आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी भारतीय शेअर बाजार (Share Market) घसरणीसह उघडला. अमेरिकी शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाल्याने आणि आशियाई देशांच्या बाजारातील घसरणीसह ट्रेडिंगचा परिणाम भारतीय बाजारावरही झाला आहे. बीएसई सेन्सेक्स 325 अंकांनी घसरून 60,993 वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी (National Stock Exchange Nifty) 61 अंकांनी घसरुन 17,974 अंकांवर उघडला.
Table of contents [Show]
सेक्टर अपडेट
आजच्या ट्रेडिंग सत्रात बँकिंग, आयटी, एफएमसीजी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, तेल आणि वायू, फार्मा, ऑटो क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. तर मेटल्स, मीडिया, इन्फ्रा, ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी आहे. मिडकॅप्समध्ये घसरण होत असताना स्मॉल कॅप शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 9 समभाग तेजीत व्यवहार करत आहेत तर 21 समभाग घसरले आहेत. निफ्टीच्या 50 समभागांपैकी 17 समभाग तेजीत तर 33 समभाग घसरणीसह व्यवहार करत आहेत. आजच्या व्यवसायात निफ्टी आयटी 1 टक्क्यांनी आणि निफ्टी बँक 0.44 टक्के घसरणीसह ट्रेड करत आहेत.
तेजीत असलेले शेअर
आजच्या व्यवहारात, अल्ट्राटेक सिमेंट 2.73%, लार्सन 0.70%, टाटा स्टील 0.67%, एचयूएल 0.39%, एशियन पेंट्स 0.33%, मारुती सुझुकी 0.25%, रिलायन्स 0.22%, भारती एअरटेल 0.17%, पॉवर ग्रीड 0.09%, टाटा 0.70%, तेजीने ट्रेड करत आहेत.
घसरलेले शेअर्स
आजच्या सत्रात नेस्ले 2.43%, इंडसइंड बँक 1.25%, विप्रो 1.21%, एचसीएल टेक 1.03%, इन्फोसिस 0.91%, टीसीएल 0.90%, टेक महिंद्रा 0.89%, एचडीएफसी 0.09%, सन फार्मा 0.57%, एचडीएफसी बँक 0.57% घसरणीने ट्रेड करत आहेत.
जागतिक बाजारात घसरण
गुरुवारी डाऊ जोन्स 1.26 टक्क्यांनी, नॅस्डॅक 1.78 टक्क्यांनी घसरून बंद झाले, यामुळे आशियाई बाजार घसरणीसह व्यवहार करत आहेत. निक्केई 0.71 टक्के, हँगसेंग 0.46 टक्के, तैवान 0.56 टक्के, कोस्पी 0.74 टक्के सह ट्रेड करत आहेत.
गुरुवारी बाजार बंद होताना...
गुरुवारी, व्यवहाराच्या शेवटच्या वेळेतील चढउतारांमुळे देशांतर्गत शेअर बाजारात किंचित वाढ झाली आणि बीएसई सेन्सेक्स 44 अंकांच्या वाढीसह बंद झाला. वाढत्या महागाईमुळे चलनविषयक धोरण आणखी कडक होण्याच्या अपेक्षेने बाजारात चिंतेचे वातावरण होते. बीएसईचा 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स 44.42 अंकांच्या म्हणजेच 0.07 टक्क्यांच्या वाढीसह 61,319.51 वर बंद झाला. एकेवेळी व्यापारादरम्यान तो 407.16 अंकांवर गेला होता. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टीही 20 अंकांनी म्हणजेच 0.11 टक्क्यांनी वाढून 18,035.85 अंकांवर बंद झाला.