Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Stocks in news: गुजरात गॅस, हिरो मोटो कॉर्प आणि विप्रोसह 'या' कंपन्यांचे स्टॉक्स राहू शकतात चर्चेत

Stocks in news

गुजरात गॅस, हिरो मोटो कॉर्प आणि व्हिनस रेमेडीसह इतर कंपन्यांचे स्टॉक्स आज दिवसभर चर्चेत राहू शकतात. या कंपन्यांनी घेतलेले निर्णय आणि अंतर्गत घडामोडींचा परिणाम त्यांच्या शेअर्सवर होण्याची शक्यता आहे. काल (22 Feb) बुधवारी मोठी पडझड पाहायला मिळाली. अदानी समूहातील दहाही कंपन्यांचे शेअर्स ढासळले.

Stocks in News: शेअर बाजारात बुधवारी (दि. 22 फेब्रुवारी) मोठी पडझड पाहायला मिळाली. अदानी समूहातील दहाही कंपन्यांचे शेअर्स ढासळले. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये 927 अंकांची घसरण झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने चार महिन्यातील निचांकी स्तर गाठला. युक्रेनवरुन रशिया अमेरिकेतील वाढता तणाव, प्रमुख जागतिक बँकांकडून दरवाढीची शक्यता या गोष्टींचा बाजारावर प्रतिकूल परिणाम झाला.

निफ्टी बँक, निफ्टी IT सह प्रमुख निर्देशांकही लाल चिन्हावर बंद झाले. बुधवारी सेन्सेक्स 927 अंकांनी घसरून 59 हजार 744 वर आणि निफ्टी 272 अंकांनी घसरून 17 हजार 554 वर बंद झाला. बाजारातील सर्वांगीण घसरणीमध्ये बँकिंग, धातू आणि इतर आयटी आघाडीवर होते. यामुळे, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप सुमारे 3.9 लाख कोटी रुपयांनी कमी होऊन ते 261.33 लाख कोटी रुपयांवर आले.

कोणते स्टॉक्स राहू शकतात चर्चेत?

गुजरात गॅस (Gujarat Gas Stock)

गुजरात गॅस कंपनीच्या संचालक मंडळाने राज कुमार(IAS) यांची चेअरमन पदी नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे. 21 तारखेला हा निर्णय घेण्यात आला होता. त्याचा परिणाम आज कंपनीच्या शेअर्सवर होण्याची शक्यता आहे. काल हा शेअर्स 502 रुपयांवर बंद झाला होता.

लेमन ट्री हॉटेल्स (Lemon Tree Hotels Stock)

लेमन ट्री या हॉटेल उद्योगातील कंपनीने भोपाळमध्ये 47 रुम्सचे हॉटेल नव्याने सुरू केले आहे. हे हॉटेल चालू वर्षाच्या शेवटी सुरू होईल. या हॉस्पिटॅलिटी प्रॉपर्टीमध्ये प्रशस्त रुम्स, रेस्टॉरंट्स, banquet, gym सह अनेक सुविधा असतील. कंपनीच्या या घोषणेचा शेअर्सच्या किंमतीवर परिणाम होऊ शकतो.

ओरियंट सिमेंट (Orient Cement Stock price)

ओरियंट सिमेंट कंपनीने अदानी पॉवरशी नॉन बायडिंग करार केला  आहे. महाराष्ट्रातील तिरोदा येथे सिमेंट प्रकल्प उभारण्यासंबंधीत कराराचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर होऊ शकतो.

हिरो मोटो कॉर्प (Hero MotoCorp)

हिरो मोटो कॉर्प या ऑटोमोबाइल क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने बंगळुरु, दिल्ली आणि जयपूरमध्ये EV चार्जिंग सुविधेची सुरुवात केली आहे. तीन शहरांतील 50 पेक्षा जास्त ठिकाणी 300 चार्जिंग स्टेशन सुरू होणार आहेत. याचा परिणाम हिरो कंपनीच्या शेअर्सवर होऊ शकतो. त्यामुळे आज दिवसभरात हा शेअर्स चर्चेत राहण्याची शक्यता आहे. 

विप्रो (Wipro) 

विप्रो कंपनीच्या इनोव्हेटिव्ह Lab45 ने जलद माहिती पाठवण्यासाठी आणि सुरक्षेसाठी  decentralized identity and credential exchange (DICE) ID ही प्रणाली सुरू करण्याची घोषणा केली आहे. डेटा शेअरिंग आणि सिक्युरिटी हा महत्त्वाचा विषय असून कंपनीच्या या निर्णयाचा परिणाम शेअर्सवर होण्याची शक्यता आहे.

ग्रेव्हिस कॉटन (Greaves Cotton Stock)

ग्रेव्हिस कॉटन कंपनीने उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. कंपनीने दीर्घकालीन विकासाची योजना आखली असून त्याअतंर्गत हा निर्णय घेतला आहे. रिटेल, फायनान्स, इ-मोबिलिटी व्यवसाय या क्षेत्रांमध्ये या नियुक्ती होणार आहे. त्याअतंर्गत रिटेल व्यवसायावर नरसिंहा जयकुमार यांची CEO म्हणून नियुक्ती केली आहे. तर संदीप दिवाकरण यांची ग्रेव्हिस फायनान्स कंपनीच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. सोबतच चंद्रशेखर त्यागराजन यांची ग्रेव्हिस इलेक्ट्रिक मोबिलीटी कंपनीच्या चीफ फायनान्शिअल ऑफिसर(CFO) पदी नियुक्ती केली आहे.

व्हिनस रेमिडीज (Venus Remedies)

व्हिनस रेमेडिज या कंपनीला कर्गरोगावरील जेनेरिक औषधाची विक्री करण्याची परवानगी उझबेकिस्तान आणि पॅलेस्टाइनकडून मिळाली आहे. या बातमीचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर होण्याची शक्यता आहे.

बायोकॉन  (Biocon)

कोटक महिंद्रा बँकेची सहयोगी कंपनी Kotak Special Situations Fund ने बायोकॉन कंपनीत 1,070 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. biosimilars business ताब्यात घेण्यासाठी कंपनी हा पैसा खर्च करणार आहे. त्याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर होण्याची शक्यता आहे.