणा म्हणून घेत नसल्याच्या तक्रारी आरबीआयकडे आल्या होत्या. त्यावर हे स्पष्टीकरण दिले गेले आहे. 

याबाबत जर बँक खातेदारांची अडवणूक करत असतील तर खातेदार थेट आरबीआयच्या वेबसाईटवर जाऊन सदर बँकेची तक्रार दाखल करू शकतात. किंवा संबंधित बँकेच्या कस्टमर केयर नंबरवर फोन करून बँकेत येणाऱ्या अडचणींची तक्रार नोंदवू शकतात. 

तेव्हा बँक खातेदारांनो, जेव्हा केव्हा ‘लंच ब्रेक’ हे कारण देऊन बँक कर्मचारी तुमच्या कामासाठी टाळाटाळ करत असतील तेव्हा त्यांना आरबीआयची ही नियमावली जरूर सांगा.