Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केट : टेक्निकल चार्ट का गरजेचा?

शेअर मार्केट : टेक्निकल चार्ट का गरजेचा?

ट्रेडिंग करण्यापूर्वी जाणून घ्या टेक्निकल चार्ट म्हणजे काय तो क कसा पाहावा

शेअर बाजारात ट्रेडिंग करणाऱ्यांनी म्हणजेच कॉल-पूट यांच्या मार्फत ऑप्शन ट्रेडिंग करणाऱ्यांनी टेक्निकल चार्ट हा शब्दप्रयोग अनेकदा ऐकला असेल. पण नवोदितांना याची बऱ्याचदा माहिती नसते. वास्तविक, हल्ली ब्रोकर्सच्या अॅप्सवर टेक्निकल चार्ट उपलब्ध असतात. पण कित्येकांना तो कसा पहावा हे कळत नाही. अर्थातच यासाठी प्रशिक्षण घेणे गरजेचे असते. परंतु जर ते शक्य नसेल तर किमान याबाबतची माहिती तरी असायला हवी.

यासाठी तुम्ही https://in.tradingview.com/ या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. तिथे गेल्यानंतर चार्ट हा ऑप्शन सिलेक्ट करा. यानंतर आपल्यासमोर आलेख वहीसारखे पेज दिसेल. त्यावर लाल आणि हिरव्या रंगाच्या बऱ्याच उभ्या पट्ट्या दिसून येतील. त्यांना कँडल्स (candlestick) असे म्हणतात. या कँडल्सच्या आधारावर निर्देशांक असो किंवा एखादा शेअर असो त्याची आजवरची प्रगती-अधोगती यांचा सर्व इतिहास समजू शकतो. यामध्ये कालमर्यादेचा ऑप्शन असून त्यामध्ये 1 मिनिट, 3 मिनिटे, 5 मिनिटे, 15 मिनिटे, 30 मिनिटे, 1 तास, 1 दिवस, 1 महिना असे पर्याय आहेत. त्यावरुन त्या-त्या कालावधीमध्ये सदर शेअरची किंमत किती होती किंवा निर्देशांक कोणत्या पातळीवर होता, तिथून तो कसा वर गेला अथवा खाली आला याची माहिती मिळते. या माहितीच्या आधारे आपण आपली खरेदी-विक्रीची रणनीती ठरवू शकतो.

या चार्टमध्ये वरील बाजूस इंडिकेटर्स नावाचा पर्याय असून त्यामध्ये असंख्य इंडिकेटर्सची यादी दिसून येईल. यातील पिव्हॉट स्टँडर्ड (Pivot Standard) हा इंडिकेटर ओपन केल्यास त्यातून आपल्याला सपोर्ट लेव्हल्स (Support) आणि रेझिस्टन्स लेव्हल्स (Resistance) समजू शकतात. सपोर्टसाठी S1, S2, S3 असे पर्याय दिसतील; तर रेझिस्टन्ससाठी R1, R2, R3 असे पर्याय दिसतात.

याचा अर्थ, समजा टाटा स्टीलच्या शेअरचा भाव सध्या 1120 रुपये असेल तर आपल्याला चार्ट ओपन केल्यास तिथे 1095 रुपयांसमोर S1, 1078 रुपयांसमोर S2 आणि 1060 रुपयांपुढे S3 असे दिसत असेल त्याचा अर्थ या तिन्ही टप्प्यांवर या शेअरला सपोर्ट असून तिथून तो पुन्हा वरच्या दिशेने जाऊ शकतो. याउलट 1130 रुपयांच्या पातळीवर R1, 1145 रुपयांपुढे R2 आणि 1170 रुपयांपुढे R3 दिसत असेल तर या तिन्ही टप्प्यांवरुन हा शेअर पुन्हा घसरू शकतो.

ही अतिशय प्राथमिक माहिती लक्षात आल्यास आपण तो शेअर खरेदी करताना अलर्ट राहू शकतो. असे अनेक इंडिकेटर्स या चार्टमध्ये असून त्यांचा अभ्यास हा आपली रणनीती फायदेशीर करण्यासाठी, आपले नुकसान कमी करण्यासाठी उपयोगाचा ठरतो.